Crime News : महिलांनी पाजली दारू, नराधमांनी केला सामूहिक अत्याचार; १७ वर्षीय मुलीसोबत घडला भयावह प्रकार

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Amravati Crime News
Amravati Crime NewsSaam TV

अमर घटारे, साम टीव्ही

Amravati Crime News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकीकडे महिला अत्याचाराविरोधात कठोरात कठोर पाऊलं उचललण्याची मागणी होत असताना दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला आहे. (Latest Marathi News)

Amravati Crime News
Mumbai Crime News : मुंबई हादरली! १७ वर्षीय मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार, संतापजनक घटना

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात ही संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन जणांविरोधात बाल लैंगिक कायद्या अंतर्गत आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आजीच्या गावी आली होती. यावेळी घरात कुणी नसल्याची संधी साधून दोन महिलांनी तिला बळजबरीने दारू पाजली. इतक्यावरच या महिला थांबल्या नाहीत. तर त्यांनी दोन नराधमांना (Crime News)  घरात बोलावले. त्यानंतर दरवाजा बाहेरून लावून त्या घराबाहेर निघून गेल्या.

Amravati Crime News
Ahmednagar News : ​बोअरवेलमध्ये पडलेल्या 'त्या' चिमुकल्याचा अखेर मृत्यू; तब्बल ८ तासांनंतर मृतदेह काढला बाहेर

याच गोष्टीचा फायदा घेत नराधमांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला. यातून कशीबशी सुटका करून तिने शिरजगाव कसबा पोलिसांत (Police) तक्रार दिली. या प्रकरणी बाल लैंगिक कायद्या अंतर्गत आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला. तर ४ आरोपींना अटक केली आहे. सद्या न्यायालयाने २ नराधमांस दोन दिवसीय पीसीआर तर दोन महिलांना एमसीआर दिला आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com