Praful Patel: 'कुणी स्वतःला बाहुबली समजू नका'; बिहारच्या निकालानंतर पटेलांचं वक्तव्य

Praful Patel Warn Allies: बिहारमधील विजयानंतर शतप्रतिशत भाजपचा नारा दिला जात असतानाच खासदार प्रफुल्ल पटेलांनी मात्र सूचक वक्तव्य केलंय. मित्र पक्षाच्या इशा-यामुळे महायुतीत कसं राजकारण तापलंय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.
Praful Patel Warn Allies:
Praful Patel’s ‘Bahubali’ remark intensifies political tension; Supriya Sule responds strongly.saam tv
Published On
Summary
  • बिहार विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय.

  • प्रफुल्ल पटेलांच्या सूचक वक्तव्यामुळे वाद पेटलाय.

  • पटेलांच्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवीन चर्चा सुरू झालीय.

बिहारच्या निकालानं भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय. तर मित्रपक्षांचं टेन्शन वाढलंय.. त्यातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनी मात्र पैशांनी निवडणूक जिंकता येत नाही, कुणी स्वतःला मोठा बाहुबली समजू नका, बाहुबलींना आम्ही निवडून दिलंय, असं सूचक वक्तव्य केलंय. आणि याच वक्तव्यावरुन नव्या वादाला तोंड फुटलंय. तर पटेलांचं वक्तव्य संविधानाची खिल्ली उडवणारं असल्याचा पलटवार सुप्रिया सुळेंनी केलाय.

Praful Patel Warn Allies:
Bihar Election: बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव का आणि कसा झाला? ज्येष्ठ नेत्यानं थेट सांगितलं

खरंतर बिहारमध्ये भाजपनं पहिल्यांदाच 89 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजपनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर शतप्रतिशत भाजप नारा दिलाय. नेमकं याच दरम्यान प्रफुल्ल पटेलांनी सूचक वक्तव्य केलंय. मात्र पटेलांचा रोख भाजपवर नाही, म्हणत मुख्यमंत्र्यांनी सारवासारव केलीय.

Praful Patel Warn Allies:
Maharashtra Politics: नांदेडमध्ये मित्रपक्षाला अजितदादांचा दे धक्का; भाजप नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बिहारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 16 उमेदवार दिले होते.. त्यांची पुरती दाणादाण उडाली. सर्वच उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालंय.त्यामुळे पटेलांवर टीकेची झोड उठलीय. नेमकी ही टीका सुरु असतानाच पटेलांनी केलेलं हे वक्तव्य विदर्भातील स्थानिक समीकरणांबाबत आहे की शतप्रतिशत भाजपचा नारा देणाऱ्या नेत्यांसाठी. याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com