Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Amravati Ayan Ahmed Case Update: अमरावतीमधील १८० मुलींचे लैंगिक शोषण करणारा आरोपी अयान अहमदचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आलिशान कार, पिस्तूल, ३ ते ४ आयफोन आणि पैशांचा बंडल सोबत घेऊन फिरणाऱ्या आयनचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले
Ayan Ahmedsaam tv
Published On

Summary -

  • अमरावतीतील परतवाडा प्रकरणात नवा व्हिडिओ समोर

  • अयान अहमदच्या नव्या व्हिडीओमुळे पोलिसही चक्रावले

  • अयान अहमदकडे ऐवढा पैसा आला कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

  • पोलिस आणि एसआयटीकडून सखोल तपास सुरू

अमरावतीच्या परतवाडामधील १८० मुलींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी अयान अहमदचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. अयान अहमदच्या लाईफस्टाईलचा चक्रावून टाकणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आलिशान कारमध्ये स्टाईलमध्ये फिरतानाचा त्याचा हा व्हिडीओ पाहून पोलिसही चक्रावले. थार कारमधून प्रवास, पिस्तुल, तीन-चार महागडे आयफोन आणि सोबतच पैशांचा बंडल. आरोपी अयान अहमदकडे ऐवढा पैसा आला कुठून आला प्रश्न उपस्थित केला जात आहे.

'ये जरून कुछ बडा करेगा...क्योकी इसे जिंदगी से जादा अपनी जित प्यारी है...' असा अयानच्या रिल्समध्ये उल्लेख करण्यात आला आहे. आरोपी अयान चालवत असलेली नवी कोरी थार कार कुणाच्या मालकीची आहे. अयानकडे एवढ्या महागड्या गाड्या कुणाच्या? अयानला पिस्तूल वापराचे लायसन कोणी दिले? अयानच्या मालकीच्या की दुसऱ्यांच्या? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. अयान वापरत असलेल्या थार कारचा नंबर-MH-27-DL-3100 असा Eus.

Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले
खोलीसाठी मित्राला द्यायचा 500 रुपये; अहमद अयान मुलींचं लैंगिक शोषण कसं करायचा? कुठे शूट करायचा डर्टी पिक्चर?

अमरावतीच्या परतवाडा प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आरोपी अयान अहमदला केलेल्या कृत्याचा पश्चातापही नाही. केलेल्या कृत्याची त्याने अजूनही खंत बोलून दाखवली नाही, पोलिस चौकशीतून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आरोपी अयान एसआयटी चौकशीत सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले
लव्ह जिहादची स्पर्धा, मित्रानेच फोडलं बिंग, अमरावतीतील लैंगिक शोषणात विकृतीची परिसीमा

मुलींसोबत संवाद कसा साधायचा?, त्यांना जाळ्यात कसं ओढायचं? याची कबुली पोलिसांना त्यांने दिली आहे. स्वतःच्या बचावासाठी अमरावतीच्या फ्लॅटवर जे कृत्य झालं ते दोघांच्याही संमतीने झाल्याचा केविळवाणा दावा आरोपी अयानने केला आहे. मात्र १५ वर्षाची एक पिडीत समोर आल्याने त्याच्या दाव्याची पोल खोल झाली आहे. या प्रकरणात आयनची पोलिस कसून चौकशी करत आहे. महत्वाचे म्हणजे पीडित मुली समोर येऊन त्याच्याविरोधात तक्रार करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे.

Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले
खाकीवर डाग! ज्यानं १८० मुलींचं लैंगिक शोषण केलं, त्या अयान अहमदला पोलिसांनी भरवला केक; व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com