कौतुकास्पद! जिल्हा परिषदेच्या शाळेत अ‍ॅडमिशन घ्या आणि वर्षभरासाठी कर देणं विसरा, महाराष्ट्रातील 'या' ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

Dhule News : धुळ्याच्या मालपुर ग्रामपंचायतीद्वारे राबवण्यात आलेल्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत जे विद्यार्थी प्रवेश करतील, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एक वर्षाचा संपूर्ण कर माफ करण्यात येणार आहे.
Dhule News
Dhule Newsx
Published On

भूषण अहिरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील मालपुर ग्रामपंचायतने जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविला आहे, या उपक्रमाची संपूर्ण जिल्हाभरात चर्चा सुरू आहे, राज्यामध्ये एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या कमी होत चालली असून, यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य घरांमधील गोरगरीब विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान होणार असल्याची भीती ग्रामीण भागातील नागरिकांना वाटू लागली आहे, आणि यासाठीच जिल्हा परिषदेच्या शाळा टिकून राहाव्यात यासाठी साक्री तालुक्यातील मालपुर ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकले आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मालपुर ग्रामपंचायततर्फे एक वर्षांचा संपूर्ण कर माफ करण्यात येणार असल्याचा निर्णय मालपुर ग्रामपंचायतच्या सदस्यांनी घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे अ‍ॅडमिशन होईल त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा म्हणून मालपुर ग्रामपंचायत मध्ये एक वर्षांचा कर माफी देण्यात येणार आहे, या निर्णयामुळे पालकांना देखील मोठ्या प्रमाणात दिलासा कर स्वरूपात मिळणार असल्यामुळे पालकांमध्ये विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये अ‍ॅडमिशन घेण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.

Dhule News
Jasprit Bumrah : मी तर चाल्लोय... महत्त्वाच्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहचं धक्कादायक वक्तव्य, चाहत्यांचं टेन्शन वाढलं

इतर खाजगी शाळांमध्ये अ‍ॅडमिशन घेतल्यानंतर त्यांना ग्रामपंचायतीला नेहमीप्रमाणे जो वर्षभराचा कर द्यावा लागतो तो द्यावा लागणार आहे, आणि जर त्यांनी आपल्या पाल्याचे जिल्हा परिषद शाळेमध्ये अ‍ॅडमिशन केले तर त्यांना हा कर द्यावा लागणार नाही, त्यामुळे पालक आता आपल्या पाल्यांचे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अ‍ॅडमिशन घेण्याच्या निर्णयावर ठाम असताना दिसून येत आहेत.

Dhule News
Qualifier 2 खेळण्याआधीच मुंबई इंडियन्स बाहेर पडेल, पंजाबला होणार मोठा फायदा; कारण...

मालपुर ग्रामपंचायतच्या या निर्णयाचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे, आणि हा फॉर्म्युला मालपुर पॅटर्न म्हणून जिल्हाभरात देखील राबविण्यात येण्याची शक्यता आहे, मालपुर ग्रामपंचायतच्या या स्तुत्य उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या डबघाईला आलेल्या शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Dhule News
Video : लज्जास्पद! भारताला शिव्या देणाऱ्या शाहिद आफ्रिदीचे दुबईत भारतीयांकडून स्वागत? केरळ समुदाय नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com