Gujarat Accident News: कार आणि डंपरचा अपघात बघायला गेलेल्या 9 जणांचा मृत्यू, अहमदाबादमधील दुर्दैवी घटना

गुजरातमधील अहमदाबाद येथील इस्कॉन पुलावर भीषण अपघात झाला आहे.
Gujarat Accident News
Gujarat Accident NewsANI
Published On

Gujarat News Today: गुजरातमधील अहमदाबाद येथील इस्कॉन पुलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इस्कॉन पुलावर आधीच झालेला अपघात पाहण्यासाठी पुलावर मोठी गर्दी झाली होती. तेव्हाच मागून येणाऱ्या एका भरधाव कारने लोकांना चिरडलं.  (Latest Marathi News)

Gujarat Accident News
Raigad Landslide News Today: आमची लेकरं कुठे गेली हो.., मुलांना शोधण्यासाठी आई-वडिलांची धावाधाव; इर्शाळवाडीत आक्रोश

या अपघातामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पोलीस हवालदार आणि होमगार्डचाही समावेश आहे. डंपर आणि गाडीचा अपघात झाल्यानंतर अपघाताची तपासणी करण्यासाठी पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

चालक गंभीर जखमी

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील (Gujarat) सरखेज-गांधीनगर या महामर्गावर इस्कॉन पुलावर हा अपघात झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ज्या गाडीने या गर्दीला चिरडले त्या गाडीचा चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. त्या चालकाला देखील रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. प्रचंड वेगात असलेल्या गाडीचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. (Accident News)

Gujarat Accident News
Eknath Shinde on Khalapur Landslide: मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

या भीषण अपघातानंतर इस्कॉन पुलावर बचावरकार्य सुरु करण्यात आलं आहे. या अपघातानंतर पोलिसांनी इस्कॉन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता या चालकावर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com