Maharashtra News Live Updates : लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वारा

Maharashtra Breaking Live Marathi Headlines 05th May 2025 : आज सोमवार दिनांक ०५ मे २०२५, महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, आज बारावीचा निकाल, पहलगाम हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान तणाव, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, आयपीएल २०२५, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Marathi Breaking Live Marathi Headlines Updates
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वारा

लातूर शहरासह लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात आज सायंकाळी अचानक सोसाट्याचा वादळी वारा वाहू लागला. यामुळे जिल्ह्यातील आंबा फळबागेचं आणि काढणीला आलेल्या शेती पिकांचे नुकसान नुकसान झाला आहे. तर शहरातील औसा रोड परिसरातील वादळी वाऱ्याने झाड कोसळल्याने 8ते9 दुचाकींचं नुकसान झाला आहे. दरम्यान पुढील काही तास लातूर जिल्ह्याला 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.

चंद्रपुरात महिन्याभरात कोट्यावधींची बनावट दारू जप्त

चंद्रपूर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिमूर तालुक्यात एका आयशर वाहनातून ३५० पेटी बनावट दारू जप्त केली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत पोलिसांनी विविध कारवायांमध्ये सुमारे १ कोटी ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गडचिरोली जिल्हा हा दारूबंदी असलेला सीमावर्ती जिल्हा असल्याने चंद्रपूरमार्गे गडचिरोलीत दारूची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे.

पुण्यात होणार मोठं मत्स्यालय, नितेश राणेंची घोषणा

मत्स्य खात्यात गोड्या पाण्यातील तलावातील मासेमारीसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी ही घोषणा केलीय.

बारवी धरणात 37.20 टक्के पाणीसाठा शिल्लक

ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या एमआयडीसीच्या बारवी धरणात आजच्या घडीला 37.20 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच वेळेस 36.52% पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीपेक्षा यंदा एक टक्का अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुरबाड आणि बदलापूर परिसरामध्ये तापमानाचा चाळीशी पार गेला असून त्यामुळे बाष्पीभवनात 3 टक्के वाढ झालीय. यंदाच्या वर्षी बाष्पीभवन 10 टक्के आहे . मात्र तरीही 15 जुलै पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा बारावी धरणात शिल्लक राहणार असल्याचं एमआयडीसी प्रशासनानं सांगितलंय. बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मीरा-भाईंदर तसच एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो.

यवतमाळच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी,वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकटासह अवकाळी पाऊस

यवतमाळ जिल्ह्यात दुपारनंतर हवामानात अचानक बदल झाला आणि अवकाळी पावसाने अनेक भागांत हजेरी लावली. पुसद,उमरखेड, महागाव, पोफाळी,शेंबाळपिंपरी यांसारख्या भागांमध्ये वादळ वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.अवकाळी पावसामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला असून अनेक गावांमध्ये बत्तीगुल स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भाग सध्या अंधारात असून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन रांगेत चोरी, दागिने चोरणाऱ्या दोघी गजाआड

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातील दर्शन रांगेत महिला भाविकांकडील दागिने चोरणाऱ्या दोघींना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. माधुरी संतोष डुकरे-घाडगे (वय ३०), काव्या तनवीर जाधव (वय २१, दोघी रा. यवत रेल्वे फाटकाजवळ, यवत, ता. दौंड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला इंदापूर तालुक्तातील विठ्ठलवाडीतील रहिवासी आहेत. रविवारी (४ एप्रिल) दुपारी तीनच्या सुमारास त्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्या लहान मुलीला घेऊन दर्शन रांगेत थांबल्या होत्या. त्या वेळी आरोपी माधुरी आणि काव्या हिने तक्रारदार महिलेच्या मुलीच्या गळ्यातील ४० हजारांचे सोनसाखळी चोरुन नेली.

वाशिम : अवकाळी पावसामुळे बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला..

वाशिममध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचं बघायला मिळालं. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आनलेला शेतमाल आज अवकाळी पावसाने भिजल्यान शेतकऱ्याच मोठ नुकसान झाल आहे. अचानक वातावरणात बदल होत पावसाची सुरुवात होताच शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. आपला शेतमाल अवकाळी पाऊसा पासून वाचवताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.

कुस्तीपटू मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

अमरावतीच्या तिवसा शहरातील आजाद चौकात राहणाऱ्या एका 22 वर्षीय राज्यस्तरावर कुस्ती खेळनाऱ्या कुस्तीपटू मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. कू.प्राप्ती सुरेश विघ्ने असे मृतपावलेल्या मुलीचे नाव आहे.माहितीनुसार तिला उलट्या व पाय दुखण्याचा त्रास झाल्याने मी घरी येत आहे.असा फोन तिने आपल्या भावाला केला होता. भावाने तिला अमरावतीवरून सकाळी घरी आणले.घरी आराम करत असतानाच अचानक तिची प्रकृती बिघडली तेव्हा तातडीने तिला तिवसा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, अतिशय तंदुरुस्त व दररोज व्यायाम करणाऱ्या व राज्यस्तरीवर कुस्ती खेळणाऱ्या एका तरुणीचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा, भारतीय पुरातत्व खात्याकडून पोलिसांना पत्र

- त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा

- भारतीय पुरातत्व खात्याकडून त्र्यंबकेश्वर पोलिसांना पत्र

- परवानगी नसतांना मंदिर परिसरात देवस्थान मंडळाकडून अनधिकृतपणे लाडू विक्री सुरू असल्याच्या होत्या तक्रारी

- त्र्यंबकेश्वर मंदिर संरक्षित स्मारक घोषित असतांना विश्वस्त मंडळाकडून लाडू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा ठेवला ठपका

- भारतीय पुरातत्व खात्याच्या नियमांचे पालन न केल्यास १ लाख रुपयांचा दंड किंवा दोन वर्षांचा कारावास अशा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

- लाडू विक्रीबाबत भारतीय पुरातत्व खात्याकडे माजी विश्वस्तांनी केली होती तक्रार

- त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून काय कारवाई केली जाते? याकडं लक्ष

पुण्यातील धनकवडी-आंबेगाव पठार भागात गाड्यांची तोडफोड

पुण्यातील धनकवडी-आंबेगाव पठार भागात गाड्यांची तोडफोड

आंबेगाव पठारमधील होळकर नगरमध्ये गाड्यांची तोडफोड

रात्री दोन तरुणांनी केली वाहनांची तोडफोड

तोडफोडीत रिक्षा आणि इतर वाहनांचे नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार, माहितीनुसार, काल रात्री ११:५५ च्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी परिसरात येत शिवीगाळ करत वाहनांवर दगडफेक केली आणि गाड्यांचे नुकसान केले

या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे

धुळे जिल्ह्याचा 12 वी चा निकाल अवघा 74.88 टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला, अपेक्षेप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे, धुळे जिल्ह्याचा निकाल अत्यंत धक्कादायक लागला असुन यात कला शाखेने विभागात अत्यंत सुमार कामगिरी केली आहे, एकूण निकालातही धुळे पिछाडीवर राहिला आहे,

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस

या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोबत आंबा आणि पालेभाज्यांचे नुकसान झाले. कांदा काढुण शेतात कांद्याच्या पोळी पडलेल्या असलेल्या मुळे अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.

जालन्यातील अंबड तालुक्यातील पानेगाव शिवारात गारांचा जोरदार पाऊस

जालना जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने तडाका दिला आहे. जालन्यातील अंबड तालुक्यातील पानेगाव शिवारात गारांचा जोरदार पाऊस झाला आहे. या बेमोसमी पगारांच्या पाऊस पडल्याने बीज कांदापिका सह फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.जालन्यातील जालना , बदनापूर, अंबड,घनसावंगी या तालुक्यात अवकाळी पाऊस पडला आहे...

नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी आणि अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक पाणी टंचाई

नंदुरबार जिल्ह्यातील किती दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्याला सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय.. सातपुड्याची पायथ्यात वसलेल्या तालुक्यातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे शंभर ते दोनशे फूट खोल दरीत उतरून जर यातून पाणी घेण्याची वेळ आदिवासी महिलांना आलेले आहेत

शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजली, 32 दिवसापासून बीड शहराचा पाणीपुरवठा खंडित...

आमदार संदीप क्षीरसागर घटनास्थळी दाखल.. आठ दिवसाला पाणीपुरवठा होणार.. आमदार क्षीरसागर यांचा दावा

माजलगाव धरणातून बीड शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र काडी वडगाव परिसरात मुख्य जलवाहिनी चौदाशे मीटर गंजली आहे. त्यामुळे गेल्या 32 दिवसापासून बीड शहराचा पाणीपुरवठा खंडित झालाय.

खासदार सुप्रिया सुळे यांनी वैभवी देशमुख यांचे फोनद्वारे केले अभिनंदन

वैभवी मला तुझा सार्थ अभिमान आहे -सुप्रिया सुळे यांनी वैभवीचे फोनद्वारे केले अभिनंदन

ताई आमचा सगळा आनंदच हिरावून घेतलाय - वैभवी देशमुख

मी तुझ्या आजीला प्रॉमीस केलय न्याय मिळवणार - काळजी करु नको

सदाभाऊ खोत यांच्यासह ८ सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता

- शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना न्यायालयाचा दिलासा.

- शेतकरी नेते सदभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता.

- खोत यांनी कोरोना काळात २०२० मध्ये कांदा निर्यातबंदी विरोधात केलं होतं आंदोलन.

- कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सदाभाऊ खोत यांच्यासह ८ सहकाऱ्यांविरोधात दाखल करण्यात आला होता गुन्हा.

- सदाभाऊ खोत आणि त्यांच्या इतर ८ सहकाऱ्यांविरोधात निफाड न्यायालयात सुरू होता खटला.

- आज या खटल्याचा निकाल जाहीर, खोत यांच्यासह ८ सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता.

संतोष देशमुखांची लेक झाली १२वी पास, सुप्रिया सुळेंकडून कौतुक

वैभवीने बारावीच्या परीक्षेत ८५% गुण मिळवल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी तिचे अभिनंदन केले. मात्र, वैभवीने भावनिक प्रतिक्रिया दिली “सगळा आनंद हिरावून गेला ताई, आता काय उपयोग… आता फक्त न्याय मिळायला हवा,” असं ती म्हणाली.

सांगलीतील म्हैशाळ येथे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, तिघे गंभीर जखमी

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैशाळ येथे मळाभाग वस्तीत सकाळी घरगुती गॅसवर पाणी गरम करत असताना अचानक झालेला स्फोटात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

विक्रोळी टागोर नगर हायवेवर मोठ्या प्रमाणात सांडले ऑईल, वाहतूक कोंडीमुळे वाहक त्रस्त

पूर्व द्रुतगती मार्गावरील विक्रोळी टागोर नगर हायवेवर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑईल सांडल्याची घटना घडली. सुदैवाने, अग्निशामक दल घटनास्थळी त्वरित पोहोचले आणि पाणी मारून ऑईल साफ केले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेमुळे विक्रोळी ते भांडुपदरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

अकरावीचा प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होणार

राज्यभर अकरावीचा प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 2025 - 2026 पासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक, या महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात राबविण्यात येत होती. आता ही राज्यभरातील उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने राबवण्यात येईल.

Amavati: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसे आणि विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

अचलपूर तालुक्यातील असदपुर ते येवदा रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन..

रस्ता खराब असल्याने एसटीची सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांच होत आहे शैक्षणिक नुकसान...

पालकमंत्री साहेब निधी द्या, पालकमंत्री साहेब रस्ता द्या अशा आशयाचे पोस्टर घेऊन विद्यार्थी बसले आंदोलनाला..

यापूर्वी अनेकदा आंदोलन करून निवेदन देऊनही रस्त्याचे काम न झाल्याने विद्यार्थी बसले आंदोलनाला..

Solapur: सोलापुरात शेतीच्या पाण्यासाठी सीना नदीकाठचे शेतकरी आक्रमक

- सोलापुरातील सिंचन भवनच्या कार्यालयात दिला ठिय्या

- शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळतेय

- सीना नादी काठावरील विरवडे बुद्रुक, शिरापूर, पीर टाकळी, शिंगोली, तरटगाव, पाकणी, शिवणी, तिऱ्हे, पाथरी, तेलगाव आदी गावातील शेतकरी एकवटले

- शेती पिकांना, जनावरांना तसेच पिण्यासाठी पाणी नदीत सोडावे अशी मागणी

- उजनी धरणातून काही दिवसापूर्वी शेतीसाठी पाणी सोडण्यात आलेय मात्र सीना नदीच्या पठ्ठ्यातील अनेक गावांना पाणी सोडले गेले नाही

- त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळावे अशी मागणी करण्यात येतेय

- सिंचन भवन कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या सुरू

बंधारा दुरूस्तीसाठी युवा सेनेचे मुंडण आंदोलन

माळशिरस तालुक्यातील गणेशगाव येथील नीरा नदीवरील बंधारा दुरूस्त करावा या मागणीसाठी युवा सेनेचे कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन केले.

येथील बंधारा मागील वर्षीच्या पावसाळ्यात वाहून गेला आहे. त्यामुळे अनेक गावांतील वाहतूक बंद झाली आहे.

येथील बंधारा दुरूस्त करावा अशी अनेक वेळा मागणी केली आहे. पाटबंधारे विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन केले.

Ujjain: उज्जैनच्या प्रसिद्ध बाबा महाकालेश्वर मंदिराच्या शंख द्वाराच्या वर अचानक भीषण आग

उज्जैनमधील बाबा महाकालेश्वर मंदिराच्या शंख द्वाराच्या वर भीषण आग लागल्यामुळे परिसरात धुसर आणि घबराट पसरली.

सुमारे एक किलोमीटर अंतरावरून धूर आणि ज्वाला दिसत होत्या.

माहिती मिळताच, अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी तीन गाड्या पाठवल्या आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी कार्य सुरू केले.

राज्य कृषी उत्पाद संघटनेचे काळया फिती लावून कामकाज, 15 मे पासून काम बंद आंदोलनाचा इशारा

राज्य कृषी उत्पादक संघटनेने विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे यापूर्वी सरकारला अल्टिमेटम म्हणून काळ्याफिती लावून काम करण्यास संघटनेने सुरुवात केली आहे .

याप्रसंगी नाशिकच्या येवला कृषी कार्यालयासमोर सहाय्यकांनी घोषणाबाजी केली.

दरम्यान कृषी सेवक पद रद्द करून कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती करावी.. कृषी सहाय्यकांना ऑनलाइन कामकाजासाठी शासनाने लॅपटॉप उपलब्ध करून द्यावे.

ग्रामसेवक व तलाठी प्रमाणे पूर्णवेळ मदतनीस मिळावा कृषी सहाय्यकाचे नाव बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असे करावे या मागण्यांसाठी संघटनेने 5 मे पासून काळ्याफिती लावून आंदोलन सुरू केले आहे....

Chandrashekhar Bawankule: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

पुरंदर विमानतळाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुण्यात बैठक घेणार

पुणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन

यावेळी अधिकारी व संबंधितांसोबत बावनकुळे चर्चा करणार

बैठकीनंतर महसूल मंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार

Solapur: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सून डॉ. सोनाली वळसंगकर परदेशात गेल्याची चर्चा

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा माने हिच्या विरोधात दाखल आहे गुन्हा

तर डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात कुटुंबियांचे जबाब देखील या आधीच पोलिसांनी नोंदवले आहेत

या प्रकरणाचा अद्याप उलगडा झालेला नसताना डॉ. सोनाली ह्या परदेशात गेल्याची चर्चा

मात्र या चर्चाना पोलिसांनी कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही

भारत पाकिस्तान वादात अमेरिकेचे लॉबिंग? प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकार वर टीका

पहलगम येथील हल्ल्यानंतर भारतीय जनता पाकिस्तान विरोधात कारवाई मागते आहे मात्र एक आठवडा होऊन गेला तरी सुद्धा सरकारकडून काही संकेत मिळत नाही.

दुसऱ्या बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार जेसन मिलर यांना सल्लागार म्हणून नेमण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आपण कारवाई करणार नाहीत का? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

भाजपाला आम्ही विचारत आहोत की जेसन मिलर यांची तुम्ही नेमणूक केली आहे का तिकडून परवानगी आल्याशिवाय कारवाई करणार नाहीत का? याबाबत त्यांनी उत्तर द्यावं.

पाकिस्तान विरोधात लॉगिन करण्यासाठी मिलन यांना दीड लाख डॉलर मिळणार आहेत असा सुद्धा माहिती मिळाली आहे

त्यामुळे भारत पाकिस्तान यांच्यामध्ये आता लॉबिंग सुरू झाल्याचा आरोप सुद्धा आंबेडकर यांनी केला आहे

जातीय जनगणनेचे सांगलीत स्वागत, भाजपकडून आनंदोत्सव केला साजरा

केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी देशात जातीय जनगणना करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर आज सांगली भाजप शहर कडून जल्लोष करण्यात आला. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत साखर आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.

यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची घोषणा करून सर्व समावेशक धोरणाचा नवा अध्याय सुरू केला आहे.

ही जनगणना शैक्षणिक व सामाजिक आरक्षण धोरणांना अधिक न्याय बनवेल.

हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेने भारताने सकारात्मकतेने टाकलेले पाऊल असल्याचं मत यावेळी आमदार गाडगीळ यांनी मांडले.

मी मुंबईत स्वतःच्या घरात राहतो, मला तर बंगलाही नाही - संजय शिरसाट

लाडकी योजनेसाठी आपल्या खात्याचा निधी इतर विभागात वळवल्याबाबत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.

या वक्तव्यानंतर बदलापुरात शिरसाट यांनी पुन्हा आपल्या मनातील खदखद वक्त केलीय.

'तुम्हाला तर माहितीच आहे, माझ्यावर किती अन्याय झालाय.

मला तर मलबार हिल भागात बंगलाही मिळाला नाही', असं वक्तव्य शिरसाट यांनी बोलताना केलं.

पण मी 72व्या मजल्यावर राहतो आणि आज इथून झोपडपट्टी बघतो, ज्या झोपडपट्टीतून मी आधी मोठ्या इमारती पाहायचो', असंही शिरसाट पुढे म्हणाले.

Kadegaon: कडेगाव तालुक्यात डोंगराला आग लागून शेकडो एकरवरील वनसंपदा जळून खाक

सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील सोनसळ,चिंचणी,शिरसगाव आणि तडसर या गावांच्या हद्दीतील डोंगराला आग लागल्याने शेकडो एकर वनसंपदा जळून खाक झाली आहे.

आग लागल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला.

मात्र उशिरापर्यंत ही आग अटोक्यात आली नव्हती.चार गावांच्या हद्दीतील डोंगराला आग लागल्यामुळे या ठिकाणी असणारे हजारो वन्य प्राण्यांना स्थलांतर व्हावं लागलं.

याशिवाय शेकडो पक्षांची घरटे या आगीमध्ये जळून खाक झाली आहेत.तर ही आग नेमकी कोणत्या कारणातून लागली हे समजू शकला नसून,या आगीची चौकशी करावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

Amravati: अमरावती जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला, तापमानाचा पारा पोहचला 43 अंश डिग्रीवर

अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताच्या किरकोळ 250 रुग्णांवर उपचार..

अमरावती जिल्ह्यात 59 ठिकाणी उष्मघात कक्षाची सुविधा; वाढत्या तापमानानंतर आरोग्य यंत्रणा सज्ज व सतर्क..

प्रशासनाने जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू केले उष्माघात कक्ष..

जिल्हा सामान्य रुग्णालयात एक दोन, चार आणि सहा क्रमांकाच्या वार्डात उष्मघात कक्षाची निर्मिती

नव विभागीय मंडळात कॉपी प्रकरण

१२४ केंद्र चौकशी करून कारवाई होणार

पुणे ४५ नागपूर ३३ छत्रपती संभाजी नगर 214 मुंबई 9 कोल्हापूर 7 अमरावती 17 नाशिक 12 लातूर 37 एकूण ३७४ कॉपी प्रकार उघडकीस....

उजनीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या आंदोलन

उजनीच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडावे या मागणीसाठी पंढरपूर तालुक्यातील आढीव व परिसरातील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे

सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

या भागातील शेतकऱ्यांनी रीतसर पाटबंधारे विभागाकडे पाणी मागणी अर्ज केले आहेत. तरीही अद्याप या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही.

पाटबंधारे विभागाने तातडीने शेतीसाठी व पिण्यासाठी कालव्यातून पाणी सोडावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा या भागातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

पलगामच्या हल्ल्यात मृत्यू पडलेल्या पर्यटकांना आत्म्यास शांती लाभो यासाठी 151 हनुमान चालीसा पठण

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या आत्म्यास शांती लाभो, यासाठी लालबहादूर शास्त्री नगरातील शक्ती हनुमान परिवाराच्यावतीने 151 हनुमान चालीसा पठण करण्यात अली, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांच्या मृत्यू झाला होता, या मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांच्या आत्म्यास शांती लाभो, यासाठी हनुमान चालीसा पण करण्यात आली तर उल्लेखोरांवर लवकर आणि कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी होम हवन करण्यात आलं..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल पत्रकार परिषद

काही वेळात बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी निकाल जाहीर करणार

आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार

११वाजता पत्रकार परिषद सुरू होईल लाईव्ह फ्रेम देतो

Pune News: पुणे जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापना करण्याचे आदेश

अमर पाटील आणि सूर्यकांत मोरे या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी आता एसआयटी करणार

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

जमीन मोजणी प्रकरणात या दोन्ही अधिकाऱ्यांनी गैरप्रकार केल्याचं समोर

या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात आत्तापर्यंत सात तक्रारी आल्या असून या तक्रारींची चौकशी एसआयटी करणार

हे दोन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यासाठी सरकारकडे पुरावे, महसूल मंत्र्यांची माहिती

दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल

या आरोपींच्या विरोधात कुठली तक्रार असल्यास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे

Maharashtra Weather: महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आयएमडीकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

दर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाकडून भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि वि‍जांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या काळात 40-50 किमी प्रति तास वेगानं वारे वाहन्याची शक्यता आहे.

दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्रसह इतर राज्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, सिक्कम आणि जम्मू -काश्मीरच्या देखील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पाऊस पडण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र हवेत गारवा निर्माण होऊन उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पूर्व राजस्थान, पश्चिम आणि पूर्व मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास 50-60 किमी एवढा प्रचंड राहणार असल्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

यासोबतच हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्किम मध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Temperature: उन्हामुळे अशक्तपणात वाढ, राज्यात उष्माघाताचे १०१ रुग्ण

वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या

उष्माघातामुळे अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे, घसा कोरडा पडणे, रक्तदाब कमी होणे अशा अनेकांना समस्या

राज्यात एक मार्च ते एक मे या दोन महिन्यांच्या कालावधीत उष्माघाताच्या 101 रुग्णांची नोंद

यामध्ये तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून हे रुग्णांना नागपूर जिल्ह्यातील असल्याची माहिती

सर्वाधिक रुग्ण विदर्भात आढळून असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट

विदर्भातील यवतमाळ मध्ये उष्माघाताचे 17 बुलढाणा मध्ये 12 नागपूर मध्ये दहा तर मराठवाड्यातील जालना मध्ये आठ आणि परभणी मध्ये सहा रुग्ण

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात हरभऱ्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात

नंदुरबार जिल्ह्यात हरभऱ्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला सुरुवातीला हरभऱ्याला चांगला आणि उच्चांक इतर मिळाला होता परंतु गेल्या काही दिवसापासून हरभऱ्याला चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून आता हरभरा विक्रीसाठी बाजार समिती जात नसून घरातच साठवणूक करून ठेवत आहे. यावर्षी सुरुवातीला मॅक्सीगण हरभरा पिकाला 9 हजार ते नऊ हजार 800 रुपये प्रति क्विंटल दर भेटत होता. पीकेव्हीटू हरभऱ्याला सहा हजार 500 ते सहा हजार 800 रुपये प्रतिक्विंटल तर गावरानी चाफा हरभऱ्याचे दर सुरुवातीला पाच हजार 400 ते 5 हजार 700 रुपये प्रतिक्विंटल भेटत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून मेक्सिकन हरभन्याला आठ हजार 700 ते नऊ हजार रूपये प्रति क्विंटल, तर पीकेव्हीटू हरभऱ्याला सहा हजार 200 ते सहा हजार 400 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. सुरुवातीपेक्षा आता खूपच कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे..

Solapur: सोलापूर महापालिकेच्या बीफ मार्केट आणि कत्तलखाना बांधण्याच्या जाहिरातीमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

महापालिकेच्या बीफ मार्केटच्या जाहिरातीनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची मध्यस्ती

- कोणत्याही परीस्थितीत बीफ मार्केट होऊ देणार नसल्याची आमदार देवेंद्र कोठेंची भूमिका

- महापालिकेकडून प्रिंटिंग मिस्टेकमुळे बीफ मार्केट उल्लेख झाला असून त्याठिकाणी मटण मार्केट होणार

- त्याबाबत महापालिका शुद्धीपत्रक काढणार आहे.

- तर मुळेगाव कत्तलखान्यात कोणत्याही प्रकारचे बंदी असलेले पशुधन कापले जाणार नाही

- त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, एक वेटर्नरी डॉक्टर आणि गोरक्षकांसह समिती स्थापन करण्यात येणार आहे.

- या समितीच्या निगराणीखाली तेथील कत्तलखान्याचे कामकाज चालणार आहे

- त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे गोवंश किंवा बंदी असलेले पशुधन कापले जाणार नाही

- त्याबाबत महापालिका आयुक्तांनी विविध संघटनांची बैठक बोलवली आहे

- त्याठिकाणी चुकीचे काम होणार नाही याबाबत आयुक्तांनी आश्वासन दिले आहे

- जर चुकीचे होत असेल तर आम्ही तो निर्णय बदलायला लावणार

Akola: दुर्देवी! अकोल्यात कुलरचा शॉक लागून 18 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

अकोल्यात कूलरचा शॉक लागून एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय..

अकोल्यातल्या कान्हेरी सरप येथे ही घटना घडली आहे.. रोहित विठ्ठल बावस्कर असं मृत तरुणाचं नाव आहे.

18 वर्षांचा रोहित हा दररोज पोलिस भरतीसाठी सराव करायचा, रविवारी सकाळी चार वाजता नेहमीप्रमाणे पोलिस भरतीचा सराव करण्यासाठी झोपेतून उठलेल्या रोहितला पायात बूट घालत असताना कुलरचा जबर शॉक लागलाय..

त्यात रोहितचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मागील वर्षात कुलरचा शॉप लागून जवळपास 9 जणांना मृत्यू झाला होता..

या वर्षात कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची ही पहिली घटना समोर आली.. त्यामुळे नागरिकांनी कुलर वापरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे..

वानरलिंगी सुळक्यावर तिरंगा फडकवत चिमुकल्या प्रांजलने पहलगाममधील मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली

काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जुन्नर तालुक्याच्या नारायणगाव येथील प्रांजल चव्हाण या आठ वर्षाच्या छोट्या चिमुरडीने चढाईत अवघड असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ला ते वानरलिंगी पिनॅकल व्हॅली हे 220 फूट अंतर दोरीच्या सहाय्याने क्रॉस करत वानरलिंगी सुळक्यावर वर जाऊन तिरंगा फडकवला व पहलगाम मधील मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली.. त्याचबरोबर दहशतवाद्यांना शिक्षा करण्याच्या मागणीचा बॅनरही फडकवला. अतिशय अवघड असणाऱ्या वानरलिंगी सुळक्यावर काही काळ थांबून प्रांजल ने दोरीच्या सहाय्याने 350 फूट उंच सुळका रॅपलिंग करत खाली उतरली..

स्लग-चांदवड दत्ताचे शिंगवे येथे बिबट्याचे दर्शन, श्री दत्त मंदिराच्या पायऱ्यांवर बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दत्ताचे शिंगवे येथील श्रीदत्त मंदिराच्या पायऱ्यावर बिबट्याचे दर्शन दर्शन झाले मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास बिबट्याने मंदिराचे ट्रस्टी यांच्या घरातील पाळीव कुत्र्याचा फडशा पडल्यानंतर तो मंदिराच्या पायऱ्या चढून वर गेला आणि पायऱ्यांवर पहुडलेल्या अवस्थेत सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.गेल्या पंधरा दिवसांपासून मनमाडसह परिसरातील दहा किलोमीटर परिसरात बिबट्याचे वावर वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे.

Pandharpur Crime: मोबाईलच्या वादातून पत्नीची पती आणि सासूला मारहाण

मोबाईलच्या वादातून पत्नीने चक्क पती आणि सासूला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

पंढरपूर तालुक्यातील नळी गावातील पायल नवनाथ नगरे हिच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात सासूने फिर्याद दिली आहे.

मोबाईलचा वादातून पायल नगरे हिने पती नवनाथ व सासू मंगल यांना लोखंडी रॅड आणि दगडने मारहाण करून जखमी केले आहे.

Dharashiv: आशा सेविकांचा पगार तीन महिन्यांपासुन थकला, थकीत पगार त्वरीत देण्याची आशा सेविकांची मागणी

धाराशिव जिल्ह्यातील 1 हजार 350 आशा सेविकांचा केंद्र सरकारच्या कोट्यातील पगार मागील तीन महीन्यापासुन थकीत आहे.

त्यामुळे आशा सेविकांची आर्थीक ओढाताण होत असुन तीन महीन्यांचे प्रत्येकी नऊ हजार रुपये प्रमाणे पगार थकीत आहे.

हा थकीत पगार त्वरीत द्यावा अशी मागणी आशा सेविकांतुन होत आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानास मंजुरी मिळणे बाकी असल्याने ही पगार थकल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडुन सांगण्यात येत आहे.

दरम्यान हे वेतन देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Solapur: गॅसच्या स्फोटाने शेतवस्तीवर लागली आग; रोकड, १३ तोळे सोने आणि धान्य जळून झाले खाक

दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर मध्ये घडली घटना

विंचूर मधील फुलारींच्या शेतवस्तीत गॅसचा स्फोट होऊन लागली मोठी आग

या आगीत संसारउपयोगी साहित्य, सोने आणि धान्य जळून खाक झाले आहे.

या आगीत एका गाईच्या खोंडाचा देखील होरपळून मृत्यू झाला आहे.

दरम्यान, फुलारी कुटुंबातील आजी - आजोबा आपल्या ६ नातवंडासह घराबाहेरील झाडाखाली बसल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे.

दरम्यान,या भीषण आगीमुळे १५ सदस्यांचा परिवार आता उघड्यावर पाडला आहे.

या घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश दक्षिण सोलापूर महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.

Beed: बीड शहराला 15 ते 20 दिवसाआड पाणीपुरवठा, भर उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल

बीड शहराला पंधरा ते वीस दिवसाआड पाणीपुरवठा होत असून या वेळेस सोडलेले पाणी मोठ्या प्रमाणात गढुळ आहे. यामुळे पिण्यासाठी नागरिकांंना विकत पाणी घ्यावे लागत आहे.

यापूर्वी नाळवंडी नाका परिसराला उशिराने सोडण्यात आलेल्या पाण्यात जंतु आढळल्याने वापरासाठी देखील पाणी विकत घ्यावे लागले होते. एक हजार लिटर पाण्यासाठी 400 ते 500 रूपये मोजावे लागत आहेत.

यामुळे नागरिकांचे भर उन्हाळ्यात प्रचंड हाल होत आहेत. तर आर्थिक झळ देखील सोसावी लागत आहे.

यामुळे बीड नगरपरिषदेने तात्काळ दखल घेऊन स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा आणि वेळेत करावा अशी मागणी बीड शहरातील गजानन नगर येथील महिलांकडून करण्यात आली आहे.

तर यावेळी महिलांनी बोलताना मुलांचं आरोग्य धोक्यात असल्याचं देखील म्हटलंय..

Unseasonal Rain: वादळी वाऱ्यासह गारपीटीनं भातपीक जमीनदोस्त, भातपीकासह बागायती शेतीला जबर फटका

मागील सात दिवसांपासून भंडाऱ्यात वादळीवारा आणि गारपीटसह अवकाळी पावसानं हजेरी लावलीय.

प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वादळामुळं हातातोंडाशी आलेलं अनेक शेतकऱ्यांचं उन्हाळी भातपीक जमीनदोस्त झालेलं आहे.

वादळी वारा आणि गारपीटमुळं भातपिकाची लोंबी गळाली असून शेतशिवारामध्ये पाणी साचलेलं आहे.

यामुळं भात पिकाचं उत्पादन घटणार आहे. या सोबतचं बागायती शेतकऱ्यांनाही या अवकाळीचा फटका बसला असून शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे.

महसूल विभागानं प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जाऊन तातडीनं नुकसानीचे पंचनामे करावे आणि राज्य सरकारनं त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.

Bhandara Rain: विजांच्या कडकडाटासह भंडाऱ्यात अवकाळी पाऊस, सलग ८व्या दिवशीही पावसाच्या हजेरीनं शेतकरी चिंतातूर

जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली.

मागील आठ दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी बरसतोय.

सध्या उन्हाळी भात पीक कापणीला आलेला असून वादळीवाऱ्यामुळं भात पीक अक्षरश: शेतात झोपलाय.

भात पिकाच्या मळणीचा खर्च आता शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसणार असून उत्पादनातही मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालीय.

आणखी काही दिवस भंडारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून शेतकरी मेटाकुटीस आलाय.

मोहाडी, लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील आसगाव परिसरातील शेतीला याचा सर्वाधिक फटका बसल्याचं चित्र बघायला मिळतं आहे.

Konkan Mango: कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात

हापूस आंबा बाजारात ४०० रुपयांपासून पुढे

हापूस प्रमाणे कर्नाटक आंब्याला गेल्या काही वर्षांपासून चांगली मागणी

देवगड, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातून होणारी हापूस ची होणारी आवक यंदा वातावरणातील बदलामुळे झाली कमी

दुसऱ्या बाजूला कर्नाटक आंब्याचा हंगाम १५ दिवस उशिरा

कर्नाटकातील आंब्याचा हंगाम १५ एप्रिल पासून सुरू.होतो मात्र याला सुद्धा १५ दिवस उशीर झाला आहे

Chandrashekar Bawankule: विद्यार्थ्यांना ४८ तासांत दाखले द्या महसूलमंत्री बावनकुळेंचे स्पष्ट निर्देश

हलगर्जीपणा केल्यास कारवाई अटळ

महसूल विभागाने जिल्ह्यातील भटक्या जाती व विमुक्त जातीच्या नागरिकांना तातडीने जातीचे दाखले उपलब्ध करून दिले आहेत

त्याचप्रमाणे शिक्षणासाठी महसूल विभागाने विद्याध्यर्थ्यांना अर्ज केल्यापासून ४८ तासात दाखले उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत

जिल्ह्यातील भटक्या जाती व विमुक्त जातीच्या ३ हजार ९६२ नागरिकांना जातीचे दाखले, तर १८ हजार कातकरी नागरिकांपैकी १५ हजारांना जातीचे दाखले, १६ हजार आधार कार्ड, ७०० कुटंबांना पीएम सन्मान निधीचा लाभ, निवासस्थानाजवळ शासकीय गायरान जमिनीतून ७५० कुटुंबाना जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेतली

Maharashtra Politics: काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

अमरावतीत कबड्डी सामना दरम्यान झाली भेट.

अजित पवार आणि सानंदा यांची 15 ते 20 मिनिट चालली चर्चा..

काँग्रेस चे माजी आमदार सानंदा अजित पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार का? चर्चेला आले उधाण.....

Solapur: दक्षिण सोलापुरातील तांदुळवाडी चे ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यात्रेस भाविकांची मोठी गर्दी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडीचे ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांच्या यात्रेस आजपासून सुरुवात झाली.

आज पहाटे पासून श्री नागनाथ महाराज देवस्थानात भाविकांची मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं.

आज ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज आणि ग्रामदैवत श्री महालिंगराया या दोन देवाच्या पालखीचा संपूर्ण गावातून मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली. या दोन देवांच्या पालखी समवेत तीन काट्याची ही मिरवणूक काढण्यात आली.

या यात्रेस आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दोन्ही देवांच्या पालख्या आणि तीन काठ्यांची मिरवणूक संपन्न झाल्यानंतर दोन्ही देवांची पालख्या आणि तीनीही काठ्या नागनाथ महाराज मंदिरात आल्यानंतर धार्मिक कार्यक्रमांचे करण्यात येईल.

Bhandara: वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू, पशु पालकाचं मोठं आर्थिक नुकसान

काल सायंकाळपासून भंडारा जिल्ह्यातील अवकाळी पाऊस कुठं रिमझिम तर, कुठं मध्यम स्वरूपाचा सुरू आहे.

पहाटेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पुन्हा एकदा जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे.

यात भंडारा जवळील कवडसी इथं वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू झाला. पशु पालक दलिराम निंबार्ते यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

म्हशींचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या दुग्ध व्यवसायावर परिणाम पडला असून पंचनामा करून तातडीनं आर्थिक नुकसान द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Solapur: सोलापूर जिल्ह्यात हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा

- शुक्रवारी 44.7° वर असणारा उन्हाचा पारा, रविवारी 40.6 अंशांची करण्यात आली नोंद

- सोलापुरात हवेचा दाब कमी झाल्याने आद्रता वाढल्यामुळे पावसाला निर्माण झाले आहे पोषक वातावरण

- रविवारी तापमानात घट झाल्यामुळे सोलापूरकरांना मिळाला दिलासा

- सोलापूर जिल्हात सहा आणि सात मे रोजी अवकाळी पावसाचा हवामान खात्याकडून इशारा

- सोलापूर जिल्ह्यातील बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला फटका बसण्याची शक्यता

Hutatma Express: हुतात्मा एक्सप्रेस पुण्यातून आजपासून पाच मिनिटं लवकर निघणार; रेल्वे प्रशासनाची माहिती

पुण्याहून सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांनी आता पाच मिनिटे लवकर यावे लागणार आहे.

कारण आजपासून म्हणजेच 5 मे पासून पुण्याहून सोलापूरला येणारी हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी नियमित वेळेपेक्षा पाच मिनिटे लवकर म्हणजेच सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

मध्य रेल्वेने पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी पुण्याहून सोलापूरकडे रवाना होते,तिच्या निर्धारित वेळेच्या 5 मिनिटे आधी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

ही गाडी गेल्या अनेक महिन्यांपासून सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी सोलापूरच्या दिशेने धावते.या गाडीला प्रवाशांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात असतो.

इतर स्थानकांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही,असे ही रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Panvel: शेकापचे जेष्ठ नेते जे एम म्हात्रे नाराज; भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत

पनवेल उरण मतदारसंघातील शेकाप व महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.. शेकापचे जेष्ठ नेते जे एम म्हात्रे यांनी महाविकास आघाडीवरील नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला ..

तर शेकापमधील काही नेते आमच्याकडे लक्ष देत नाही अशी देखील खंत त्यांनी व्यक्त केली.. त्यामुळे आता नाराज असलेले जे. एम म्हात्रे हे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू झाली आहे ..

दरम्यान पनवेल उरण परिसरात जे एम म्हात्रे व शेकापची मोठी ताकद आहे .. त्यामुळे जर जे एम म्हात्रे हे शेकापमधून बाहेर पडले तर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे …

तर कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल , मग तो कोणताही पक्ष असुदे,.. भाजप किंवा आणखी कोणत्या पक्षात जायच या बद्दल लवकरच निर्णय घेतल जाईल…अस स्पष्ट वक्तव्य जे एम म्हात्रे यांनी केल आहे…

Pune Cyber Crime: पुणे शहरात एका वर्षात सायबर फसवणुकीचे 1562 गुन्हे दाखल

नऊ कोटी चौतीस लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम पोलिसांनी गोठवली

एक कोटी 87 लाख 99 हजार रुपये तक्रारदारांना मिळाले परत

सायबर गुन्ह्यांमध्ये दाखल गुन्ह्यांपैकी 19 गुन्हे उघड तर 43 आरोपींना पोलिसांनी केली अटक

सीबीआय अधिकारी, शेअर मार्केटिंग मध्ये जादा नफा, डेबिट क्रेडिट कार्ड बंद पडणार असल्याची बतावणी यास अनेक प्रकरण द्वारे सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रकार सुरू

एक एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत 1562 गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

वर्षभरात पोलिसांनी सायबर फ्रॉड प्रकरणी दाखल गुन्ह्यांपैकी 19 गुन्हे उघडकीस आणले आहेत

यामध्ये 43 आरोपींना पोलिसांनी केली अटक

Pune News: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आर टी ओ) गाठला उत्पन्नाचा नवीन उच्चांक

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एप्रिल 2024 ते मार्च 2025 या काळात दिलेले 500 कोटींचे टार्गेट जवळपास पूर्ण करून महसूल जमा केला आहे

वाहनांची संबंधित विविध कामे कर व दंडाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात आरटीओने घातला नवीन उच्चांक

आरटीओच्या कार्यालयात वाहन नोंदणी, खरेदी-विक्री, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दंड आकारणी, वायुवेग पथकाची कारवाई यातून माध्यमातून महसूल जमा होत असतो

राज्यात सर्वात जास्त महसूल मिळवून देणारे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आहे

यामुळे या कार्यालयाने 500 कोटींचे टारगेट जवळपास पूर्ण करून महसूल जमा केला आहे

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात आता "नो पार्किंग"

रेल्वे स्थानकाच्या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

प्रवाशांची ने आण करणाऱ्या वाहनांना आणि रिक्षांना मुभा

अधिकृत वाहनतळ वगळता रेल्वे स्टेशनच्या २०० मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

पुणे रेल्वे स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारावर अनेक वेळा बेशिस्तपणे वाहने लावल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असते

रेल्वे स्थानकातील आवारातील कोंडीच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिस आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांची बैठक

येत्या २ दिवसात या आदेशाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेत ७६ कोटींचा मिळकतकर जमा

शहरातील १४ हजार ५९० नागरिकांनी भरलेली ४९ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा

मे महिन्याच्या पहिल्या तीन दिवसात २५ कोटी रुपयांचा कर जमा

अशा प्रकारे एकूण ७६ कोटींचा मिळकत कर पालिकेला जमा झाला आहे

पुणे महापालिकेतर्फे दरवर्षी एक एप्रिल ते 31 मे या कालावधीत निवासी मिळकत करात २५ हजारापर्यंत दहा टक्के व त्या पुढील रकमेवर पाच टक्के सवलत दिली जाते

Maharashtra Politics: येत्या २ दिवसात भाजपच्या कोर कमिटीची बैठक

१० मे रोजी जाहीर होणार राज्यभरातील भाजप जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांची नावे

पुढील २ दिवसात होणाऱ्या भाजपच्या कोर कमिटी मध्ये या संदर्भातील अंतिम निर्णय होणार

१० तारखेला भाजप राज्यातील एकूण ८९ ठिकाणचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती करणार

आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता अनेकांना शहर अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी देण्यात येणार

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून होणार नवीन नियुक्त शहर अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष यांना मार्गदर्शन

Chandrashekhar Bawankule : पुरंदर विमानतळ विरोधी आंदोलनासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार बैठक

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बावनकुळे आज सकाळी 11 वाजता बैठक घेणार

यावेळी विरोध करणाऱ्या गावकरी प्रतिनिधीना बैठकीला बोलवणार

बैठकीनंतर चंद्रशेखर बावानकुळे पत्रकार परिषद घेणार

Amravati: अमरावतीच्या बडनेरा शहरात खुलेआम अवैध वरली, मटका, जुगार सुरू

अवैध धंद्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, परिसरातील नागरिक आक्रमक..

बडनेराच्या आठवडी बाजार परिसरात चालतो खुलेआम वरली मटका...

हिंदू सूर्य प्रतिष्ठानची बडनेरा पोलिसात तक्रार...

अवैध व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी...

हिंदू सूर्य प्रतिष्ठानच्या तक्रारीनंतर पोलीस काय कारवाई करतात, याकडे आता ल

Dharashiv: धाराशिव बसस्थानकात प्रवाशांचे हाल, काम अर्धवट असल्याने गाड्या जुन्याच फलाटांवर

धाराशिव येथील बसस्थानकाच्या नुतन इमारतीचे अंतर्गत सोयी सुविधांचे काम व परीसरातील रस्त्याचे काम अपुर्ण असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत काम अर्धवट असल्याने गाड्या जुन्याच फलाटांवर थांबत आहेत.एकीकडे काम अर्धवट असतानाही उद्घाटनाची घाई करण्यात आली महाराष्ट्र दिनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या बसस्थानकाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले त्यामुळे बसस्थानकातील व परीसरातील राहीलेले अर्धवट काम लवकरात लवकर पुर्ण करावे अशी मागणी प्रवाशांतुन केली जात आहे.

Domvivali: डोंबिवली स्टेशन बाहेर पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान; सुशोभीकरनाचा श्वास कोंडला, केडीएमसीचे दुर्लक्ष

फेरीवाले ,अस्तव्यस्त लागलेल्या रिक्षा, अस्वच्छता यामुळे डोंबिवली स्टेशन परिसराला बकालपणा आला होता .

प्रवाशांना या बजबजपुरीतून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत होती . राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेर कोट्यवधी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात आले .

सुशोभीकरणाच्या कामांतर्गत डोंबिवलीचे नाव साता समुद्रापार नेणाऱ्या साहित्यिक तसेच अनेक मान्यवरांचे भीतीचित्र आणि माहिती लावण्यात आली आहे .

मात्र काही महिन्यातच फेरीवाल्यांनी पुन्हा या भीतीचित्राखालीच आपले बस स्थान मांडल्याचे पाहायला मिळते डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले फेरीवाले हस्तव्यस्त लागलेला रिक्षा यामुळे पुन्हा एकदा स्टेशन परिसराला बकालपणा दिसून येतोय केडीएमसी कडून थातूरमातूर कारवाई होत असल्याने फेरीवाल्यांच्या चांगलेच फावले आहे .

त्यामुळे स्टेशन सुशोभीकरणासाठी करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्च हा फेरीवाल्यांसाठी बेशिस्त रिक्षा चालकांसाठी केला होता का असा सवाल आता संतप्त डोंबिवलीकर करत आहेत .

Maharashtra Weather: यवतमाळ जिल्ह्यात तापमानात वाढ, दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट

यवतमाळ जिल्ह्यात वातावरणातील बदलाचा तापमानावर थेट परिणाम जाणवायला सुरुवात झाली असून यामुळे 38 ते 40 अंशांच्या आत असलेले तापमान वाढून चक्क 45 अंशापर्यंत वर चढले आहे परिणामी दुपारच्या वेळी शहरात संचार बंदीजन्य परिस्थिती पाहायला मिळत आहे वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी कामांच्यावेळा बदलविल्या आहेत बाहेर जाताना अनेक जण पहाटेपासूनच कामाचे नियोजन करतात यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

Karnala: कर्नाळा घाटात खाजगी बसचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू तर १९ जण जखमी

कर्नाळा अभयारण्य मधील घाटात रविवारी रात्री ११ च्या सुमारास झालेल्या बस अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी आहेत.

ओमकार ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरचा बसवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. पनवेल वरून रायगडच्या दिशेला जाणाऱ्या मार्गीकेवर हा अपघात झाला.

घाटात तीव्र वळण असल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

बस उटल्याचे कळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.

या अपघातात जखमी झालेल्यांना कामोठे येथील एमजीएम रूग्णालसात उपचारांसाठी भर्ती करण्यात आले आहे.

Azad Maidan: 20 मे ला आझाद मैदानावर मातंग समाजाचा मोर्चा,  मोर्चात 5 लाख समाज बांधव सहभागी होणार

मातंग समाजातील घटकांचे उपवर्गीकरण करून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात अ ब क ड आरक्षण जाहीर करण्यात यावं त्या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने 20 मे ला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहेत. नांदेडमध्ये राज्यस्तरीय मातंग समाजाची बैठक पार पडली. मुंबईच्या मोर्चात पाच लाख मातंग समाज एकत्र येणार आहे अशी माहिती आमदार अमित गोरखे यांनी दिली आहे.

Yavatmal: कंपणीचे बनविले बनावट लेटरहेड, नामांकित कंपनीच्या नावाने 27 लाखांनी फसवणूक

बायो चुला प्रकल्प चालू करण्यासाठी नामांकित कंपनीचे लेटरहेड बनवून एका शेतकऱ्याची तब्बल 27 लाखांनी फसवणूक केली ही बाब लक्षात येताच शेतकरी योगेश कांबळे यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रतीक कुमार सिंग राहणार रायपूर छत्तीसगढ यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

Shegaon: मॉर्निंग वॉकला गेलेल्या बँक कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

शेगाव शहरातील खामगाव रोडवरील शिवांश सेलिब्रेशनजवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

मृत व्यक्तीचे नाव महेंद्र श्रीराम सोंडकर (वय ५४, रा. अकोला) असे आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिस नियंत्रण कक्ष क्रमांक ११२ वर दिली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, एक पांढऱ्या रंगाचे भरधाव वाहन सोंडकर यांना धडक देऊन घटनास्थळावरून पळून गेले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात पाठविला.

या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

परिसरातील सीसी कॅमेरा फुटेजच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Buldhana: बुलढाण्यात मनमानी पद्धतीने रस्त्याचे बांधकाम, एसटी बस पलटून 12 प्रवासी जखमी

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात घाटपुरी - पिंपळगाव राजा या दोन गावांना जोडणाऱ्या दहा किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे.

एकेरी असणारा हा रस्ता आता दुहेरी होणार आहे. मात्र दुहेरी रस्ता बांधकाम करताना सर्व नियम धाब्यावर बसून या रस्त्याचे बांधकाम केले जात आहे.

दुहेरी रस्ता हा अत्यंत अरुंद असल्याने दोन वाहनांना येजा करताना मोठे अपघात होत आहेत..

एक एसटी बस या अरुंद रस्त्यावरून जात असताना रस्त्याखाली कोसळली ज्यामध्ये 35 जण थोडक्यात बचावले..

दररोज या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. ज्या एमएसआईडीसी विभागाच्या अंतर्गत या रस्त्याचे बांधकाम होत आहे, त्या अधिकाऱ्यांचे या रस्त्या बांधकामाकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय..

त्यामुळे एखाद्या मोठ्या अपघातात जीवित हानी होण्याची वाट एम एस आय डी सी विभाग पाहत आहे का ? असा सवाल उपस्थित केला जातोय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com