Ashadhi Wari: संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवेघाटातुन पंढरीच्या दिशेने

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवेघाटातुन पंढरीच्या दिशेने
Aaghadhi Wari
Aaghadhi WariSaam tv
Published On

वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..!

आणिक मी देवा काही नेणे..!

गाये नाचे उडे आपुलीया छंदे..!

मनाच्या आनंदे आवडीने...

पुणे : अभंगवाणीचा गजर करत मजलदरमजल करत टाळ मृदंगाच्या तालावर माउली..माउली..हा जयघोष करत संत ज्ञानेश्वर माऊलींची आषाढी पायीवारी (Ashadhi Wari) पालखी सोहळा दिवेघाटातुन पुढे निघाली. सारे जण विठू नामाच्या भक्तिरसात चिंब होऊन नाचत होते. दिवे घाट (Dive Ghat) चढून पालखीने पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. (pune news Sant Dnyaneshwar Mauli Palkhi from Diveghat towards Pandhari)

Aaghadhi Wari
भीषण अपघात! प्रवाशांना घेऊन निघालेली जीप ५० फूट खोल दरीत कोसळली

दोन वर्षानंतर माऊलींच्या पालखी सोहळा लाखों वारक-याच्या उपस्थित निघाला असताना आज सकाळपासुनच दिवेघाटात हरिनामाचा गजर करत मजलदरमजल करत वारकरी (Pandharpur) पंढरीकडे निघाला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ही दिवे घाटातून पुणे-सासवड- लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी ही पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे (Baramati) बारामती, इंदापूर, अकलूजमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होते. त्यामुळे वाहतूकीत बदल करण्यात आले आहे.

दिवे, बोपदेव घाट वाहतूकीसाठी बंद

प्रशासनातर्फे दिवे घाट आणि बोपदेव घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. २४ ते २८ जून या कालावधीत तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी २४ जून ते ५ जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये ही वाहतूक बंद राहणार आहे. माऊलींची पालखी ही २४ जुनला मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे २३ तारखेपासूनच रात्री ११ पासून २६ जून रात्री ८ पर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरव्होळमार्गे वळवण्यात आली आहे. तर सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com