

खरात प्रकरणात नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर
तृप्ती देसाई यांचे गंभीर आरोप
चाकणकरांनंतर आणखी एक नेत्या अडचणीत
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. आता खरात प्रकरणात शिवसेनेच्या आमदार आणि उपसभापती नीलम गोऱ्हेंचं नाव समोर येत आहे. नीलम गोऱ्हे या ८ वर्षांपासून अशोक खरात याच्या संपर्कात होत्या, असा दावा तृप्ती देसाई यांनी केला केला आहे. तृप्ती देसाईंच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासा केले आहेत. इतर वेळेस नीलम गोऱ्हे अनेक गोष्टींवर बोलतात. आता अशोक खरातवर का बोलत नाहीत? याचे कारण नीलम गोऱ्हे या ७ ते ८ वर्षांपासून अशोक खरातच्या संपर्कात होत्या. आमदारकी व मंत्रीपदासाठी भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या भेटी घेत होत्या, असा खळबळजनक आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे.
नाशिकमधील एक्सप्रेस हॉटेलमध्ये नीलम गो्ऱ्हे आणि खरात याची भेट झाली होती. त्या भविष्य पाहण्यासाठी जात होत्या, विधान परिषद किंवा मंत्रिपदासाठी त्या भेट घेत असाव्यात. या भेटीचे फोटो जरी समोर आले नसले तरी त्यांच्या भेटीदरम्यानची लोकं त्यांच्यासोबत होती त्यांनी मला ही माहिती दिली, असा दावा तृप्ती देसाई यांनी केली आहे. नाशिकच्या कॉलेज रोडवरील खरातच्या ऑफिसमध्येही नीलम गोऱ्हे जात होत्या.
ज्या ऑफिसमध्ये अनेक महिलांवर अत्याचार झालेल्या, त्याच ऑफिसला नीलम गोऱ्हे भेटल्या होत्या.” अशोक खरात हा राजकीय क्षेत्रात सक्रिय होता. अनेक राजकीय नेते, अधिकारी, मंत्री, आमदार आणि खासदार यांचे नंबर त्याच्याकडे होते. अनेक जण भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधत होते, असेही देसाई म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.