बीड : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून आलेल्या संत मुक्ताईच्या पालखीचे आज बीड नगरीत आगमन झालं. सर्वात लांबचा प्रवास करून येणारी ही पालखी आहे. तर या पालखीत मोठ्या संख्येने महिला वारकऱ्यांचा सहभाग असतो. बीडमधील (Beed) आजोबा गोविंदपंत यांच दर्शन घेऊन ही पालखी गोविंदपंत यांच्या पालखीसह पंढरपूरकडे प्रस्थान करते. दोन दिवसांचा मुक्काम केल्या नंतर ही पालखी पंढरपूरला (Pandharpur) प्रस्थान होणार आहे. दोन वर्ष कोविडमुळे ही पालखी बीडमध्ये आली नव्हती, यंदा मात्र निर्बंध हटल्याने मोठ्या उत्साहात बीडकरांनी पालखीचे स्वागत केले आहे. ( ASHADHI WARI 2022 Latest News In Marathi )
पालखीच्या स्वागतासाठी एक ढोल पथक पालखीच्या पुढे चालत होतं आणि ते आपल्याच रंगात ढोल ताशाच्या गजरात या पालखीचे स्वागत करत होतं. यादरम्यान एका ढोल वाजवणाऱ्या काकांनी आपल्या चिमुकल्या पुतन्याला चक्क ढोलवर बसवून ढोल वाजवण्याचा आनंद घेतला. हे दृश्य इतकं मनमोहक होतं की चिमुकल्याला पाहता अनेक जणांच्या नजरा त्यांच्यावर खिळून राहिल्या. हा चिमुकला मोठ्या उत्साहाने ढोल वाजण्याचा आणि टाळ-मृदुंगाचा आनंद घेत होता. दरम्यान ही पालखी दोन दिवस बीडमध्ये मुक्काम करून पुन्हा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.
प्रशासनातर्फे दिवे घाट आणि बोपदेव घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. २४ ते २८ जून या कालावधीत तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी २४ जून ते ५ जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये ही वाहतूक बंद राहणार आहे. माऊलींची पालखी ही २४ जुनला मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे २३ तारखेपासूनच रात्री ११ पासून २६ जून रात्री ८ पर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरव्होळमार्गे वळवण्यात आली आहे. तर सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.