Crime News: मामा झाला हैवान! १७ वर्षीय भाचीवर वारंवार बलात्कार, अमरावती हादरलं

Amravati Crime News girl Physically Assaulted: मठात मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. यात मामाचा देखील हात असून, मामानेही मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. ज्यामुळे पीडित ८ महिन्यांची गरोदर राहिली आहे.
 Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सुरेंद्रमुनी तळेगावकर या महाराजांच्या मठात सेवेकरी असलेल्या १७ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. हा लैंगिक अत्याचार सुरेंद्रमुनी आणि त्याच्या साथीदाराने केली असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे युवती ८ महिन्यांची गरोदर आहे. यात आणखी एक आरोपीचा समावेश आहे. या अल्पवयीन पीडित मुलीवर सख्ख्या मामानेही वारंवार अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे.

रिद्धपूर येथील सुरेंद्रमुनी तळेगावकर या महाराजांच्या मठात सेवेकरी असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन युवतीवर सुरेंद्र मुनी आणि त्याचा साथीदार बाळकृष्ण देसाई या दोघांनी लैंगिक शोषण केले होते. वर्षभर मुलीवर नराधम लैंगिक अत्याचार करत होते. यामुळे पीडित युवती ८ महिन्यांची गरोदर राहिली होती. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेवर तिच्या सख्ख्या मामानेही लैंगिक अत्याचार केला आहे.

 Crime News
Amit Shah: अमित शहांच्या दौऱ्यामुळे पुण्यातील वाहतूकीत बदल, पुणेकरांनो घ्या नोंद

आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. पीडित मुलगी मठात आपल्या मावशीसोबत राहत होती. पीडितेला झोपेतून उठवून ती सुरेंद्रमुनी तळेगावकर यांच्या खोलीत न्यायची. त्यानंतर पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. तरूणीने विरोध केल्यानंतर तिला जीवेमारण्याची धमकीही देण्यात आली होती.

 Crime News
Cash found from Parliament seat: खासदार संसदेत पैसे घेऊन जाऊ शकतात? काय आहेत नियम?

पीडित मुलगी ८ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हे भिंग फुटलं. अत्याचारातून तरूणी ८ महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आल्यानंतर डॉक्टरांनी ही बाब लपवून ठेवली. डॉक्टरांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना न दिल्यामुळे बालकल्याण समितीने डॉक्टरांना नोटील पाठवली आहे. पीडितेच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलीस तपासात पीडितेवर ३५ वर्षीय सख्ख्या मामानेही अत्याचार केल्याचं समोर आलं. या प्रकरणात चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पोलीस अधीक्षक विशाल आनंद पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com