
अक्षय शिंदे, साम टीव्ही
जालना : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज 50 रुपये भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.. परंतु अद्यापही अंगणवाडी सेविकांना 50 रुपये भत्ता मिळालेला नाही .यामुळे आता अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असून शासनाने तीन ते चार दिवसांमध्ये 50 रुपये भत्ता अदा करावा नाहीतर आंदोलन करू असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.
जालना जिल्ह्यात जवळपास दोन लाख लाडक्या बहिणींचे अर्ज अंगणवाडी सेविकांनी भरले असून अंगणवाडी सेविकांनी तळमळीने काम करून लाडकी बहीण योजना राबविल्यामुळेच महायुतीला भरघोस यश मिळाल्याच देखील अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे. दरम्यान या अनुदानाबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून शासनाकडे सादर करण्यात आला असून शासन स्तरावरून अनुदानाचे लवकरच वितरण केले जाणार असल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांनी दिली आहे.
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडी सेविकांना 50 रुपये प्रति अर्ज मानधन देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी जालना जिल्ह्यात जवळपास दीड लाखाहून अधिक अर्ज लाडक्या बहिणीचे भरले आहे. मात्र निवडणुका होऊन देखील अद्यापही अंगणवाडी सेविकांच्या खात्यात पन्नास रुपये अर्ज प्रमाणे मानधन जमा झाले नसल्याने आता अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असून येणाऱ्या तीन ते चार दिवसात खात्यावर मानधन जमा न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याच बोलल जात असून लाडकी बहीण योजनेमुळेच महाराष्ट्रात महायुतीला भरघोस यश मिळाल्याच देखील बोलल जात आहे. अंगणवाडी सेविकांनी तळमळीने काम करून लाडकी बहीण योजना राबविल्यामुळेच महायुतीला भरघोस यश मिळाल्याचं अंगणवाडी सेविका साजदा बेगम यांनी बोलून दाखवला आहे.
जालना शहर -28716
जालना ग्रामीण - 24330
अंबड- 17909
बदनापूर - 11722
परतुर- 9762
घनसावंगी- 18157
भोकरदन-16193
जाफराबाद-17011
मंठा-11149
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.