Akola News : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द; कोर्टाचा मोठा निर्णय

Assembly by-elections cancelled : दरम्यान या निवडणुकीसाठी काँग्रेसने पश्चिम मतदारसंघात साजिद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर केली होती. तर भाजपकडून अद्यापही कोणताही उमेदवार मैदानात नव्हता.
Akola News
Akola News Saam TV

अक्षय गवळी

Akola Assembly by-elections cancelled :

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. एक वर्षापेक्षा कमी कार्यकाळ बाकी असल्यामुळे हायकोर्टाने ही निवडणूक रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Akola News
Akola Lok Sabha Constituency History: अकोल्यात कोण बाजी मारणार? या लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय?

या पोट निवडणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात अनिल शिवकुमार दुबे यांनी याचिका दाखल केली होती. फक्त तीन महिन्याच्या कालावधीसाठी जनतेच्या पैशाचा अपव्यय का करता? असा सवाल याचिकाकर्त्यांकडून निवडणूक आयोगाला करण्यात आला होता.

अनिल शिवमकुमार दुबे हे अकोल्याचे रहिवासी आहेत. दरम्यान 26 एप्रिलला अकोला पश्चिम पोट निवडणुकीसाठी मतदान होणार होतं. 4 जूनला निकाल लागणार होता, तर 28 मार्चला अधिसूचना जारी होणार होती.

भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने अकोला पश्चिम विधानसभेची जागा गेल्या काही दिवसांपासून रिक्त आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी काँग्रेसने पश्चिम मतदारसंघात साजिद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर केली होती. तर भाजपकडून अद्यापही कोणताही उमेदवार मैदानात नव्हता.

अशात आता अनिल शिवमकुमार दुबे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायधीश अनिल किलोर आणि न्यायधीश जवळकर यांच्या खंडपीठानं हे आदेश दिले आहेत.

Akola News
Dombivali Crime News : महिलेस लुटणा-या रिक्षाचालकाला अवघ्या सहा तासात अटक, डोंबिवली रामनगर पोलिसांची कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com