Akola Crime : बड्या राजकीय महिला नेत्याच्या नातीचं शाळेतून अपहरण; पोलिसांकडून शोधाशोध सुरु

Akola Crime News : अकोल्यात राजकीय महिला नेत्याच्या नातीचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून शोधाशोध सुरु करण्यात आली आहे.
akola news
akola crime saam tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण झालं आहे. अकोल्यातल्या कृषी नगर भागातल्या एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातून या 12 वर्षीय मुलीच अपहरण झाल आहे. मुलीच्या अपहरण प्रकरणात अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

akola news
Akola Toilet Story : टॉयलेट नाही घरी, बायको गेली माहेरी; सासरी परतण्यासाठी ठेवली एक अट, वाचा सविस्तर

सद्यस्थित पोलीस ठाण्यात अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.. विशेष म्हणजे वंचित पदाधिकारी आणि कार्यकर्तेही पोलीस ठाण्यात पोचले आहेत. पोलिसांनी तातडीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केलाय. अपहरणाच्या या प्रकारामुळं अकोला शहरात आणि कृषी नगर परिसरात खळबळ उडाली आहे.

akola news
Akola News : काँग्रेस आमदार साजिदखान पठाण यांना नागपूर खंडपीठाची नोटीस; अवैध मतदानाबाबत भाजप उमेदवाराकडून याचिका

मुलीच्या शोधात सिव्हिल लाईन पोलिसांचे दोन पथक गठीत करण्यात आले आहेत, मुलीच्या शोधात पथक रवाना झालेत. अद्यापपर्यंत पाच ते सहा संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

आमदार अमोल मिटकरींनी दिल्या सूचना

अकोल्यातल्या कृषी नगर भागात असलेल्या गजबजलेल्या वस्तीतून आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास या 12 वर्षीय मुलीचं अपहरण झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक बच्चनसिंग तसेच ठाणेदार जयवंत सातव यांच्याशी फोनवर चर्चा करून तातडीने मुलीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.a

akola news
Akola News: बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; वर्गमित्रासह पोलीस अधिकाऱ्याच्या त्रासामुळं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप

मुलीच्या कुटुंबियांनी काही संशयितांची त्यांची नावे पोलिसांना दिली आहेत. आता त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केल्या जात आहे.. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तिथली पाहाणी पोलिसांनी केली असल्याची माहिती पोलीस अधिकारी जयवंत सातव यांनी दिली.

akola news
Akola ST Bus Fire: प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी बस, वाटेत अचानक घेतला पेट; बघता बघता...

दरम्यान, अकोला शहर आणि परिसरात अल्पवयीन मुलींची छेडछाड तसंच अपहरणाचे प्रकार वाढले आहेये. पालक आणि मुलींमध्ये भितीचं वातावरण निर्माण होत आहे, मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांचा अकोला पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक आणि वंचितकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com