

बारामती विमानतळाजवळ अजित पवारांचे विमान कोसळले
या दुर्घटनेत अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला
फॉरेन्सिक टीमकडून विमानाचे अवशेष गोळा करण्यात आले
अवशेष तपासासाठी मुंबईला पाठवण्यात येत आहेत विमानाचे अवशेष
राज्याचे उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. २८ जानेवारीला ते विमानाने बारामती दौऱ्यावर निघाले होते. पण बारामतीत पोहचण्यापूर्वीच विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्याला धक्का बसला. अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? नेमकं काय घडलं होतं यामागचे सत्य तपासातून लवकरच समोर येणार आहे.
आज याच अपघात झालेल्या ठिकाणाहून प्रशासनाच्या वतीने अपघातग्रस्त विमानाचे सर्व पार्ट्स आणि तुकडे एका बॉक्समध्ये भरून मुंबईला घेऊन जाण्यात येणार आहे. फॉरेन्सिक टीमकडून हे सर्व विमानाचे अवशेष गोळा केले जात आहेत. तर दुसरीकडे विमानाचा अर्धा तुकडा हा एका कंटेनरमध्ये भरून तो देखील मुंबईकडे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
बारामतीमध्ये विमान अपघात झालेल्या ठिकाणावरून अपघातग्रस्त विमानाचे अवशेष उचलले जात आहेत. व्ही एस आर कंपनीचे हे विमान होते.फॉरेन्सिक टीमकडून अवशेष उचलले जात असून ते अवशेष घेऊन मुंबईला जाणार आहेत. यामुळे आता हा विमान अपघात नेमका कशामुळे झाला, यामागचे कारण काय होते हे तपासातून समोर येईल. या तपासातून नेमकं काय समोर येतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, विमान अपघात झाला त्या दिवशी अजित पवार हे बारामतीकडे निघाले होते. बारामतीत त्यांच्या चार सभा होणार होत्या. त्यासाठी ते सकाळीच साडेसात वाजता मुंबईतून विमानाने रवाना झाले होते. पण हे विमान बारामती विमातळाजवळ पोहचताच कोसळले. विमान कोसळल्यानंतर त्यामध्ये अनेक स्फोट झाले आणि त्याचे अनेक तुकडे झाले. या अपघातामध्ये विमान पूर्णत: जळून खाक झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.