Maharashtra Budget 2025 : संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार; अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

ajit pawar Latest News : अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली. संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
ajit pawar
Maharashtra Budget 2025 Saam tv
Published On

आज सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा केल्यानंतर अजित पवारांनी महाराजांचा जयजयकार केला.

अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले, 'छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत. त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी करतो'.

ajit pawar
Maharashtra Budget 2025 : 64 हजार 755 कोटींचा समृद्धी महामार्ग, काम किती टक्के पूर्ण झालं? अजित पवारांनी दिली खडानखडा माहिती

'छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला 'छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत' पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतला आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले.

ajit pawar
Maharashtra Assembly Budget: अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; महायुती सरकार येत्या ५ वर्षात मुंबई, नागपूर आणि पुण्यात विणणार मेट्रोचं जाळं

'मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते. तेथे भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल, असेही अजित पवारांनी जाहीर केले.

ajit pawar
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची फक्त ३ शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...; VIDEO

'येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फुर्तीदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करुन देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यातील उर्वरित काम गतीने होण्यासाठी राज्य शासनाकडून आणखी 50 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे पवारांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com