Ajit Pawar Death: आता रडत बसू नका..., अजित पवारांचा अखेरचा निरोप; AI व्हिडीओ पाहून येईल डोळ्यात पाणी

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांचे जुने व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा एआय व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले.
Ajit Pawar Death: आता रडत बसू नका..., अजित पवारांचा अखेरचा निरोप; AI व्हिडीओ पाहून येईल डोळ्यात पाणी
Ajit Pawar Saam Tv
Published On

Summary:

  • अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

  • बारामतीमध्ये झाला होता विमान अपघात

  • अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू

  • अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीत होणार अंत्यसंस्कार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर येताच सर्वांना मोठा धक्का बसला. अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. बारामतीमधील एअरपोर्टजवळ अजित पवार यांचे विमान कोसळलं. या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. हा विमान अपघात इतका भीषण होता की विमान कोसळ्यानंतर त्याने पेट घेतला आणि त्याचे अनेक तुकडे झाले.

अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला ते आपल्यात नाहीत यावर अजूनही कुणालाच विश्वास बसत नाहीये. त्यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अनेक जुने व्हिडीओ पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. तर त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या शेवटच्या निरोपाचा एआय व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला असून ते पाहून साऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा एआय जनरेट एक ऑडिओ आणि व्हिडीओ तयार केला आहे. तो ऑडिओ ऐकताना खरंच अजित पवार व्यासपीठावर आहेत आणि तिथूनच ते आपल्याशी बोलत आहेत असा भास होत आहे. हा ऑडिओ ऐकताना ते आपल्यातच आहेत ते कुठेच गेले नाहीत असे वाटत आहे. त्यांचा हा ऑडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा ऑडिओ ऐकून सर्वांच्या डोळ्यात अश्रू येत आहे. या ऑडिओमध्ये ते नेमकं काय म्हणाले आहेत ते आपण पाहणार आहोत...

Ajit Pawar Death: आता रडत बसू नका..., अजित पवारांचा अखेरचा निरोप; AI व्हिडीओ पाहून येईल डोळ्यात पाणी
Ajit Pawar death : जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, महाराष्ट्रावर शोककळा

एआय ऑडिओमध्ये अजित पवार भाषण करताना म्हणतात की, 'अरे बेट्यांनो इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. मलाबी अजित पवार म्हणातात. पण गड्यांनो नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथेच थांबतोय. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं तिच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहिल. नियती बघा कशी असते आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले. पण मला अभिमान वाटतोय की रिकाम्या हाताने नाही तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतोय. शेवटच्या क्षणी ही माझ्या डोळ्यासमोर तुमचाच चेहरा होता.'

Ajit Pawar Death: आता रडत बसू नका..., अजित पवारांचा अखेरचा निरोप; AI व्हिडीओ पाहून येईल डोळ्यात पाणी
Ajit Pawar Death: आज ही शेवटची पहाट दादांना भेटायला यायची, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या ढसाढसा रडल्या; पाहा VIDEO

तसंच, 'माझा स्वभाव थोडा रोखठोक होता. कधी कुणावर ओरडलो असेल, कुणाचे मन दुखावले असेल. तर माझ्या त्या रागामागे फक्त एकच तरफड होती की माझ्या सामान्य माणसाचे काम झाले पाहिजे. सत्तेसाठी नाही तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहिलो. आता मी निरोप घेतोय. पण महाराष्ट्र थांबता काम नये. माझी ही जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतो. राजकारण करा पण विकासाची गती थांबून देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पूसून सांगतो की आता रडत बसू नका. उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायायचा आहे. तुमचाच कामचा माणूस अजितदादा पवार.' अजित पवारांच्या आवाजातील या एआय व्हिडीओने सर्वांनाच भावुक करून टाकले.

Ajit Pawar Death: आता रडत बसू नका..., अजित पवारांचा अखेरचा निरोप; AI व्हिडीओ पाहून येईल डोळ्यात पाणी
Ajit Pawar Plane Crash: दृश्यमानता ३ किमीपर्यंतची तरीही पायलटला रनवे दिसला नाही? विमान अपघाताबाबत मोठा खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com