Cash found from Parliament seat: खासदार संसदेत पैसे घेऊन जाऊ शकतात? काय आहेत नियम?

Rajya Sabha cash found Abhishek Singhvi seat: भारतीय संसदेत खासदार पर्स आणि आवश्यक रक्कम घेऊन जाऊ शकतात. नोटांचे बंडल किंवा जास्त पैसे घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. संसदेत खासदार कोणत्या गोष्टी नेणं टाळतात?
Rajya Sabha (संग्रहित छायाचित्र)
Rajya SabhaSaam Tv
Published On

संसदेच्या हिवाळी अधिनेशनात सध्या काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांची चर्चा होत आहे, आणि ही चर्चा आहे त्यांच्या जागेवर सापडलेल्या पैशांच्या बंडलाची. ५ डिसेंबरला खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या जागेवरून नोटाचे बंडल सापडले. त्यावरून सदनात मोठा गदारोळ झाला. याबाबात सभापती धनखड म्हणाले, '५ डिसेंबरला सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांना क्रमांक २२२ मधून रोख सापडली. ही जागा तेलंगणाचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आली आहे. याचा तपास नियमांनुसार केला जाईल'.

पण सिंघवी यांनी हे आरोप फेटाळून लावले. 'माझ्या खिशात ५०० रूपयाची नोट असते. नोटांचे बंडल नाही.' मात्र, संसदेच्या आचारसंहिता आणि नियमांनूसार कोणत्याही खासदाराला संसदेत पैसे किंवा महिलांना पर्स घेऊन जाण्याची मुभा नाही. संसदेत पैसे घेऊन न जाण्याचे नियम काय आहेत? एखादी महिला संसदेत पर्स घेऊन जाऊ शकते का? काय आहेत नियम पाहूयात?

संसदेत पर्स घेऊन जाण्यास मनाई

२००८ साली भर सभेत काही खासदारांनी नोटा उधळल्या होत्या. तेव्हा संसदेच्या प्रतिष्ठेचा अपमान झाला होता. त्यावर कडाडून टीका झाली. तेव्हापासून संसदेत मोठी रक्कम आणण्यावर बंदी घालण्यात आली. याबाबत कडक नियम करण्यात आले. त्यामुळे संसदेत कोणतीही व्यक्ती पैसे घेऊन जाऊ शकत नाही.

खासदार आपल्यासोबत काय घेऊन जाऊ शकतात?

भारतीय संसदेच्या नियमांनुसार, खासदारांना संसदेत आवश्यक असलेल्या गोष्टी नेण्याची प्रवानगी आहे. ज्यात,

- महत्वाची कागदपत्रे.

- कायदेशीर व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे, नोट्स, अहवाल आणि बिल्स.

- तयार केलेली भाषणे किंवा इतर संदर्भ साहित्य.

- इलेक्ट्रॉनिक उपकरणे.

- मर्यादित वापरासाठी मोबाईल फोन, टॅब्लेट किंवा लॅपटॉप.

- पिशवी, पर्स, स्टेशनरी किंवा इतर उपयुक्त वैयक्तिक वस्तू.

Rajya Sabha (संग्रहित छायाचित्र)
Sansad Ratna Award: खासदार श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर, १७ व्या लोकसभेतील कामगिरीचा गौरव

संसदेत काय घेऊन जाता येत नाही?

- प्लेकार्ड, पोस्टर, बॅनर.

- मोठ्या प्रमाणात रोख रक्कम.

- अनधिकृत इलेक्ट्रॉनिक उपकरणे.

- परवानगी दिल्याशिवाय रेकॉर्डिंग उपकरणे किंवा कॅमेरा.

- शस्त्रे किंवा संरक्षणात्म उपकरणे.

- आवाज करणारी साधने.

जर यापैकी कोणतीही गोष्ट खासदारासोबत आढळल्यास संसदेची शिस्तपालन समिती कारवाई करू शकते. तसेच निंलबितही केले जाऊ शकते.

Edited by: - Bhagyashree Kamble

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com