राज्यात खरात प्रकरणानं महिलांच्या शोषणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाच शिक्षणाच्या नावाखाली तरुणींचं लैगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघ़डकीस आलाय...प्रेमाच्या नावाखाली वासनेचा बाजार मांडणाऱ्या अयान अहमद या 19 वर्षाच्या तरूणानं तब्बल 180 तरुणींचे लैगिक शोषण करून 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप खासदार अनिल बोंडेंनी केला....
अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उर्दू भाषेत व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट ग्रुप तयार केले गेले.. याचं ग्रुपमध्ये मुला- मुलींना शिक्षणाच्या नावाखाली समाविष्ट केलं गेलं... काही मुस्लीम तरुणांना मुलींचे नंबर देण्यात आले..हे तरुण मैत्री करून सुरुवातीला तरुणींसोबत सामान्य गप्पा मारत...मात्र त्यानंतर अश्लील लिंक, व्हिडिओ आणि मेसेज पाठवून ब्लॅकमेलिंगचं जाळं विणत...याच ग्रुपवरून तरुणींना अश्लील व्हिडिओ पाठवत...नंतर मुलींचे नंबर शेअर करण्याची आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत...मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठीही आरोपींकडून धमकावलं जातं...काही तरुणींचे व्हिडिओ आरोपीने पॉर्न साईडवर टाकल्याचाही आरोप बोंडेंनी केलाय...
याप्रकरणी पोलिसांनी अयानला ताब्यात घेऊन पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असला तरी तीन दिवसांपासून पीडित तरुणींचे व्हिडिओ व्हायरल होत असतानाही पोलिसांनी 'सुमोटो' कारवाई का केली नाही? असा सवालही आता उपस्थित केला जातोय... खर तर हे प्रकरण केवळ एका शहरापुरतं मर्यादित नाही, तर याची पाळमुळं मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांपर्यंत गेली असल्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे अयानच्या चौकशीनंतर या रॅकेटचा मास्टरमाईंड शोधून काढणं हे पोलिसांमोरचं मोठं आव्हानं असणार आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.