Ajit Pawar Death: 'आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत, तो भारदस्त आवाज…'; अजितदादांच्या आठवणीत रोहित अन् युगेंद्र पवार भावुक

Ajit Pawar Plane Crashed: अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. या घटनेचा आज एक महिना पूर्ण झाला. अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर त्यांच्यासाठी भावुक पोस्ट केली.
Ajit Pawar Death: 'आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत, तो भारदस्त आवाज…'; अजितदादांच्या आठवणीत रोहित अन् युगेंद्र पवार भावुक
Ajit Pawar DeathSaam Tv
Published On

Summary -

  • अजित पवार यांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झाला

  • रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांची भावुक पोस्ट चर्चेत

  • 'आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत', असे युगेंद्र पवार यांनी म्हटले

  • महाराष्ट्राने एक प्रभावी आणि भारदस्त आवाज गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. २८ जानेवारीला बारामतीमध्ये अजित पवार यांचे विमान कोसळले. अजित पवार हे आपल्यामध्ये नाहीत असा विश्वास अजूनही अनेकांना बसत नाही. फक्त पवार कुटुंबीय नाही तर संपू्र्ण महाराष्ट्र त्यांची आठवण काढत आहेत. अजित पवार यांच्या निधनाला १ महिना पूर्ण झाला असून त्यांचे पुतणे रोहित पवार, युगेंद्र पवार यांनी भावुक पोस्ट केली आहे. त्यांची पोस्ट सध्या चर्चेत आल्या आहेत. 'अजूनही बरंच काही बोलायचे होते. आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत. दादा तुम्ही पोरके करून गेलात', असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अजितदादांसाठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं, असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही. खूप वेदनादायी..!'

तर अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी लाडक्या अजितदादांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये युगेंद्र पवार यांनी लिहिले की, 'प्रिय काका, आज तुम्हाला जाऊन एक महिना झाला… माझ्यासाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी, हा एक महिना आयुष्यातला सर्वात जड आणि सर्वात वेदनादायी ठरला. आजही तुमच्या नसण्याची जाणीव मनाला होत नाही. तुम्ही तुमच्या रुबाबदार आवाजात येऊन म्हणाल, “मी कामाचा माणूस आहे, आणि हे काम असंच झालं पाहिजे!” असा भास होतो. सतत वाटत राहते आता तुमची गाठ पडेल… आणि तुम्ही म्हणाल, "काय चिरंजीव, कसं काय सुरू आहे? थांब थोडं, लोकांना भेटतो पहिले. मग आपण बोलू…” पण वास्तव समोर येतं आणि मन हेलावून जाते. आता मी तुमचे मार्गदर्शन कसे घेऊ...?'

युगेंद्र पवार यांनी पत्रात पुढे असे लिहिले की, 'आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत. त्या आजही तुमच्या विश्वात रमण्याचा प्रयत्न करतात. काका, तुम्ही आजीची काळजी करू नका, आम्ही सर्वजण त्यांची काळजी घेत आहोत. बाबा इतके भावूक झाले आहेत की, त्यांचा बांध केव्हाही फुटतो. त्यादिवशी गाडीतून प्रवास करताना अचानक त्यांचे डोळे पाणावले. ते उद्विग्नपणे म्हणाले, “दादा असा कसा जाऊ शकतो? अजून बरंच काही बोलायचं होतं…” आदरणीय साहेबही तुमच्याशिवाय अस्वस्थ झाले आहेत. काका, अपघाताबद्दलच्या अनेक शंका मनाला छळत आहेत. अपघात कसा काय होऊ शकतो? नेमकं काय घडलं? कोणामुळे घडलं? सत्य काय आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत.'

Ajit Pawar Death: 'आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत, तो भारदस्त आवाज…'; अजितदादांच्या आठवणीत रोहित अन् युगेंद्र पवार भावुक
Ajit Pawar Death Case: FIR दाखल होत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही; बारामतीकरांची आक्रमक भूमिका

तसंच, 'सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात तुमचा आवाज पुन्हा घुमणार नाही, तुमचा तो प्रभावी आवाका दिसणार नाही. यावर अजूनही विश्वास बसत नाही. तुम्ही गेलात… काका तुम्ही महाराष्ट्राला पोरकं करून गेलात. काका, तुम्ही शरीराने आमच्यात नसला तरी तुमची शिकवण, तुमचा ध्यास, तुमचा जनतेवरचा विश्वास आणि जनतेचा तुमच्यावरचा विश्वास आणि प्रेम कायम आहे. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही सुरू केलेलं काम, जनतेला दिलेला विश्वास आणि विकासाचा घेतलेला वसा कधीही थांबू देणार नाही. तुमचा मार्गच आमचा मार्ग असेल. तुमचं स्वप्नच आमचं ध्येय असेल. तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही… Miss you Kaka', असे म्हणत युगेंद्र पवार खूपच भावुक झाले.

Ajit Pawar Death: 'आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत, तो भारदस्त आवाज…'; अजितदादांच्या आठवणीत रोहित अन् युगेंद्र पवार भावुक
Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी CID ने काय माहिती दिली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com