मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Anna Hazare Health Condition: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. व्हायरल इन्फेक्शन, डिहायड्रेशन आणि किडनीशी संबंधित समस्यांवर उपचार सुरू आहेत.
Anna Hazare Health Update
Anna Hazare Health Update
Published On

Anna Hazare Health Update : ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांची प्रकृती अचानक खालावल्याची चिंताजनक माहिती समोर आली. प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना तातडीने मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये (Bombay Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Anna Hazare Hospitalised)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अण्णा हजारे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुंबईत आणण्यात आले. सध्या हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवून आहे. आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या आणि उपचार सुरू करण्यात आले आहेत. अण्णांच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच राज्यभरातून आणि राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात आहे. ते लवकरात लवकर आणि पूर्णपणे सुखरूप बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली जात आहे.

Anna Hazare Health Update
Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

नेमका काय झाला त्रास?

मिळालेल्या माहितीनुसार, अन्ना हजारे यांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र अस्वस्थता जाणवत होती. त्यांना गंभीर व्हायरल इन्फेक्शन (Viral Infection), शरीरातील पाण्याचे प्रमाण प्रचंड कमी होणे (Acute Dehydration) आणि मूत्रपिंडाशी (Kidney) संबंधित समस्या निर्माण झाल्या आहेत.

सुरवातीला त्यांच्यावर राळेगणसिद्धीजवळील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु रक्तातील क्रिएटीनिनची पातळी (Creatinine levels) वाढल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे मुंबईत आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

Anna Hazare Health Update
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

डॉक्टरांचे पथक सतर्क

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डॉ. गौतम भंसाली यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या (Medical Tests) केल्या जात आहेत. चाचण्यांचे संपूर्ण अहवाल आल्यानंतर पुढील उपचाराची दिशा निश्चित केली जाईल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com