सातारा : आषाढी वारीकरीता (ashadhi wari) येणाऱ्या वारकऱ्यांना (warkari) वारीबाबत (wari) माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 'आषाढी वारी 2022' ॲप (ashadhi wari app) विकसित करण्यात आले आहे अशी माहिती सातारा (satara) जिल्हा प्रशासन यांच्यावतीने देण्यात आली आहे. (ashadhi wari satara latest marathi news)
या ॲपमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (SANT DNYANESHWAR MAHARAJ PALKHI SOHALA) मार्गाचे वेळापत्रक व गावनिहाय नकाशा, पंढरपूर (Pandharpur) येथील श्री विठ्ठलाच्या थेट दर्शनाची सोय, पालखीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख यांचे संपर्क क्रमांक, वैद्यकीय सुविधा त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, फिरते वैद्यकीय पथक, शासकीय रुग्णालये व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकरी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पाण्याच्या सुविधेच्या दृष्टीने मार्गावरील टॅकर सुविधा, अन्न पुरवठा आणि वितरणबाबत, विद्युत सेवा, पशुधन बाबत सेवेसाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.
पालखी सोहळ्याशी संबंधित विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकदेखील या ॲपमध्ये देण्यात आले आहेत. भाविकांनी गुगल प्लेस्टोवरील https://play.google.com/store/apps/details?id=com.deecto.ashadhiwari या लिंकवरुन आषाढी वारी 2022 हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. तसेच भाविकांनी वारीदरम्यान अडचणीच्या वेळी या ॲपवरील संबंधित संपर्क अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.