आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचे खास नियोजन, पंढरपूर आणि मिरजसाठी चालवणार 80 आषाढी विशेष गाड्या

Ashadhi wari 2025 Special Trains : आषाढी वारीच्या निमित्ताने मध्य रेल्वे प्रशासनाने भाविकांसाठी विशेष नियोजन केले आहे. १ जुलै ते १० जुलै या कालावधीत मध्य रेल्वे पंढरपूर आणि मिरजसाठी ८० विशेष रेल्वे गाड्यांच्या सेवा चालवणार आहे.
Ashadhi wari 2025 Special Trains
Ashadhi wari 2025 Special Trainsx
Published On

दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने राज्यभरातून भाविक पंढरपूरला जमतात. यंदाच्या वर्षी ६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या अनुषंगाने मध्य रेल्वेद्वाे पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी वारीला येणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी दिनांक ०१.०७.२०२५ ते दिनांक १०.०७.२०२५ पर्यंत पंढरपूर आणि मिरजसाठी ८० आषाढी विशेष गाड्यांच्या सेवा चालवणार आहे.

तपशील खालीलप्रमाणे आहे:

१. नागपूर-मिरज विशेष गाड्या (४ सेवा)

ट्रेन क्रमांक 01205 विशेष गाड्या नागपूर येथून दिनांक ०४.७.२०२५ आणि दिनांक ०५.७.२०२५ रोजी सकाळी ८.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)

ट्रेन क्रमांक 01206 विशेष गाड्या दिनांक ०५.७.२०२५ आणि दिनांक ०६.७.२०२५ रोजी दुपारी १२.५५ वाजता मिरज येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे : अजनी, वर्धा, पुलगांव, धामणगाव, चांदुर, बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव,जत रोड, ढालगाव, कवठे महाकाळ, सलगरे आणि अरग

संरचना : दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ सेकंड सीटिंग आणि लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.

Ashadhi wari 2025 Special Trains
AI आधारित स्मार्ट ई-बस लवकरच ST च्या ताफ्यात दाखल होणार, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

२. नवीन अमरावती-पंढरपूर विशेष (४ सेवा)

ट्रेन क्रमांक 01119 विशेष नवीन अमरावती येथून दिनांक ०२.7.2025 आणि दिनांक ०५.७.२०२५ रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

ट्रेन क्रमांक 01120 विशेष गाडी दिनांक ३.७.२०२५ आणि दिनांक ६.७.२०२५ रोजी पंढरपूर येथून १९.३० वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १२.५० वाजता नवीन पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी

संरचना : दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ सेकंड सीटिंग आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.

Ashadhi wari 2025 Special Trains
Pune News : पवना डॅम, कार्ला लेणी, एकविरा देवी, लोहगडसह पर्यटनस्थळांवर पावसाळ्यात बंदी, कारण काय?

३. खामगाव-पंढरपूर विशेष (४ सेवा)

ट्रेन क्रमांक 01121 विशेष गाड्या दिनांक ३.७.२०२५ आणि दिनांक ६.७.२०२५ रोजी खामगाव येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

ट्रेन क्रमांक 01122 विशेष गाड्या दिनांक ४.७.२०२५ आणि दिनांक ७.७.२०२५ रोजी पहाटे ५.०० वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि खामगाव येथे त्याच दिवशी संध्याकाळी ७.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे : जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी

संरचना : दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सेकंड सीटिंग आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.

Ashadhi wari 2025 Special Trains
Mumbai Local : बंद दाराच्या लोकलची पोलखोल, गर्दी रोखणार की श्वास कोंडणार; मुंबईकरांच्या माथी बंद दाराची लोकल?

४. भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष (२ सेवा)

ट्रेन क्रमांक 01159 अनारक्षित विशेष दिनांक ०५.७.२०२५ रोजी भुसावळ येथून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पोहोचेल. (१ सेवा)

ट्रेन क्रमांक 01160 अनारक्षित विशेष गाडी दिनांक ०६.७.२०२५ रात्री १०.३० वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.०० वाजता पोहोचेल. (१ सेवा)

थांबे : जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगांव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी

संरचना : १६ सामान्य द्वितीय श्रेणी / शयनयान श्रेणीचे कोच आणि २ द्वितीय श्रेणीचे आणि सामानासह गार्डच्या ब्रेक व्हॅन.

Ashadhi wari 2025 Special Trains
'कॅपिटल मार्केट'मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

५. लातूर-पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्या (१० सेवा)

ट्रेन क्रमांक 01101 अनारक्षित विशेष गाड्या दिनांक ०२.७.२०२५, ०४.७.२०२५, ०७.७.२०२५, ०८.७.२०२५ आणि ०९.७.२०२५ रोजी लातूर येथून सकाळी ७.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी दुपारी १२.५० वाजता पोहोचेल. (५ सेवा)

ट्रेन क्रमांक 01102 अनारक्षित विशेष गाड्या दिनांक ०२.७.२०२५, ०४.७.२०२५, ०७.७.२०२५, ०८.७.२०२५ आणि ०९.७.२०२५ रोजी दुपारी १.५० वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी संध्याकाळी ७.२० वाजता पोहोचेल. (५ सेवा)

थांबे : हरंगुळ, औसा रोड, मुरुड (डी), ढोकी, कळंब रोड (डी), येडशी, धाराशिव (उस्मानाबाद), पांगरी, बार्सी टाउन, शेंद्री, कुर्डुवाडी आणि मोडलिंब

संरचना : ८ शयनयान कोच, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सेकंड सीटिंग आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.

Ashadhi wari 2025 Special Trains
आता Caste Certificate एका क्लिकवर मिळणार, फडणवीस सरकारच्या निर्णयाचा सर्वसामान्यांना होणार फायदा

६. मिरज-कालबुरगि अनारक्षित विशेष गाड्या (२० सेवा)

ट्रेन क्रमांक 01107 अनारक्षित विशेष गाड्या दिनांक ०१.७.२०२५ ते दिनांक १०.७.२०२५ पर्यंत मिरज येथून सकाळी ५.०० वाजता सुटेल आणि कलबुरगि येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. (१० सेवा)

ट्रेन क्रमांक 01108 अनारक्षित विशेष गाड्या दिनांक ०१.७.२०२५ ते दिनांक १०.७.२०२५ पर्यंत दुपारी ०३.३० वाजता कलबुरगि येथून सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी रात्री ११.५० वाजता पोहोचेल. (१० सेवा)

थांबे : अरग, बेळंकी, सलगरे, कवठे महाकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद, सांगोला, पंढरपूर, मोडलिंब (फक्त ट्रेन क्रमांक 01108 साठी), कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट, दुधनी आणि गंगापुर

संरचना : १२ सामान्य द्वितीय श्रेणी / शयनयान श्रेणीचे कोच आणि २ द्वितीय आसन आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.

Ashadhi wari 2025 Special Trains
Viral : अजबच! खड्ड्यानं जीवात जीव आणला, अ‍ॅम्ब्युलन्स खड्ड्यात आदळली; मृत माणूस उठून बसला, डॉक्टरही चक्रावले

७. कोल्हापूर-कुर्डुवाडी अनारक्षित विशेष गाड्या (२० सेवा)

ट्रेन क्रमांक 01209 अनारक्षित विशेष गाड्या दिनांक ०१.७.२०२५ ते दिनांक १०.७.२०२५ पर्यंत कोल्हापूर येथून सकाळी ६.१० वाजता सुटेल आणि कुर्डुवाडी येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. (१० सेवा)

ट्रेन क्रमांक 01210 अनारक्षित विशेष गाडी दिनांक १.७.२०२५ ते दिनांक १०.७.२०२५ पर्यंत दुपारी ०४.३० वाजता कुर्डुवाडी येथून सुटेल आणि कोल्हापूर येथे त्याच दिवशी रात्री १०.३० वाजता पोहोचेल. (१० सेवा)

थांबे : हातकणंगले, जयसिंगपुर, मिरज, अरग, बेळंकी, सलगरे, कवठे महाकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद, सांगोला, पंढरपूर आणि मोडलिंब

संरचना : १२ सामान्य द्वितीय श्रेणी / शयनयान श्रेणीचे कोच आणि २ द्वितीय श्रेणीचे आणि सामानासह गार्डच्या ब्रेक व्हॅन.

Ashadhi wari 2025 Special Trains
Samruddhi Expressway : कसारा ते इगतपुरी फक्त ५ मिनिटात, महाराष्ट्रातील सर्वात लांब ट्विन टनल वाहतुकीसाठी खुला

८. पुणे-मिरज अनारक्षित विशेष गाड्या (१६ सेवा)

ट्रेन क्रमांक 01207 अनारक्षित विशेष गाड्या दिनांक ३.७.२०२५ ते दिनांक १०.७.२०२५ पर्यंत पुणे येथून सकाळी ८.४० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता पोहोचेल. (८ सेवा)

ट्रेन क्रमांक 01208 अनारक्षित विशेष गाड्या दिनांक ३.७.२०२५ ते दिनांक १०.७.२०२५ पर्यंत मिरज येथून सायंकाळी ७.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ४.३० वाजता पोहोचेल. (८ सेवा)

थांबे : हडपसर, उरुळी, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, वासूद, जावळे, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, लंगरपेठ, कवठे महाकाळ, सलगरे, बेळंकी आणि अरग

संरचना : १२ सामान्य द्वितीय श्रेणी / शयनयान श्रेणीचे कोच आणि २ द्वितीय आसन आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.

आरक्षण : आषाढी विशेष ट्रेन क्रमांक 01205, 01206, 01119, 01120, 01121 आणि 01122 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दिनांक १६.०६.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल.

अतिजलद मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या अनारक्षित निवासस्थानांसाठी सामान्य शुल्क आकारून अनारक्षित कोचची तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे बुक करता येतात.

Ashadhi wari 2025 Special Trains
कौतुकास्पद! जिल्हा परिषदेच्या शाळेत अ‍ॅडमिशन घ्या आणि वर्षभरासाठी कर देणं विसरा, महाराष्ट्रातील 'या' ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com