अकोल्यात पोलीस कॉन्स्टेबलवर तरुणीने गंभीर आरोप केले
लग्नाचे स्वप्न दाखवून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा दावा
तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली
प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलीस दलात खळबळ
अक्षय गवळी, अकोला
पोलीस हे जनतेचे सुरक्षा रक्षक असतात, मात्र जनतेचा रक्षणकर्ताच भक्षक झाल्याची धक्कादायक बातमी अकोल्यातून समोर आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल सचिन केशव गायकवाडने लग्नाचे स्वप्न दाखवून महिलेवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. सचिन गायकवाड हा अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता, दरम्यान त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सचिन गायकवाड याने पीडितेशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. या आमिषाला भुलून आरोपीने तिच्यासोबत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. मात्र, त्यानंतर महिलेने लग्नासाठी आरोपीकडे तगादा लावला असता लग्नास नकार देत आरोपीने फिर्यादीचा मानसिक छळ सुरू केला. वारंवार अपमानास्पद वागणूक देत तिच्यावर दबाव टाकण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडित महिलेने पुढे म्हटले की, आरोपीने तिला “तू मला पुन्हा भेटायला आली तर तुला जिवे मारून टाकीन” अशी धमकी दिली. तसेच आरोपीने शिवीगाळ करून तिच्यावर दबाव टाकल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या सर्व घटनांमुळे पीडित महिला गंभीर त्रासात राहिली आणि अखेर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. सचिन गायकवाड अकोला येथील निमवाडी परिसरातील नवीन पोलीस वसाहतीतील बिल्डिंग क्रमांक १ (बी), क्वार्टर क्रमांक ५४ येथे वास्तव्यास आहे.
आरोपीविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम ६९, ३५२ आणि ३५१ (२)(३) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय गवई करीत आहेत. पोलिसांनी सांगितले की, प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे. पीडितेचे जबाब घेतले जात आहेत आणि इतर पुराव्यांनुसार पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे अकोला पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस विभागाने गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.