

अजित पवार यांचा विमान अपघात होता की घातपात असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताच्या एक महिन्यानंतर विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल समोर आलाय. प्लाइट डेटा उष्णतेमुळे खराब झाला होता मात्र, रॉ डेटा डाऊनलोड करण्यात आलाय. दोन्ही पायलट्सला बारामती येथील विमानतळावर विमान लँण्ड करण्याचा अनुभव होता. धावपट्टीच्या सुरुवातीला २० मीटर आधी विमान कोसळलं, असं या DGCIच्या अहवालात सांगण्यात आलंय.
अपघाताच्या एक महिन्यानंतर DGCIचा प्राथमिक अहवाल आला आहे. यात धक्कादाक बाब सांगण्यात आल्या आहेत. अपघात घडला त्यावेळी विमान कोसळताना ते आधी झाडाला आदळलं होतं. त्यावेळी विमानतळावर 2 हजाराची दुष्यमानता होती, असंही या अहवालात सांगण्यात आले आहे. दरम्यान विमानचं लँडिंग करण्यासाठी साधरण ५ हजार दुष्यमानता असणं आवश्यक असते. मग २ हजार किलोमीटरची दुष्यमानता असताना विमान लँडिग करण्याचा प्रयत्न का करण्यात आला असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यासह अजितदादांच्या विमानाचे दोन्ही वैमानिकांना बारामतीच्या विमानतळवार विमान उतरवण्याचा अनुभव होता, असंही सांगण्यात आलंय.
या अहवालाबाबत प्रतिक्रिया देताना, आदिती तटकरे म्हणाल्या की, हा अहवाल ज्यांनी दिलाय, त्यांचा हा प्राथमिक आहे, ते अंतिम अहवाल कधी देणार? अपघाताची इतर काही कारणे आहेत का त्याचा अहवाल कधी येणार असा प्रश्न त्यांनी केलाय.
दुष्यमानता VFR मर्यादेपेक्षा कमी असूनही लँडिंगचा प्रयत्न.
VIP/Non-Scheduled फ्लाइटसाठी अनकंट्रोल्ड एअरफिल्डवरील ऑपरेशन.
हवामान आणि मूलभूत नेव्हिगेशन सहाय्यांमध्ये कमतरता.
एअरफिल्ड सुविधांचे अपुरे मानक.
बारामती येथे अधिकृत MET सुविधा नाही.
उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके.
पुणे व मुंबईतही 2000–2500 मीटर दुष्यमानता नोंदली गेली.
बारामती विमानतळातील सुरक्षा त्रुटी
रनवेवरील मार्किंग सहज दिसू शकतील असे नाही
रनवेव बारीक खडी (Loose Gravels) आढळली आहे.
रनवेला परिपूर्ण कुंपण नाही. म्हणजेच त्याच्या आजुबाजुला मार्क करण्यात आले नाहीये.
विमानतळावर अग्निशमन (ARFF) सुविधा नाहीये.
फक्त VFR ऑपरेशन्सला परवानगी देण्यात आली.
अनकंट्रोल्ड एअरफिल्ड, नियमित ATC सुविधा नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.