Ambenali Ghat Closed : आंबेनळी घाटातील वाहतुकीवर १५ ऑगस्टपर्यंत निर्बंध, दरड कोसळण्याचा धोका

Ambenali Ghat Closed : कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा आंबेनळी घाट अवजड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दरडी कोसळण्याच्या संभाव्य धोक्यामुळं रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
आंबेनळी घाटातील वाहतूक १५ ऑगस्टपर्यंत बंद
Ambenali Ghat Closedsaam tv
Published On
Summary
  • आंबेनळी घाटातील वाहतुकीवर 15 ऑगस्टपर्यंत निर्बंध

  • अवजड वाहनांसाठी वाहतूक पूर्णपणे बंद

  • रेड, ऑरेंज अलर्ट कालावधी आणि रात्रीच्या वेळी घाटरस्ता पूर्णपणे बंद

  • दरडी कोसळण्‍याच्‍या घटना लक्षात घेऊन निर्णय

सचिन कदम, रायगड | साम टीव्ही प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटातील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. हा घाटरस्ता १५ ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद असणार आहे. पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असेल त्यावेळी हलक्या वाहनांसाठीही हा घाटरस्ता पूर्णपणे बंद असेल.रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.

घाटरस्ता नेमका कुणासाठी बंद?

पोलादपूर-महाबळेश्वर मार्ग हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडतो. या मार्गावरील आंबेनळी घाटरस्त्यावरील वाहतुकीबाबत रायगड जिल्हा प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. आंबेनळी घाटातील वाहतूक १५ ऑगस्टपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद असेल. या घाटरस्त्यावर दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांनी या निर्णयासंबंधी अधिसूचना काढली आहे.

आंबेनळी घाटरस्ता पावसाळ्यात धोकादायक

मागील काही दिवसांत या घाटरस्त्यावर दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.यापूर्वीही या घाटरस्त्यातील वाहतूक बंद करण्यात आली होती. दरडी कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळं खबरदारी म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद केली जाते. मुसळधार पावसात रस्त्यावर दरड कोसळण्याचा नेहमी धोका असतो.

हलक्या वाहनांसाठीही महत्वाच्या सूचना

आंबेनळी घाटरस्ता १५ ऑगस्टपर्यंत अवजड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असेल. हलक्या वाहनांसाठी सध्या मुभा देण्यात आली असली तरी, पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असेल त्या कालावधीत तो बंद असणार आहे. तसेच रात्रीच्या वेळीही या मार्गावरील वाहतूक बंद राहील.

पर्यायी मार्ग कोणता?

पावसाळ्यात आंबेनळी घाटात दरडी कोसळण्याचा धोका असतो. अनेकदा दरडी कोसळून घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. तर दरड कोसळून मोठी दुर्घटनाही होऊ शकते. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनानं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अवजड वाहनांसाठी १५ ऑगस्टपर्यंत हा घाटरस्ता पूर्ण बंद असेल.

आंबेनळी घाटातील वाहतूक १५ ऑगस्टपर्यंत बंद
Darya Ghat: मुंबई- पुण्यापासून जवळील दाऱ्या घाट कधी पाहिला का? निसर्गसौंदर्यचा अद्भूत नजारा अनुभवा

या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची माहिती प्रशासनानं दिली आहे. पर्यायी मार्ग म्हणून ताम्हिणी घाटमार्गे पुणे किंवा चिपळूण-पाटण-सातारा मार्गे प्रवास करावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Q

आंबेनळी घाट नेमका कुठे आहे?

A

रायगड जिल्ह्यात पोलादपूर आणि साताऱ्यातील महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाट आहे.

Q

आंबेनळी घाटातील वाहतूक कोणत्या प्रकारच्या वाहनांसाठी बंद आहे?

A

अवजड वाहनांसाठी आंबेनळी घाटातील वाहतूक १५ ऑगस्टपर्यंत बंद आहे.

Q

हलक्या वाहनांसाठी हा आंबेनळी घाट कधी बंद असेल?

A

पावसाचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट असेल त्यावेळी हा घाटरस्ता हलक्या वाहनांसाठी बंद असेल.

Q

आंबेनळी घाटरस्ता बंद असल्यास प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग कोणता?

A

ताम्हिणी घाटमार्गे पुणे किंवा चिपळूण-पाटण-सातारा मार्गाने प्रवाशांना जाता येईल.

Q

आंबेनळी घाटरस्ता का बंद करण्यात आला?

A

या घाटात दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका असतो. मोठी दुर्घटना होऊ नये, यासाठी घाटरस्त्यावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आंबेनळी घाटातील वाहतूक १५ ऑगस्टपर्यंत बंद
Malshej Ghat Tourism : पाऊस अन् भटकंती, माळशेज घाटजवळील २ सुंदर पिकनिक स्पॉट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com