Akola News : काँग्रेस आमदार साजिदखान पठाण यांना नागपूर खंडपीठाची नोटीस; अवैध मतदानाबाबत भाजप उमेदवाराकडून याचिका

Akola : गतवर्षी म्हणजे २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवाराचा पराभव झाला होता. काँग्रेसने भाजपकडून तब्बल ३० वर्षानंतर हा मतदारसंघ काबीज केला होता
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

अक्षय गवळी
अकोला
: अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिदखान पठाण यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून नोटीस देण्यात आली आहे. अकोला पश्चिममधील भाजपचे पराभूत उमेदवार विजय अग्रवाल यांची साजिदखान पठाण यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल केली होती. यावर बुधवारी नागपूर खंडपीठाने आमदार पठाण यांना सदरची नोटीस बजावली आहे.  

गतवर्षी म्हणजे २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवाराचा पराभव झाला होता. काँग्रेसने भाजपकडून तब्बल ३० वर्षानंतर हा मतदारसंघ काबीज केला होता. काँग्रेसच्या साजिदखान पठाण यांनी अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांचा १२८३ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे साजिदखान पठाण यांना ८८ हजार ७१८ तर भाजपचे विजय अग्रवाल यांना ८७ हजार ४३५ मते मिळाली होती. 

Akola News
Pune Police : मारहाण केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन; पुणे पोलिस दलात खळबळ, भाऊ- बहिणीवरही गुन्हा दाखल

अवैध मतदान झाल्याचा आरोप 

विधानसभा निवडणुकीत मुस्लिमबहुल अनेक बुथवर अवैध मतदान झाल्यामुळे आपला पराभव झाल्याचा विजय अग्रवाल यांचा याचिकेतून आरोप केला होता. याआधी विजय अग्रवाल यांनी निवडणूक मतदार यादीत काँग्रेसने ३५ हजारांवर बोगस मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप केला होता. अग्रवालांनी याबाबत प्रशासनाकडे आरोप केले होते. अनेक बुथवर अवैध मतदान झाल्याचा आरोप करत विजय अग्रवाल यांनी ही निवडणूक अवैध ठरवून रद्द करण्याची मागणी केली आहे. 

Akola News
Solar Project : जळगाव जिल्हा बनतोय 'ऊर्जा हब'; ३९०० एकर जमिनीवर उभारला जाणार सौर प्रकल्प

उत्तरासाठी चार आठवड्यांची मुदत 

दरम्यान विजय अग्रवाल यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. उच़्च न्यायालयाने याबाबत आमदार साजिदखान पठाण यांना नोटीस दिली असून सदर आरोपावरील उत्तरासाठी चार आठवड्याची मुदत दिली आहे. तसेच साजिदखान यांनी दिलेल्या उत्तरानंतर याचिकेवर पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com