

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCAनं VSR कंपनी मोठी कारवाई केली आहे. VSR च्या लेअरजेट विमानांच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे. कंपनीच्या विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचं सांगून नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने त्यांच्या लेअरजेट विमानांच्या उड्डाणास बंदी घातली आहे.
अजित पवार यांचे बारामतीत विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर संबंधित विमान कंपनी व्हीएसआरवर कारवाई करण्यात यावी, त्या कंपनीच्या विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्या मागणीला आता यश आले आहे. विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात डीजीसीएने व्हीएसआर या हवाई वाहतूक कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. व्हीएसआरच्या विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी डीजीसीएने हे कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. व्हीएसआर कंपनीने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे इतर आमदार यांच्याकडून सातत्याने व्हीएसआर कंपनीवर आरोप केले जात होते. आता त्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एक एक प्रेस नोट काढून व्हीएसआरवर कारवाई करण्यात आल्याचं सांगितलंय. या कंपनीच्या चार विमानाच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. आर एटीव्हीआर एस आणि विटीव्हीआरए आणि विटीआर स्टील द म्हणजे हे कंटिन्यू या विमानांच्या उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे. विमान वाहतूक संचालनालयाचा हा अत्यंत मोठा निर्णय आहे, लेजेट 40, 45 आर एस टीआरआय या विमानांच्या उड्डानावरही बंदी घालण्यात आलीय.
विमानांमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आमदार रोहित पवार यांनी विमान कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अनेक विमान कंपन्या आहेत त्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याप्रकरणी डीजीसीएची प्राथमिक चौकशी सुरू होती. डीजीसीएनं व्हीएसआरची चौकशी सुरू केली, त्यानंतर महत्त्वाचा निर्णय घेत विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.