राष्ट्रवादीत 'अध्यक्षपदा'चा पेच! सुनेत्रा पवारांच्या विरोधातील 12 आमदार कोण?

New Power Struggle in NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अध्यक्षपदावरून नवा पेच निर्माण झालाय... पक्षांतील 12 आमदारांकडून सुनेत्रा पवारांना अध्यक्षपदासाठी विरोध केला जात असल्याची चर्चा सुरु झालीय... त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या विरोधातील ते 12 आमदार कोण आहेत?
Sunetra Pawar at the center of leadership controversy within Ajit Pawar-led NCP
Sunetra Pawar at the center of leadership controversy within Ajit Pawar-led NCPSaam Tv
Published On

अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पेच निर्माण झाला असतानाच, आता 'अध्यक्षपदा'वरून नवीन वादाला तोंड फुटलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांकडेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अध्यक्षपद द्यावं, अशी मागणी करत 12 आमदारांबाबत सूचक विधान केलंय... याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनही अध्यक्षपद सुनेत्रा पवारांच्याच हाती सोपवण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली होती..

आता प्रश्न उरतो तो म्हणजे, 42 आमदार असणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत जर 30 आमदारांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलाय.. तर मग विरोधात असलेले ते 12 आमदार कोण?

अध्यक्षपदाची महत्त्वाकांक्षा असलेले नेते

शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत विलिनीकरणाला विरोध असणारे नेते

शरद पवारांच्या राष्ट्रवादीऐवजी भाजपसोबत जाण्यास इच्छुक असलेले नेते

खरतर अजित पवारांच्या निधनानंतर पक्ष विखुरला जाऊ नये यासाठी पक्षातील काही नेत्यांकडून सुनेत्रा पवारांना ताकद दिली जातेय..मात्र सुनेत्रा पवारांना विरोध करणारे ते 12 आमदार नेमके कोण आहेत? सुनेत्रा पवाराचं नेतृत्व त्या 12 आमदारांना का मान्य नाही? ही खेळी पक्षाअंतर्गत सुरु आहे की मित्रपक्षांकडून... हे योग्य वेळी समोर येईलच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com