district wise Maharashtra voter names excluded from draft roll : महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नव्या प्रारुप मतदार यादीमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातील तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजार (२१.१४%) मतदारांची नावे प्रारुप यादीतून वगळण्यात आली आहेत. पत्ता बदलणे, मृत व्यक्ती, दुबार नोंदणी आणि फॉर्म न भरल्यामुळे ही नावे वगळण्यात आली असून, यामध्ये पुणे, ठाणे आणि मुंबईतील मतदारांचा सर्वाधिक समावेश आहे.
परंतु, हे नाव कायमस्वरूपी वगळलेले नसून, नाव दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती दाखल करण्याची संधी दिली आहे. तुमचे नाव यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी नागरिक भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (voters.eci.gov.in) जाऊन पाहू शकतात.
पुनरीक्षणापूर्वी राज्यात एकूण ९,७८,५४,०४९ (सुमारे ९ कोटी ७८ लाख) मतदार होते. परंतु, प्रसिद्ध झालेल्या प्रारुप यादीत २,०६,८८,४८७ (तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजार - २१.१४%) मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. म्हणजेच, राज्यातील सुमारे २१ टक्के मतदारांची नावे सध्यातरी मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.
नावे वगळण्यामागे नक्की कारण काय?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मतदारांचे 'गणना प्रपत्र' (Enumeration Form) प्राप्त न झाल्यामुळे या २ कोटींहून अधिक मतदारांचा समावेश प्रारुप यादीत करता आलेला नाही.
१) मतदार नोंदणीकृत निवासाच्या ठिकाणी गैरहजर असणे किंवा न सापडणे.
२) संबंधित पत्त्यावरून इतरत्र स्थलांतरित झालेले असणे.
३) मतदाराचा मृत्यू झालेला असणे.
४) अन्य ठिकाणी नोंदणी झालेली असणे किंवा दुबार नाव असणे.
५) मतदारांनी गणना प्रपत्र भरून देण्यास नकार देणे.
कुठल्या जिल्ह्यात किती मतदार वगळले? (जिल्हावार संपूर्ण यादी)
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शहरी आणि औद्योगिक जिल्ह्यांमध्ये मतदार वगळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. पुणे आणि ठाणे जिल्ह्यात प्रत्येकी २८ लाखांहून अधिक, तर मुंबई उपनगरात २६ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली गेली आहेत.
नंदुरबार (Nandurbar) - १,८८,७२९
धुळे (Dhule) - २,९४,८५७
जळगाव (Jalgaon) - ५,१४,७४३
बुलढाणा (Buldhana) - १,९०,९३७
अकोला (Akola) - २,७६,९९२
वाशीम (Washim) - १,३४,२५०
अमरावती (Amaravati) - ३,५३,२८२
वर्धा (Wardha) - १,७८,१७८
नागपूर (Nagpur) - १४,४३,२६७
भंडारा (Bhandara) - १,३३,३७१
गोंदिया (Gondia) - १,६०,६४३
गडचिरोली (Gadchiroli) - ९०,६०३
चंद्रपूर (Chandrapur) - २,७०,१०४
यवतमाळ (Yavatmal) - २,६४,९४८
नांदेड (Nanded) - ३,८८,३५२
हिंगोली (Hingoli) - ८५,३०९
परभणी (Parbhani) - १,८०,२३१
जालना (Jalna) - २,४३,१८३
छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) - ६,०७,६६०
नाशिक (Nashik) - १०,२७,७९२
ठाणे (Thane) - २८,५९,३७७
मुंबई उपनगर (Mumbai Suburban) - २६,५८,२०२
मुंबई शहर (Mumbai City) - ९,५०,७२०
रायगड (Raigad) - ५,८४,११८
पुणे (Pune) - २८,६६,४८१
अहिल्यानगर () - ४,२६,९१५
बीड (Beed) - २,४०,४०७
लातूर (Latur) - २,१४,४४२
धाराशिव (Osmanabad) - १,८१,५४५
सोलापूर (Solapur) - ६,२२,६७१
सातारा (Satara) - ३,४१,९०५
रत्नागिरी (Ratnagiri) - १,३१,५६९
सिंधुदुर्ग (Sindhudurg) - ८२,५१३
कोल्हापूर (Kolhapur) - ४,४९,२१३
सांगली (Sangli) - ३,८२,२६९
पालघर (Palghar) - ६,६८,७०९
संपूर्ण महाराष्ट्र (Total) - २,०६,८८,४८७
तुमचे नाव वगळले गेले असेल तर काय करावे?
नागरिकांनी घाबरून न जाता आपले नाव तपासण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. ज्या मतदारांची नावे वगळली गेली आहेत, त्यांना ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या एका महिन्याच्या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येतील.
नवीन नाव नोंदणीसाठी: फॉर्म नंबर ६ (Form 6) भरून द्यावा लागेल.
दुरुस्तीसाठी: फॉर्म नंबर ८ (Form 8) द्वारे अर्ज करता येईल.
नाव वगळण्यावर आक्षेप घेण्यासाठी: फॉर्म नंबर ७ (Form 7) भरावा लागेल.
या सर्व अर्जांची पडताळणी झाल्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.