Vijay Wadettiwar: 'आनंदाचा शिधा' योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप; चौकशीची मागणी

Vijay Wadettiwar News: गेल्या वर्षी दिवाळीमध्ये राज्य सरकारने गोरगरिबांना १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता.
anandacha shidha scheme Big corruption  Vijay Wadettiwar serious allegations against Shinde Fadnavis government
anandacha shidha scheme Big corruption Vijay Wadettiwar serious allegations against Shinde Fadnavis governmentSaam TV
Published On

Anandacha Shidha Distribute: 'आनंदाचा शिधा' या राज्य सरकारच्या महत्वाच्या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने निविदा न काढताच ठराविक कंत्राटदारांना कंत्राट दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वडेट्टीवार यांच्या आरोपामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

anandacha shidha scheme Big corruption  Vijay Wadettiwar serious allegations against Shinde Fadnavis government
Gopichand Padalkar News: शिंदे गटाच्या मतदारसंघावर भाजपचा दावा, गोपीचंद पडळकरांच्या घोषणेनं राजकारण तापणार?

गेल्या वर्षी दिवाळीमध्ये राज्य सरकारने (Maharashtra Government) गोरगरिबांना १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. यामध्ये एक लिटर पामतेल, आणि प्रत्येकी एक-एक किलो साखर, रवा, चणाडाळ असलेले किट शिधापत्रिकाधारकांना देण्यात आले होते. राज्यातील अनेक नागरिकांना याचा लाभ मिळाला होता. तर काही ठिकाणी शिधा वाटपात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही केला होता.

विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी बुधवारी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. 'आनंदाचा शिधा' या राज्य सरकारच्या महत्वाच्या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

anandacha shidha scheme Big corruption  Vijay Wadettiwar serious allegations against Shinde Fadnavis government
Mumbai Lake Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांत किती टक्के पाणीसाठा? पाहा आजची ताजी आकडेवारी

ऐनसनासुदीच्या तोंडावर 'आनंदाचा शिधा' या योजनेची निविदा प्रक्रिया पार न पाडताच अवघ्या तीन दिवसांत कंत्राट देण्यात आलं, त्यामुळे हा आनंदाचा वर्षाव कुणासाठी? याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं, अशी मागणी सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी केली.

पारदर्शक प्रक्रियेवरून ई पोर्टलद्वारे निविदा मागवा, चोरासारखं मागच्या दाराने घाईघाईने कंत्राट दिल्याने आपण याविरोधात आवाज उठवणार असल्याचा इशारा देखील वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीसांना दिला आहे. दरम्यान, आनंदाच्या शिधा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यामुळे यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com