पायाचे अक्षरश: तुकडे, रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात; थ्रेशरमध्ये तोल गेल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू

Amravati News : अमोलचा डावा पाय थ्रेशरच्या पट्ट्यात अडकून आतमध्ये गेला. यामुळे अमोल डिके याच्या पायाचे अक्षरशः तुकडे झाले, रक्तबंबाळ अवस्थेत तेथील उपस्थित मजुरांनी दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला.
farmer dies after getting stuck in grain thresher
farmer dies after getting stuck in grain thresherSaamTV
Published On

अमरावती : शेतामध्ये हरभरा काढण्यासाठी लावण्यात आलेल्या थ्रेशरमध्ये हरभऱ्याची मळणी करताना अचानक पाय घसरून शेत मजुराचा थ्रेशरमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील खल्लार जवळील बेंबळा खुर्द शेत शिवारात घडली आहे. सदर शेत मजुराचे नाव अमोल अनील डिके (रा. खाल्लर, वय ३७) असं आहे.

farmer dies after getting stuck in grain thresher
लेकीच्या बर्थडेला 'छावा' चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक, कोल्हापुरातल्या बापाची अख्ख्या पंचक्रोशीत चर्चा

आज बेंबाला खुर्दमध्ये अनिल कळंके यांच्या शेतात हरबरा पिकांची मळणी सुरु असताना मृतक अमोल हा हरभऱ्याच्या गंजीवर चढून थ्रेशर मध्ये हरभरा टाकत होता, यावेळी हरभऱ्याची गंजी उचलताना असताना अचानक शेतमजुराचा पाय घसरून तो थ्रेशरमध्ये पडला. यावेळी थ्रेशर चालू होते.

farmer dies after getting stuck in grain thresher
लेकीच्या बर्थडेला 'छावा' चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक, कोल्हापुरातल्या बापाची अख्ख्या पंचक्रोशीत चर्चा

मृतक अमोलचा डावा पाय थ्रेशरच्या पट्ट्यात अडकून आतमध्ये गेला. यामुळे अमोल डिके याच्या पायाचे अक्षरशः तुकडे झाले, रक्तभंबाळ अवस्थेत तेथील उपस्थित मजुरांनी दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात तातडीने सूचना देऊन ॲम्बुलन्स गाडी बोलावली, सदर मजुराची परिस्थिती अत्यंत गंभीर स्थितीत असल्याने त्यास तातडीने अमरावती येथील रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com