Ahmednagar News : ​बोअरवेलमध्ये पडलेल्या 'त्या' चिमुकल्याचा अखेर मृत्यू; तब्बल ८ तासांनंतर मृतदेह काढला बाहेर

Death in Borewell : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे १५ फुटी बोअरवेल मध्ये पडलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याचा अखेर मृत्यू झाला आहे.
Ahmednagar news
Ahmednagar news Saam tv

सुशील थोरात, साम टीव्ही

Kopardi News : अहमदनगर जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे १५ फुटी बोअरवेल मध्ये पडलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याचा अखेर मृत्यू झाला आहे. सागर बारेला असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. सागरला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने तब्बल ८ तास बचावकार्य केले. मात्र, सागरला वाचवण्यात अपयश आले. या घटनेमुळे कोपर्डी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  (Latest Marathi News)

Ahmednagar news
Maharashtra Politics : अंबरनाथमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; पदाधिकाऱ्यांसोबतच शहर शाखाही शिंदेंच्या शिवसेनेकडे

खरंतर मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथील बुऱ्हाणपुर येथून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडीच काम करण्यासाठी बरेला कुटुंबीय कर्जत तालुक्यात आलं. त्यांना ऊस तोडीच काम मिळाल व ते शेतात एका झोपडीत राहू लागले. मात्र त्याचं शेतात असलेल्या एका बोअरवेल मध्ये बलरे कुटुंबातील ५ वर्षीय सागर बरेला हा खेळताना पडला.

सोमवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास सागर बोअरवेल मध्ये पडल्यानंतर त्याची शोधाशोध झाली मात्र रडण्याच्या आवाजाने अखेरकार तो बोअरवेल मध्ये पडल्याचे दिसले. दरम्यान कर्जत येथील प्रशासनाने NDRF टीम दाखल होईपर्यंत ऑक्सिजनच्या नळ्या बोअरवेल मध्ये सोडल्या होत्या.

NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर १५ फूट खोल बोअरवेल मध्ये पडलेला सागर लवकर बाहेर निघेल अशी आशा होती. मात्र सागरला बाहेर काढण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात १० फुटानंतर अचानक खडक लागला आणि सागरला बाहेर काढण्यासाठी तब्बल ८ तासांचा कालावधी गेला.

दरम्यान NDRF च्या अथक बचावकार्यामुळे ५ वर्षीय सागरला 15 फुटी बोअरवेल मधून बाहेर काढण्यात आले .मात्र त्या दरम्यान त्याला वाचवण्यात यंत्रणेला अपयश आले होते. ऊसतोडणीसाठी परराज्यातून आलेल्या कुटुंबावर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com