

आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केलं
आरोपीच्या मित्राने त्याला खोली उपलब्ध करून दिली
आरोपीकडून मोबाईल व इतर पुरावे जप्त करण्यात आले
अमरावतीच्या परतवाडा शहरात लैंगिक अत्याचार प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपी अहमद अयाननं जवळपास १८० मुलींचे लैंगिक शोषण केले आहे, त्या पीडितेच्या व्हिडिओ बनवून तो त्यांना ब्लॅकमेल देखील करायचा. आता याप्रकरणी नवा खुलासा झाला आहे, अयानला त्याच्या काळ्या कारनाम्यात त्याचा मित्र मदत करायचा. त्याच्या कारनाम्यासाठी जागा उपलब्ध करून देत होता.
आरोपी पीडित तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा नंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा. पीडितांवर लैंगिक अत्याचार करत असताना तो त्यांचे काही फोटो आणि अश्लील व्हिडिओ काढायचा. आता या प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आरोपी अहमद अयान हा पीडित तरुणींचं लैंगिक शोषण कसं करायचा? अश्लील व्हिडीओ कसे शूट व्हायचे याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.
अहमद अयान हा पीडित तरुणींना अमरावतीच्या कठोरा नाका भागातील एका रेसिडेन्सीमधील फ्लॅटवर नेत असायचा. या फ्लॅटवर मुलींचे लैंगिक शोषण करायचा. त्याचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असायचा. तिसऱ्या मजल्यावर असणारा हा प्लॅट त्याच्या मित्राचा आहे. त्यासाठी तो त्याच्या मित्राला पाचशे रुपये द्यायचा. याच फ्लॅटवरून पोलिसांनी आता एका आरोपीला अटक केली आहे. या फ्लॅटमध्ये अनेकदा मुलीना आणल्या जात असल्याचेही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
आतापर्यंत या लैंगिक शोषण प्रकरणात ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. चार जणांना चौकशी ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपी अयान अहमद कठोरा नाका परिसरातील ज्या फ्लॅटवर मुलींना आणत होता. त्या रेसिडेन्सीमधील इतर लोकांनी फ्लॅट मालकाला यापूर्वी तक्रार केली होती, पण फ्लॅट मालकाने कुठलीही दखल घेतली नाही, असा आरोप तेथे राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे. आरोपीने इतरही अनेक तरुणींना या प्लॅटवर आणलं होतं का? याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.