- अभिजित देशमुख
फुले आणण्यासाठी निघालेल्या हारविक्रेत्या महिला प्रवाशाला निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने तीचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तक्रार दाखल होतच डोंबिवली रामनगर पोलिसांनी अवघ्या सहा तासात महिलेला लुटणारा रिक्षा चालक अनिल खिल्लारे यांना बेड्या ठोकल्या. अनिल सोबत त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. (Maharashtra News)
डोंबिवली पूर्वेकडील आजदे गावात राहणारी तक्रादार महिला हार विक्रीचा व्यवसाय करते. शुक्रवारी (ता. 22 मार्च) डोंबिवली घारडा सर्कल येथून कल्याण एपीएमसी मार्केटच्या दिशेने महिला जात हाेती. घारडा सर्कल येथे ती एका रिक्षात बसली. या रिक्षात रिक्षा चालकासह आणखी तिघेजण बसले होते.
या रिक्षाचालकाने न्यू गोविंदवाडी बीएसयूपी इमारती जवळ निर्जनस्थळी रिक्षा थांबवली. रिक्षा चालकाने या महिलेला चाकूचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली .याचवेळी मागे बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी महिलेकडील सोन्याचे दागिने काढून घेतले. या घटनेनंतर महिलेने डोंबिवली रामनगर पोलिस गाठले. तिने घटनेबाबत पाेलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेत तपास सुरु केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यानंतर पाेलिसांनी अवघ्या सहा तासात हा गुन्हा उघडकीस आणला. डोंबिवली राम नगर पोलिसांच्या पथकाने महिलेला लुटणाऱ्या रिक्षा चालक अनिल खिल्लारे याला बेड्या ठोकल्या. त्याच्या तीन अल्पावयीन साथीदारांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.