Amravati Politics: यशोमती ठाकूर यांना कसला अंहकार? खासदार बोंडेंवरून वहिनीसाहेबांनी नणंदबाईंना भरला दम

Amravati Politics: अमरावतीमधील नणंदबाई आणि वहिनीसाहेबमध्ये वाद जुंपलाय. खासदार अनिल बोंडे यांच्या विधानावर दोन्ही महिला नेत्या आमनेसामने आल्यात.
Amravati Politics: यशोमती ठाकूर यांना कसला अंहकार? खासदार बोंडेंवरून वहिनीसाहेबांनी नणंदबाईंना भरला दम
Amravati Politics
Published On

अमर घटारे , साम प्रतिनिधी

भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींवर केलेल्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेस आक्रमक झालीय. राज्यातील अेक ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे. तर अमरावतीत वहिनीसाहेब आणि नणंदबाई आमनेसामने आले आहेत. आमदार यशोमती ठाकूर यांनी खासदार बोंडे यांना खडेबोल सुनवाल्यानंतर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी त्यांना प्रतित्तुर दिलंय.

विजय हा पचवता आला पाहिजे. विजय हा उतू जात आहे. अमरावतीची जनता येत्या काळात तुम्हाला नक्की धडा शिकवेल, अशा शब्दात अमरावतीच्या भाजप नेत्या नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना सुनावले आहे. यामुळे अमरावतीत बोंडे यांच्या विधानावरून वहिनीसाहेब आणि नणंदबाई यांच्या वाद पेटलाय.

Amravati Politics: यशोमती ठाकूर यांना कसला अंहकार? खासदार बोंडेंवरून वहिनीसाहेबांनी नणंदबाईंना भरला दम
Navneet Rana : मोठी बातमी! नवनीत राणा पुन्हा अमरावतीच्या खासदार होणार? भाजपच्या बड्या नेत्याने दिले संकेत

काय आहे प्रकरण ?

राहुल गांधींनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानावरुन भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींवर टीका करताना भडकाऊ विधान केलं होतं. राहुल गांधींची जीभ छाटू नये, त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे' असे खळबळजनक विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं होतं. त्यानंतर बोंडेंविरोधात काँग्रेस नेते आक्रमक झालेत.

अमरावतीच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर सुद्धा आक्रमक झाल्या होत्या. अनिल बोंडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत त्यांनी अमरावती पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांनी खासदार बोंडे यांना शिवीगाळ केली होती. त्यावरून आता भाजप नेत्या नवनीत राणा संतापल्या असून त्यांनी यशोमती ठाकूर यांना खडेबोल सुनावलेत.

काय म्हणाल्या नवनीत राणा

काल पोलीस आयुक्त यांच्या दालनात तमाशा झाला. यशोमती ठाकुर माझी नणंद बाई यांनी त्या ठिकाणी अनिल बोंडे यांना शिवीगाळ केली. कधी खासदाराला धक्के मारणे खासदारांला हरामखोर म्हणणे. ही पद्धत एका राजकीय नेत्याला शोभण्यासारखी नाही. लोकशाहीत आपले मत मांडण्याचा सगळ्याना अधिकार आहे.

महिला नेत्यांच्या तोंडी, अशी भाषा शोभत नाही ही अमरावतीची संस्कृती नाही, अशी टीका करतांना राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या विजयावरूनही ठाकूर यांचा वचपा काढलाय. यशोमती ठाकूर यांना नेमका अहंकार कशाचा आहे.कुणी पराभूत होते कोनी निवडून येते. विजय हा पचवता आला पाहिजे. विजय उतू येत आहे. अमरावतीची जनता येत्या काळात तुम्हाला नक्की धडा शिकवेल, असा सणसणीत टोला त्यांनी यशोमती ठाकूर यांना लगावलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com