

बीड - जास्तीच्या पैशाचा मोह कधी कसा कोणास नडेल हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) समोर आला आहे. शेअर ट्रेनिंग कंपनी मधून जास्तीचे पैसे करून देण्याचे आमिष दाखवून, अंबाजोगाईच्या दोघांना पुण्यातील व्यक्तींनी तब्बल 50 लाखांचा गंडा घातल्याचं उघडकीस आल आहे.
हे देखील पहा -
अंबाजोगाई शेअर ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंग मधून आम्ही खूप फायदा कमावतो. त्यासोबतच बांधकाम व्यवसायात आमची शेकडो कोटींचे कामे चालू आहेत, मी अनेकांना करोडपती केले आहे. आमच्या सांगण्यानुसार एका कंपनीत पैसे गुंतवल्यास तुम्हाला ज्यादा परतावा मिळवून देऊत. असे आमिष दाखवून पुण्याच्या कंपनीसह एकाने अंबाजोगाई तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील आणि अशोक भोरे यांना 50 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी दत्तात्रय पाटील आणि अशोक भोरे दोन्ही रा.अंबाजोगाई यांच्या फिर्यादीवरून, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात, रिलायबल ट्रेडर्स आणि अभिजीत आप्पासाहेब वाठारे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शेअर ट्रेडिंग , फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावावर तब्बल 50 लाखांचा गंडा घातल्याने, पैसे गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.