Ajit Pawar Death: 'अजितदादांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग?', खासदाराच्या विधानाने खळबळ

Sanjay Raut On Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. या अपघातासंदर्भात अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत. 'अजितदादांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग?, असं विधान संजय राऊत यांनी केले.
Ajit Pawar Death: 'अजितदादांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग?', खासदाराच्या विधानाने खळबळ
Sanjay Raut On Ajit Pawar DeathSaam Tv
Published On

Summary -

  • संजय राऊतांनी अजित पवारांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला

  • 'अजितदादांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग?', असे ते म्हणाले

  • विरोधकांनी अपघाताबाबत संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली

  • भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

  • ब्लॅकबॉक्स रिपोर्टनंतरच सत्य स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जातंय

सुप्रीम मसकर, साम टीव्ही

अजित पवारांच्या अपघातावरून खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केलाय. अजितदादांचा अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग होता का? असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर काँग्रेसनेही मोठा दावा करुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. पाहूयात एक खास रिपोर्ट...

अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल खासदार संजय राऊतांनी केलेल्या याचं विधानामुळे आता चांगलीच खळबळ माजलीय. एकीकडे अजितदादांच्या अपघातानं महाराष्ट्र सुन्न झालेला असताना दुसरीकडे अपघातावरून राजकीय वादाचा धुरळा सुरूच आहे. राऊतांसह विरोधकांनी अजितदादांच्या अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केलेत.

Ajit Pawar Death: 'अजितदादांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग?', खासदाराच्या विधानाने खळबळ
Ajit Pawar Death : विमान अपघाताआधीचा अजितदादांचा शेवटचा संवाद, ऐकता येणार, पाहा

याआधीही राऊतांनी भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईल अजित पवारांकडे असल्याचा आरोप करत अजितदादांच्या अपघातावर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे संजय राऊतांनी वेबसिरीजची स्क्रिप्ट लिहावी, असा टोला भाजपनं लगावलाय. अजित पवारांच्या अपघातावरून उलटसुलट प्रतिक्रिया येतच आहेत.

मात्र जोपर्यंत ब्लॅकबॉक्समधील माहिती जनतेच्या समोर येत नाही आणि अपघाताची सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत आरोप-प्रत्यारोपसह अजित पवारांच्या मृत्यूचं गूढ कायम राहणार आहे.

Ajit Pawar Death: 'अजितदादांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग?', खासदाराच्या विधानाने खळबळ
Ajit Pawar Plane Crash: विमानातून उडी मारण्याची धडपड कुणीतरी करत होतं पण....; अपघाताप्रकरणी नवी माहिती आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com