Sambhaji Nagar News: शाळेत बाकड्यावर बसण्यावरून वाद, वर्ग मित्रांच्या मारहाणीत लहान मुलाचा मृत्यू; संभाजीनगर येथील धक्कादायक घटना

Sambhaji Nagar News Today: छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळ असलेल्या दौलताबाद येथे हा प्रकार समोर आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar NewsSaam Tv
Published On

Sambhaji Nagar Crime News: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्गात बाकड्यावर बसण्यावरून झालेल्या वादात मधल्या सुट्टीत शाळेच्या मैदानावर चार वर्गमित्रांनी केलेल्या मारहाणीत एका अकरा वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळ असलेल्या दौलताबाद येथे हा प्रकार समोर आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Sambhaji Nagar News
Koyna Dam Water Level: काेयनेत आजही पावसाचा जाेर, सांगलीत NDRF दाखल; साता-यात शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक गायकवाड असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. दौलताबाद येथील देवगिरी विद्यालयातील सातवीच्या वर्गात कार्तिक हा त्याच्या बहिणी सोबत शिक्षण घेत होता.

दरम्यान 6 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता शाळेतील वर्गखोलीत बाकड्यावर बसण्यावरुन त्याचा एका वर्गमित्राशी वाद झाला. त्यानंतर मधल्या सुट्टीत कार्तिक शाळेच्या मैदानावर खेळताना त्याचा दुसरा वर्गातील ४ विद्यार्थ्यांनी कार्तिकला मारहाण केली. मारहाण केल्यावर हे चारही जण तिथून पळून गेले.

मारहाणीनंतर कार्तिक पोटात दुखत होते. 11 जुलै रोजी त्याला अधिक त्रास होत असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला एका खासगी रुग्णालयात नेले. परंतु, पोटदुखीचा त्रास काही कमी होत नव्हता. त्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी कन्नड येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी नेण्याचे सांगितले.

Sambhaji Nagar News
Gujarat Accident News: कार आणि डंपरचा अपघात बघायला गेलेल्या 9 जणांचा मृत्यू, अहमदाबादमधील दुर्दैवी घटना

त्यानंतर कार्तिकला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान कार्तिकचे 14 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास निधन झाले. याप्रकरणी दौलताबाद पोलीस (Police) ठाण्यात चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com