बनावट आधारकार्डावर बालविवाहाचा प्रयत्न फसला; मांडव सजला, पाहुणे जमले, तेवढ्यात 'चाईल्डलाईन'ने असा उधळला डाव

akola Latest news : अकोल्यात बालविवाहाचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आलं आहे. हा बालविवाह 'चाईल्डलाईन'ने तत्काळ थांबवला.
akola
akola Latest news Saam tv
Published On
Summary

बार्शीटाकळीत बनावट आधारकार्डावर अल्पवयीन मुलीचा विवाहाचा प्रयत्न

चाईल्डलाईनने उधळला बालविवाह

पथकाने दोन्ही कुटुंबाला दिली समज

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोलाच्या बार्शीटाकळी तालुक्यातील एका गावात बनावट आधारकार्डावर एका अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याचा प्रयत्न फसला. चाईल्डलाईन आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या सतर्कता, तसेच जलद कार्यवाहीमुळे हा प्रयत्न फसलाय.

अकोल्यातील बार्शीटाकळी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका गावात १७ वर्षीय मुलीचा विवाह 25 वर्षीय तरुणासोबत ठरला होता. ही माहिती चाईल्ड लाईन, 'ॲसेस टू जस्टीस', आय. एस. डब्ल्यू. एस. यांना मिळाली. त्यानंतर या टीमने धाडसी कारवाई करत बालविवाह थांबवला.

akola
Shocking : भंडारा हादरलं! शिवमंदिरात दुर्गा देवीच्या मूर्तीजवळ नवजात बालक मृतावस्थेत आढळलं; नेमकं प्रकरण काय?

मुलीचे आधारकार्ड वय 17 वर्ष असतानाही वाढवून बनावट कार्ड तयार केल्याचे आढळले. टीमने घटनास्थळी पोहोचून पालकांना ग्रामपंचायत कार्यालयात आणलं. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 बद्दल माहिती देऊन बाल विवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. अकोलाच्या बाल कल्याण समितीसमोर मांडण्यात आले. समुपदेशन आणि कडक इशारा देत बाल कल्याण समितीसमोर दोन्ही पक्षांची बैठक घेण्यात आली. त्यांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.

akola
Kharat Case : भोंदू खरातला ३९ आमदार भेटले, माजी मंत्र्यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

टीमने अल्पवयीन वयात लग्न झाल्यास मुलीच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक आयुष्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यात आली. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करणे हा कायदेशीर गुन्हा असल्याचे सांगितले. यावेळी दोन्ही बाजूंच्या पालकांकडून मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न लावणार नाही, या आशयाचे कायदेशीर हमीपत्र लिहून घेण्यात आले.

बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, डॉ. विनय दांदळे, ॲड. शीला तोष्णीवाल, प्रांजली जयस्वाल आदींनी काम केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com