Akola Lok Sabha Constituency History: अकोल्यात कोण बाजी मारणार? या लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय?

Maharashtra Lok Sabha Election 2024 News in Marathi: अकोला लोकसभा मतदारसंघ हा प्रकाश आंबेडकरांचा बालेकिल्ला मानला जातो. पण याच मतदारसंघात सध्या भाजपचा दबदबा आहे. कारण मागील दोन निवडणुकांमध्ये भाजप नेते संजय धोत्रे यांनी लोकसभेचा गड जिंकलाय
Akola Loksabha Constituency History
Akola Loksabha Constituency HistorySaam tv

मयुर सावंत

Akola Political News:

अकोला लोकसभा मतदारसंघ हा प्रकाश आंबेडकरांचा बालेकिल्ला मानला जातो. पण याच मतदारसंघात सध्या भाजपचा दबदबा आहे. कारण मागील दोन निवडणुकांमध्ये भाजप नेते संजय धोत्रे यांनी लोकसभेचा गड जिंकलाय. प्रकाश आंबेडकरांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपनं धूळ चारलीये. यामागील नेमकं कारण काय? आता अकोला लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून येऊ शकतं? हे समजून घेऊयात. (Latest Marathi News)

अकोला लोकसभेचा भूगोल (खुला प्रवर्ग)

अकोट

बाळापूर

अकोला पश्चिम

अकोला पूर्व

मुर्तिजापूर

रिसोड

अकोला लोकसभेत एकूण 6 विधानसभा मतदारसंघ मोडतात. ते कोणते? तर अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मुर्तिजापूर आणि रिसोड! सहा मतदारसंघापैकी यामध्ये भाजपचे चार, ठाकरे गटाचा एक आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गात मोडतो.

Akola Loksabha Constituency History
Thane Politics : महायुतीकडून ठाणे लोकसभेच्या उमेदवाराची धुळवडीला घोषणा होणार, कोणाला मिळणार संधी?

आता 2014 मध्ये अकोला लोकसभेत कोण जिंकलं आणि 2019 मध्ये कोण जिंकलं... किती मतांनी जिंकलं ते पाहुयात..

नाव - संजय धोत्रे हिदायत पटेल

मतं - 4 लाख 55 हजार 996 3 लाख 12 हजार 10

मार्जिन - 1 लाख 43 हजार 986

2014 मध्ये भाजपचे नेते संजय धोत्रे यांना तब्बल 4 लाख 55 हजार 996 मतं मिळाली होती. तर काँग्रेस नेते हिदायत पटेल यांना 3 लाख 12 हजार 10 मतं मिळाली होती. यावेळी भाजपचं पारडं जड असल्यामुळे तब्बल 1 लाख 43 हजार 986 मतांच्या फरकाने संजय धोत्रे यांनी काँग्रेसला दणका दिला होता.

2019

नाव संजय धोत्रे प्रकाश आंबेडकर हिदायत पटेल

मतं 5 लाख 52 हजार 898 2 लाख 78 हजार 848 2 लाख 54 हजार 370

मार्जिन - 2 लाख 74 हजार 50

2019 मध्येही संजय धोत्रे यांना तब्बल 5 लाख 52 हजार 898 मताधिक्क्याने घवघवीत यश मिळालं होतं. तर वंचितला 2 लाख 78 हजार 848 इतकी मतं मिळाली होती. त्यामुळे वंचित दोन नंबरचा पक्ष ठरला. २०१४ मध्ये काँग्रेसच्या हिदायत पटेल यांना ३ लाखांपर्यंत मतं मिळाली होती. पण २०१९मध्ये त्याच हिदायत पटेल यांना १ लाख कमी मतं पडली. वंचितचा फटका काँग्रेसला बसला आणि त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार पडला.

Akola Loksabha Constituency History
Rahul Gandhi In Thane News | राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज ठाण्यात | Marathi News

मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये कुणाला किती टक्के मतदान झालंय, हे पाहणं तितकंच महत्त्वाचंय. चला तर एक नजर टाकुयात..

कुणाला किती टक्के मतदान?

भाजप काँग्रेस वंचित

2014 - 46.6 25.9 24.4

2019 - 49.9 22.7 24.9

2014 ला भाजपला 46.6 टक्के इतकी मतं पडली. तर काँग्रेसला 25.9 टक्के... 2019 मध्ये पाहिलं तर... चित्र काहीसं वेगळं आहे... भाजपला 49.9 टक्के मतं तर काँग्रेसला 22.7 टक्के मतं मिळाल्याचं दिसलं. पण दोन्ही निवडणुकांमध्ये वंचित 24-25 टक्क्यांवर दिसते.. त्यामुळे अकोल्यात वंचित फॅक्टर अत्यंत महत्त्वाचं आहे.

आता अकोल्यात कोणत्या पक्षाकडे लोकसभेत मतांचा कौल जातोय, हे पाहिलं... (पण 2014 आणि 2019मध्ये तिथे राजकीय ताकद कुणाची कशी होती.. तेही बघुयात..)

कुणाचे किती आमदार?

2014 2019 -

---------------------------------------

भाजप - 6 4

काँग्रेस - 0 1

शिवसेना - 0 1

2014मध्ये भाजपचे सहा आमदार होते. तर काँग्रेस आणि शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. पण) 2019 मध्ये भाजपचे चार आमदार होते.. तर काँग्रेस आणि शिवसेनेचा एक आमदार होता. पण आता 2024मध्ये काय चित्र आहे? महाराष्ट्राने 4 राजकीय भूकंप पाहिल्यानंतर कोण नेमकं कोणत्या गटात आहे? कुणी बंडखोरी केलीय? याचाही डेटा पाहुयात..

2024 मध्ये कुणाची किती ताकद?

----------------------

भाजप - 4

राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 0

राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 0

शिवसेना (शिंदे गट) - 0

शिवसेना (ठाकरे गट) - 1

काँग्रेस - 1

2024मधील पक्षांची ताकद पाहिली असता... अकोल्यात भाजपचे 4, ठाकरे गटाचा 1 आणि काँग्रेसचा 1 असे एकूण 6 आमदार विभागले गेले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटल्यानंतरचं चित्र थोडं वेगळं आहे. कारण अकोल्यात भाजपचे चार उमेदवार असल्यामुळे भाजपचं पारडं जड असल्याचं दिसून येतेय.

Akola Loksabha Constituency History
Lok Sabha Elections 2024: आनंदाचा शिधा मिळणार नाही, आचारसंहितेमुळे वाटपास प्रतिबंध

आता काही बेसिक प्रश्नांची उत्तरं शोधुयात...

1. उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का?

नाही

2. दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा?

दुसऱ्यांदा

3. युती किंवा आघाडीचा उमेदवाराला फायदा की तोटा?

- युतीला फायदा, आघाडीला तोटा

2019मध्ये भाजपचे खासदार संजय धोत्रे हे दुसऱ्यांदा निवडून आलेत. 2014 मध्येही त्यांनी काँग्रेसला टफ फाईट दिली होती. परंतु सध्याची परिस्थिती पाहता.. अकोला लोकसभा मतदारसंघात युतीला मोठा फायदा झाला असून आघाडीला तोटा झाल्याचं चित्र दिसतंय.

4. पक्षातील फुटीनंतरचं राजकारण कसंय?

पक्षातील फुटीनंतर मतदारसंघाचं राजकारण एकदम रंगतदार झालंय. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढल्यामुळे भाजपच्या उमेदवारानं आस्मान दाखवलं होतं. पण पक्षफुटीनंतर या मतदारसंघातील राजकीय गणितं बदलू शकतात. वंचित फॅक्टर अकोल्यात फार महत्त्वाचंय. त्यामुळे वंचित ज्यांच्यासोबत असणार, त्यांना 2024च्या लोकसभेत अकोल्यात सेफ गेम करता येऊ शकतो. आता वंचित इंडिया आघाडीत येते की नाही, हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. अशात वंचितने जर महाविकास आघाडीसोबत युती केली. तर त्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो, असं जाणकार सांगतात. त्यामुळे अकोल्यात वंचितची भूमिका गेमचेंजर असणार आहे.

भाजपने अकोला मतदारसंघातून अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केलीय. अनुप धोत्रे हे माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पूत्र आहेत. त्यामुळे अकोला लोकसभेच्या या सातबाऱ्याचा रिपोर्ट पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं? अकोल्याचा गड भाजप राखू शकेल का? की महाविकास आघाडी कमबॅक करेल? हे आता पाहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com