अजितदादांचा 100 टक्के घातच; 'जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत...', राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar Plane Crash Conspiracy Theory By NCP MLA: अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी 100 टक्के घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
NCP MLA Amol Mitkari addresses media while raising conspiracy doubts over Ajit Pawar plane crash
NCP MLA Amol Mitkari addresses media while raising conspiracy doubts over Ajit Pawar plane crashSaam Tv
Published On

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर आता दररोज अनेक शंका केल्या जात आहे. विशेष म्हणजे या सर्व दाट शंका राष्ट्रवादीचेच नेते उपस्थित करत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बुधवारी 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान क्रॅश झाले आणि यामध्ये त्याच्या 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले.

मात्र ती सहावी व्यक्ती कुठे आहे? असा सवाल काल आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला. तसेच ऐनवेळी पायलट का बदलला गेला आणि एकाचवेळी दोन्ही पायलट कसे ट्राफिकमध्ये अडकू शकतात असा सवाल रूपाली ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केला.

NCP MLA Amol Mitkari addresses media while raising conspiracy doubts over Ajit Pawar plane crash
Buldhana : धक्कादायक! एकाच कुटुंबातील ३ जण, अन् २४ तासांत शहरातून ७ जण संशयास्पदरित्या बेपत्ता; नेमकं काय प्रकरण?

अमोल मिटकरी म्हणाले, अजितदादानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या निष्ठेपायी त्यांना समर्पित करण्याचा निर्णय आहे. 'मे' महिन्यात भूमिका जाहीर करणार असून कारण आज कधीही न भरून निघणारं माझं नुकसान झालं आहे. पुढे ते म्हणाले, विमान अपघातावेळी 'तिथं धुकं नव्हतं तर धोका होता', त्यामुळं अजित दादांचा 100 टक्के घात झाल्याचे ते म्हणाले. जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत लढा देणार, आणि सर्व सत्य जनतेसमोर आणण्यासाठी प्रयत्न करणार, असेही मिटकरी म्हणाले.

NCP MLA Amol Mitkari addresses media while raising conspiracy doubts over Ajit Pawar plane crash
Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

कारण आज माझं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय. लवकरच अजितदादानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या निष्ठेपायी त्यांना समर्पित करण्याचा घेणार निर्णय आहे. यासंदर्भात 'मे' महिन्यात भूमिका जाहीर करणार असल्याचे मिटकरी म्हणाले. येणाऱ्या काही दिवसात अमोल मिटकरी अजून कोणत्या कोणत्या शंका उपस्थित करता हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com