

डोंबिवली - नववर्ष स्वागत यात्रा म्हणाली की डोंबिवलीची (Dombivali) आठवण येतेच.कारण पहिली नववर्ष स्वागत यात्रा ही डोंबिवली मधून निघाली. मात्र कोरोनामुळे (Corona) गेली 2 वर्ष स्वागत यात्रा निघाली न्हवती. दरम्यान डोंबिवली शहरातील निर्बंध कायम आहेत. दरम्यान हे निर्बंध शिथिल करावे अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आणि डोंबिवलीकर दोन वर्षांनंतर शोभा यात्रा काढण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली.
हे देखील पहा -
तसेच मराठी नव्या वर्षाची सुरुवात गुढी उभारत आणि स्वागतयात्रा काढत करण्याची परंपरा रुजविणाऱ्या डोंबिवली शहरात यंदा स्वागत यात्रा निघणार का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र याच पार्श्वभूमीवर डोंबिवली श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे विश्वस्तांची एक बैठक पार पडली. या बैठकीत यंदाच्या वर्षी गुडी पाढव्याला नववर्ष स्वागत यात्र काढली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान या यात्रेत फक्त पालखी राहणार आहे. ठिकठिकाणी रांगोळ्य़ा काढल्या जातील. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम केले जाणार आहेत.यंदा स्वागत यात्रेत चित्ररथ आणि देखावे या यात्रेत नसतील. कोरोना नियमावलीचे पालन करुन कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री गणेश मंदिर संस्थानचे विश्वस्थ राहूल दामले यांनी दिली.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.