Jalna Police : अवैध सोनोग्राफी मशीन विक्री प्रकरणी पाचजण ताब्यात; जालना पोलिसांची कारवाई

Jalna News : जालना शहरांमध्ये अवैधपणे गर्भलिंग निदान करणारी टोळी सक्रिय झाली होती. दरम्यान याचा भांडाफोड झाला होता. दोन दिवसांपूर्वी सोनोग्राफी मशीन विक्रीसाठी आणणाऱ्या ३ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक
Jalna Police
Jalna PoliceSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: जालन्यात गर्भनिदान करणारी अवैध सोनोग्राफी मशीन विक्री प्रकरणी जालना आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसापूर्वी मोठी कारवाई केली होती. यात सोनोग्राफी मशीनसह तीन जणांना ताब्यात घेतलं होतं. आता या प्रकरणांमध्ये आज आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

जालना शहरांमध्ये अवैधपणे गर्भलिंग निदान करणारी टोळी सक्रिय झाली होती. दरम्यान याचा भांडाफोड झाला होता. तर दोन दिवसांपूर्वी सोनोग्राफी मशीन विक्रीसाठी आणणाऱ्या ३ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक करत त्यांच्या ताब्यातून गर्भनिदान करणारी ५ लाख रुपयांची सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आली होती. जालना आरोग्य विभागाला मिळालेल्या गुप्त माहिती वरून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने सापळा रचून ही कारवाई केली होती. 

Jalna Police
Parali News : शिवभोजन केंद्रात जेवण करण्यासाठी आलेल्या दिव्यांगाला बेदम मारहाण; बीडच्या परळीतील घटना

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जालना शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलीस प्रशासन याचा सखोल तपास करत होती. या तपासादरम्यान पोलिसांनी सोनोग्राफी मशीन विक्रीच्या प्रकरणात आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तर मशीन विक्री प्रकरणात आणखी मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Jalna Police
Grapes Transport : हंगामातील द्राक्षाचा पहिला कंटेनर दुबईकडे रवाना; आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्याला मिळाला चांगला भाव

दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. दरम्यान गर्भनिदान करणारी अवैध सोनोग्राफी मशीन कुठून आणली होती आणि कुठे विक्रीसाठी जात होती; याचा तपास पोलीस करत आहे. याप्रकरणी जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com