अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी
Akola doctor arrested : उपचाराच्या बहाण्याने एका २० वर्षीय तरुणी रुग्णाचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना अकोल्यातील रामनगर भागात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित डॉक्टरला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. डॉ. प्रवीण श्यामसुंदर अग्रवाल (वय ४६, रा. म्हाडा कॉलनी, रामनगर, अकोला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणी ही गेल्या सात ते आठ महिन्यांपासून डॉ. प्रवीण अग्रवाल यांच्याकडे उपचार घेत होती. नुकतीच ती नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली असता, डॉक्टरने तपासणीच्या आणि चेहऱ्यावरील केसांवर उपचार करण्याच्या बहाण्याने तिला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेले. तिथे डॉक्टरने तिला मिठी मारण्याचा आणि चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तसेच औषध देण्याच्या बहाण्यानेही तिच्यासोबत अत्यंत लज्जास्पद वर्तन केले.
या प्रकारानंतर घाबरलेल्या तरुणीने घडलेला सर्व प्रकार आपल्या नातेवाईकांना व स्थानिक नागरिकांना सांगितला. ही माहिती मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (शिवसेना) स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तत्काळ हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. शिवसैनिकांनी डॉक्टरला चांगलाच चोप (प्रसाद) देत जाब विचारला आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अकोला पोलिसांनी आरोपी डॉ. प्रवीण अग्रवाल याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.