Maharashtra Live News Update : कल्याण पूर्व कचोरे परिसरात महावितरणचा गलथान कारभार!

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक १ ऑगस्ट २०२५, फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

कल्याण पूर्व कचोरे परिसरात महावितरणचा गलथान कारभार!

कल्याण पूर्व येथील कचोरे श्रीकृष्ण नगर परिसरात महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.या परिसरातील वीज वाहिन्या वारंवार तुटत असून त्यामुळे अचानक वीज पुरवठा खंडित होतो. परिणामी, नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, मिक्सर यांसारखी महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होत आहेत.

या संदर्भात नागरिकांनी वारंवार महावितरणकडे तक्रारी करून वीज वाहिनी बदलण्याची मागणी केली आहे. मात्र, महावितरण यंत्रणेकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा स्थानिकांनी केला आहे.

सदगुरू गंगागिरी महाराज १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर व अन्य आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याचा निर्णय दिला

त्यांच्यावरील आरोप सिद्ध करता आले नाही,त्यांना न्याय मिळाला मात दुर्दैव आहे हा न्याय 17 वर्षानंतर मिळाला,एका साधवीला अपराध केलेला नसताना 9 वर्ष जेल मध्ये रहाव लागलं ही दुर्दैव आहे.

या प्रकरणा मागे असणारे राजनेते ज्यांनी हिंदू देखील आतंकवादी आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले,भगवा आतंकवाद शब्द ज्या राजनेत्यांनी वापरला अश्यांपासून सावध राहणे गरजेचे.

सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी

सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी

राजाराम पूल ते डीपी रोड एक किलोमीटर पर्यंत मोठ्या रांगा

पुणे शहरात प्रचंड जागोजागी ट्राफिक जाम

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी मिरवणुका सुरू आहेत त्याचा फटका वाहतूक कोंडीला

मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

यवतमध्ये पुणे एटीएसची टीम दाखल

यवत मध्ये पुणे एटीएसची टीम दाखल झाली आहे

टीम कडून संपूर्ण गावातील माहिती घेतली गेली

गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन मिळत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने केले आंदोलन

गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन मिळत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने केले आंदोलन

स्वतः मुख्यमंत्री पालकमंत्री असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा मिळत नसल्याने केले भीक मांगो आंदोलन

स्थानिक गांधी चौकात केलेल्या भिक मांगो आंदोलनाने वेधले गडचिरोली वासियांचे लक्ष

नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयात पदभरतीत होत असलेला विलंब देखील या निमित्ताने आला पुढे

नक्षल सप्ताहादरम्यान अतिदुर्गम दामरंचा येथील नागरिकांनी माओवाद्यांच्या भीतीला झुगारत भरमार बंदूका केल्या पोलीसांच्या स्वाधीन

नक्षल सप्ताहादरम्यान अतिदुर्गम दामरंचा येथील नागरिकांनी माओवाद्यांच्या भीतीला झुगारत भरमार बंदूका केल्या पोलीसांच्या स्वाधीन

एकूण ०३ नग भरमार व ०१ नग बंदुकीचे बॅरेल केले दामरंचा पोलीसांच्या स्वाधीन

नागरी कृती उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीचे फलीत; नागरिकांचा पोलीस दलाप्रति विश्वास होतो आहे दृढ

yavat : अफवांवर विश्वास ठेवू नका, यवतमधील परिस्थिती नियंत्रणात - पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी

चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूककोंडीवर रुग्णवाहिकेला मार्ग मिळेना

चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीवर रुग्णवाहिकेला मार्ग मिळेना झाला आहे.

पुणे नाशिक महामार्गावर चाकणच्या वाहतुककोंडीतुन रुग्ण घेऊन जाणा-या रुग्णवाहिकेला मार्ग काढत डिव्हाडरवरुन जावं लागल्याचा प्रकार घडलाय

पुणे नाशिक महामार्गावर चार किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगा

'श्यामची आई'ला सर्वोत्कृष्ट मराठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

'श्यामची आई'ला सर्वोत्कृष्ट मराठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. आज ७१ व्या चित्रपट पुरस्काराची घोषणा झाली.

Pimpri chinchwad : रस्ताने जाणाऱ्या चारचाकी वाहनावर मोठी क्रेन कोसळली 

पिंपरी चिंचवड शहरातील जाधव वाडी परिसरामध्ये एक मोठी क्रेन रस्त्याने जाणाऱ्या चार चाकी वाहनावर अचानक कोसळली आहे. माल वाहतूक करत असताना फ्रेंच तोल बिघडल्याने क्रेन चक्क रस्त्यावरून जाणाऱ्या एका चार चाकी कारवर जाऊन कोसळली आहे.

यवतच्या घटनेवर पुणे पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद 

पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि पुणे पोलीस अधीक्षक संदीप पत्रकार परिषद घेणार आहेत.

यवत पोलीस स्टेशन परिसरात काही वेळात पत्रकार परिषद घेतील

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला यवत येथील परिस्थितीचा आढावा

अजित पवार यांनी यवत मध्ये झालेल्या हिंसाचाराचा आढावा घेतला

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार तातडीन यवतला रवाना

यवत मध्ये झालेल्या हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी अजित पवार रवाना

पुण्यातील कार्यक्रम रद्द करून अजित पवार निघाले

कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करा -पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

जिल्ह्याचे प्रशासन व व्यवस्थापन ज्यांच्या अधिपत्याखाली चालतो असा हा महसूल विभाग. जिल्ह्यात विविध कामांची मोठी जबाबदारी महसूल विभागावर आहे. महसूल विभागात काम करतांना नागरिकांना चांगली सेवा देण्याची संधी नोकरीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना लाभली आहे. या संधीचा फायदा नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी करा. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला कामाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपदान पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित महसूल दिन कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील इमारतीवर आंदोलक महिला चढल्या

इमारतीच्या छतावर चढत दोन महिलांचा आत्महत्येचा इशारा

पवन चक्की कंपनीकडून अन्याय होत असल्याची भावना

गेल्या दोन तासांपासून धाराशिव मध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन

रास्तारोको, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आता दोन महिला इमारतीच्या छतावर चढल्या

चारकोपचा राजा अखेर विसर्जनासाठी उद्या होणार मार्गस्थ

१७७ दिवस कोर्टाच्या लढाईत अडकलेला चारकोपचा राजा अखेर विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय. उद्या २ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता चारकोप सेक्टर १ येथून मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. गुलाल उधळत, ढोल-ताशांच्या गजरात भव्य सोहळा रंगणार असून अनेक अभिनेते आणि राजकीय नेतेही उपस्थित राहणार आहेत. गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

यवत गावात पुन्हा तणावाची ठिणगी; आक्षेपार्ह पोस्टमुळे आठवडे बाजार बंद

पुणे जिल्ह्यातील यवत गावात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) सकाळी यवतमधील एका मुस्लिम युवकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर काही तासांतच, दुपारी १२ वाजेनंतर यवतचा आठवडे बाजार बंद करण्यात आला, आणि परिसरात तणाव वाढू लागला.

आयटी नगरीच्या विकास कामावरून हिंजवडीचे ग्रामस्थ झाले आक्रमक

आयटीनगरी हिंजवडीच्या विकास कामांवरून हिंजवडी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मवाळकीची भूमिका घेऊन रस्त्यांविषयी योग्य मार्ग काढावा, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावं लागेल असा इशारा हिंजवडचे सरपंच गणेश जांभूळकर यांनी दिलाय.

वाळू माफियांची शहरातून डेप्युटी कलेक्टरकडून धिंड

हिंगोलीत महसूल प्रशासनाच्या पथकावर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांना हिंगोलीचे डेप्युटी कलेक्टर समाधान घुटुकडे यांनी चांगलीच अद्दल घडवली आहे, पोलिसांनी वाळू माफियांना अटक केल्यानंतर महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उपविभागीय दंडाधिकारी समाधान घुटुकडे यांनी हाताला हातकडी घातलेल्या अवस्थेत दोन वाळू माफियांची शहरातून दिंड काढली आहे.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक,  सीईओ आणि मठाधिपती यांच्यात चर्चा

कोल्हापुरातील माधुरी हत्तीणीवरून वाद सुरू. अशातच या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू आहे. या बैठकीत मात्र लोकप्रतिनिधी अनुपस्थितीत. या बैठकीत कोणताही राजकीय व्यक्ती उपस्थित राहणार नाही. केवळ सीईओ आणि मठाधिपती यांच्यातच सुरू आहे बैठक.

पवनचक्कीविरोधात आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी आक्रमक

पवनचक्की विरोधात आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी आक्रमक,

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी घुसले, जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद,महिला सह शेतकरी आक्रमक

पोलिसांच्या आणि शेतकऱ्यांची झटापट, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारासमोर ठिय्या आंदोलन

उपोषणाला बसलेल्या तीन शेतकऱ्यांची प्रकृती ढासळली त्यामुळे शेतकरी आक्रमक, पाच दिवसापासून शेतकरी आंदोलनावर तोडगा नाही

पवनचक्की बाधित शेतकरी आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांच समर्थन

Maharashtra Live News Update : बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात बैठक, बैठकीला ज्ञानेश्वरी मुंडेंसह कुटुंब उपस्थित

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज बीडमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय संघटनेची व्यापक बैठक आयोजित केली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात बैठकीला सुरुवात झाली आहे. बैठकीला बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह सर्वपक्षीय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. महादेव मुंडे यांचे कुटुंब देखील या बैठकीला उपस्थित आहेत.

धाराशिव पवनचक्की विरोधात आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी आक्रमक, धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको

उपोषणाला बसलेल्या तीन शेतकऱ्यांची प्रकृती ढासळली त्यामुळे शेतकरी आक्रमक , पाच दिवसापासून शेतकरी आंदोलनावर तोडगा नाही

पवनचक्की बाधित शेतकरी आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांच समर्थन

शेतकऱ्यांच्या रास्ता रोकोमध्ये आमदार कैलास पाटीलही सहभागी

पवनचक्की कंपन्यांनी योग्य मोबदला न दिल्याच्या आरोप करत शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासूच वाहतूक कोंडी झाली आहे.

महामार्गावर पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे वाहनांची गती मंदावली आहे

घोडबंदर येथील गायमुख परिसरातील रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडल्यामुळे याच फटका वाहतुकीवर बसला आहे.

मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या तसेच गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या दोन्ही लाईनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

यामुळे या मार्गावर 20 ते 25 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे अनेक तासांपासून वाहने एकाच जाग्यावर उभ्या असल्यामुळे वाहन चालक हैराण झाले आहे.

आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूल दिन 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट महसुली सप्ताह शुभारंभ झालेला आहे राज्याच्या सर्व पालकमंत्री याचा समारंभ आपापल्या जिल्ह्यात करत आहे... नागपूर जिल्ह्यात केला आणि भंडारा जिल्ह्यात जातो आहे.
चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

महादेवी (माधुरी) हत्तीनी संदर्भात मोठी हालचाल!

खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याने वनतारा प्रकल्पाचे सी.ई.ओ. विहान करणी आणि त्यांची टीम कोल्हापुरात दाखल होत आहे.

व्यवस्थापक मंडळ घेणार महाराजांची भेट

जैन समाजाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर दौऱ्यात श्रीकांत शिंदेंची भेट घेऊन लोकभावना सांगितली यावर शिंदे यांनी पुढाकार घेऊन अनंत अंबानी यांच्याशी सकारात्मक चर्चा करून सर्वांना चार्टर विमानाची सोय करून दिली.

वनतारा सीईओ विहान करणी, खास. धनंजय महाडिक, खास. धैर्यशील माने, जय पेंढारकर, साहिल शेख, अजित कुमार धनी राम सरोज, विजय शितोळे सर्व टीम कोल्हापूर दाखल होत आहे

उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर, ९ सप्टेंबरला होणार

धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. ९ सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. यासाठी २१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

Nandurbar: नंदूरबारमध्ये रेशन न मिळाल्याने श्रीखेड येथील ग्रामस्थ आक्रमक 

शहादा तहसील कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा...

शहादा तालुक्यातील श्रीखेड गावातील रेशन दुकानदार तीन ते पाच महिन्यांपासून धान्य देत नसल्याने गावकरी संतप्त....

रेशन दुकानदार मनमानी करत असून, महिन्यातून एकदाच वाटप करत असल्याने रेशन घेण्यासाठी रांगा लावाव्या लागत असल्याने महिलांचा त्रास वाढला....

रेशन दुकानाचा परवाना रद्द करून कुरंगी येथील दुकानाला जोडण्याची ग्रामस्थांची मागणी.....

संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालय गाठून अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली तक्रार. प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष....

कृषी मंत्री पदाची सर्वात पहिली ऑफर अजित दादांनी मला दिली होती- छगन भुजबळ

- मंत्री छगन भुजबळांचा नाशिकमध्ये गौप्यस्फोट

- भाजप आणि शिंदेंसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित दादांनी अर्थ खाते स्वतःकडे ठेवल्यानंतर सर्वात आधी कृषी खात्याची ऑफर दिल्याची भुजबळांची माहिती*

- कृषी मंत्री ग्रामीण भागातील असला तर जास्त न्याय देऊ शकतो अशी माझी भूमिका होती

- कुठलेही खाते लहान मोठे नसते, आपण काय काम करतो यावर अवलंबून असतं

Solapur: सोलापुरातील नामांकित शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांनीचा 56 वर्षीय शिक्षकाकडून विनयभंग

- सोलापुरातील नामवंत खाजगी शाळेतून धक्कादायक प्रकार समोर

- खाजगी शाळेतील 56 वर्षीय शिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग

- 19 एप्रिल ते 3 जुलैच्या दरम्यान शाळेच्या पार्किंग मध्ये घडला प्रकार

- विनयभंग करणाऱ्या शिक्षकाने धमकावल्याने विद्यार्थिनीने कोणाकडेही केली नव्हती तक्रार

- तुला काही ज्ञान नाही, तू काही कामाची नाहीस, तु दहावीला आहे, आता तु चांगली सापडली आहेस अशा अनेक प्रकारे पीडित विद्यार्थ्यांनीला देण्यात येत होती धमकी

Tuljavhavani Mandir: तुळजाभवानी देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातून दर्शन केले बंद,भाविकांना आजपासून फक्त मुखदर्शन

सिंहाच्या गाभाऱ्यातील सिंह आणि दर्शन व्यवस्थेसाठी असलेली व्यवस्था हटवली

भवानीशंकर मंडपातून भाविकांना देवीचे मुखदर्शन घेता येणार

1 ते 10 ऑगस्ट दरम्यान देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील संवर्धनाच काम त्यामुळे दर्शन बंद

देवीच्या नियमित असलेल्या सिंहासन पूजा आणि अभिषेक पूजा सुरळीत सुरू राहणार

तुळजाभवानी देवीच्या दर्शन व्यवस्थेत करण्यात आला बदल

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडमध्ये

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडमध्ये आली आहे. राज ठाकरेंनी तयारीला लागा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

संस्कृत आणि देशाचे सूत्रसंचालन एक सुर आहे- मोहन भागवत

संस्कृत सूत्र रुपात आलं आहे, विकासनशील विद्यापीठ आहे, त्याचा उल्लेख होतो त्यावर बोलावं हा अधिकार शासनाचा असल्यानं शिल्लक काही नाही...

संस्कृत आणि देशाचे सूत्रसंचालन एक सुर आहे...

भारताला आत्मनिर्भर झालं पाहिजे, त्यावर आपली प्रगती होईल, बाळाचा पाठीमागे प्रत्येकाची अस्मिता असते..

त्या बळावर प्रगती होते.

हिरन्यकश्यपचा वध झाला, प्रल्हाद याला इंद्र राज्य मागायला गेला, त्यावेळी इंद्राने सत्व मागितल, ते सत्व इंद्राला मिळाली, त्या स्स्तवासोबत बल।गेलं, तिसर ओजही गेलं, स्त्व बळ, ओज ,आणि लक्ष्मी हे गेलं...

आपल्या रोमा रोमात (सत्व) असत, स्व निर्भर झालं की बाकी गोष्टी आपोआप येतात- मोहन भागवत

Pune: पुण्यात ७० लाख ते दोन कोटींच्या घरांची मागणी तिपटीने वाढली

गेल्या चार वर्षांत पुण्याच्या बांधकाम क्षेत्रातील स्थिती

क्रेडाई आणि ‘सीआरई मॅट्रिक्स’चा अहवाल

बांधकाम क्षेत्रातील गृहनिर्माणामध्ये पुणे पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक किफायतशीर आणि विक्रीत आघाडीचे महानगर

गेल्या तीन वर्षांत घराच्या सरासरी किमतीत २७ टक्के वाढ तर ७० लाख ते दोन कोटी रुपये किमतीच्या घरांची मागणी गेल्या चार वर्षांत तिपटीने वाढली

२०२५ च्या पहिल्या सहामाहीत पुणे मेट्रोपोलिटन क्षेत्रात ४४ हजार सदनिकांची विक्री

Beed: महादेव मुंडे हत्या प्रकरणात चार संशयितांची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती

- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती.

- गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक रात्रीच झाले होते चौकशी सुरू असलेला लोकांची ओळख गोपनीय ठेवल्याची माहिती.

- महादेव मुंडे हत्या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने महादेव मुंडे हत्या प्रकरणातील चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

Maharashtra Live News Update: कोथिंबीरीचे भाव पडले, शेतकरी पुन्हा अडचणीत

लातूरच्या औसा परिसरातील अनेक शेतकरी कोथिंबीर भाजी पिकाची लागवड करतात, तालुक्यातल्या आशिव शिवारातील कास्ती कोथिंबीरला मोठी मागणी असते, मात्र मोठ्या प्रमाणात कोथिंबीर लागवड झाल्याने, शेतकऱ्यांना फटका बसला आहे, बाजारात कोथिंबिरीची आवक वाढल्याने कोथिंबीरीला सध्या साठ रुपये प्रति कॅरेट भाव मिळतो आहे, दरम्यान एका कॅरेट मध्ये साधारणता 32 कोथींबीरीच्या जूड्या असतात त्यामुळे प्रति जुडी दोन रुपये एवढाच भाव शेतकऱ्यांच्या पदरात पडतो आहे. तर कोथिंबीर लागवडीसाठी एकरी 30 हजार रुपयांचा खर्च करून, लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत

साकोली तलाव फुटल्यानं ४०० हेक्टरमधील पीक पाण्याखाली

साकोली शहराच्या जुन्या वस्तीत असलेल्या ९० एकरातील माजी मालगुजारी तलाव ज्याची जलसंचय क्षमता १२० TCM एवढी आहे. हा तलाव पहाटेच्या सुमारास फुटला. मागील आठवड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर तलाव तुडुंब भरला होता. तलावाची पाळ फुटल्यानं साकोली - लाखांदूर महामार्गावरून ते पाणी प्रवाहित होत असल्यानं या परिसरात असलेले सुमारे ४०० हेक्टर शेतजमीन जलमय झाली असून पिकं पाण्याखाली आली आहे.

माणिकराव कोकाटे कालपासून पुण्यात मुक्कामी

पुण्यातील कृषी महाविद्यालयातील गेस्ट हाऊस मध्ये कोकाटे कालपासून मुक्कामी

कोकाटे यांचे काल पुण्यात कार्यक्रम झाल्यानंतर कोकाटे याच गेस्ट हाऊस मध्ये मुक्कामी

रायगडमध्ये राष्ट्रवादीचा काँगेसला जोरदार धक्का

० अलिबागमध्ये आ. महेंद्र दळवी यांना राष्ट्रवादीने प्रतिस्पर्धी तयार केला

० काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. प्रवीण ठाकूर राष्ट्रवादीत प्रवेश करणार

० उद्या 2 ऑगस्टला माणगाव येथे अजित पवारांच्‍या उपस्थितीत होणार प्रवेश

रायगडमध्ये राष्ट्रवादी जोरदार मुसंडी मारीत असून इतर पक्षातील आमदारकीच्या तोडीचे मोठे नेते राष्ट्रवादी घेत आहे. राष्ट्रवादीने आता अलिबागमध्ये काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. प्रविण ठाकुर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. उद्या 2 ऑगस्टला माणगाव येथे आयोजित सभेत अजित पवारांच्‍या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. या प्रवेशामुळे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या समोर अव्हान उभे रहाणार आहे.

Sindhudurg: आज पासून या हंगामातील मासेमारीला होणार सुरुवात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारपट्ट्यांवर आजपासून अधिकृत मासेमारीचा हंगाम सुरू होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून दरवर्षी लागू करण्यात येणारा पावसाळी हंगामातील मासेमारी बंदीचा कालावधी काल ३१ जुलै रोजी संपुष्टात आला आहे. त्यानुसार आजपासून मासेमारी नौका समुद्रात उतरण्यास सज्ज झाल्या आहेत. मात्र नारळी पौर्णिमे नंतर मोठ्या प्रमाणात मासेमारीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.

Raksha Bandhan: आकर्षक राख्यांची महिलांना भुरळ; रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठ सजली

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधना निमित्त अमरावती शहरातील बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत.महिलांना या राख्या भुरळ घालत आहे. बहिण- भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन शनिवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. महागाईमुळे दरांमध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याचेही व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्यासह पारंपारिक गोंडा राखी (देव राखी) बाजारात विक्रीस दाखल झाली आहे. महिलांकडून राख्यांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. शहराच्या विविध भागांमध्ये लहान- मोठ्या राखी विक्रीचे दुकाने सजल्याचे दिसत आहे.

Dharashiv:धाराशिव जिल्ह्यातील 60 टक्के शेतकऱ्यांनी भरला खरीप पिकविमा

धाराशिव जिल्ह्यात पिकविमा भरण्याच्या अखेरच्या दिवशी चार लाख 15 हजार 386 शेतकऱ्यांनी पिकविमा अर्ज भरत एकुण तीन लाख 32 हजार 967 हेक्टरवरील पिक संरक्षित केली आहेत.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तीन पिकविमा धारक शेतकऱ्यांची घट झाली आहे.त्यामूळे केवळ 60 टक्के शेतकऱ्यांनीच खरीप हंगामातील पिके संरक्षित करण्यात प्राधान्य दिले आहे. दरम्यान एक रुपयात पिकविमा योजना बंद केल्याने शेतकऱ्यांनी पिकविमा भरण्याकडे पाठ फिरवली आहे.

Buldhana: मेहकर मध्ये शिंदे गटाला धक्का; निवडणूकीच्या तोंडावर शेकडो शिवसैनिक उद्धव सेनेत दाखल

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघ हा कायमच शिवसेने सोबत राहिला आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतरही या मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात हे प्रचंड मतांनी निवडून आले. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ही सिद्धार्थ खरात मैदानात उतरले असून त्यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेनेच्या शिंदे गटात गेलेले शेकडो कार्यकर्त्यांनी पुन्हा आ सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात उद्धव सेनेत प्रवेश घेतला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच शिंदे गटाला या मतदारसंघात मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. तर " डरो मत.... आगामी काळ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असेल..!" असा विश्वास आ. सिद्धार्थ खरात यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सॉफ्टवेअर कंपनीचे उद्घाटन

पुण्यातील एस बी रोड या ठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज पहाटेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील स्वारगेट परिसरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं..

Pune: पुण्यात जमिनीच्या वादातून गोळीबार

केसनंद वाढे बोलाई रस्त्यावर असलेल्या नर्सरी बोलाई रोड या ठिकाणची घटना

गोळीबारात एक जण गंभीर

गोळीबारात सुशील संभाजी ढोरे जखमी

सचिन राजाराम ढोरे

भिवराज सुरेश हरगुडे, गणेश जाधव असे गोळीबार केलेल्या संशयितांचे नावे

Nagpur: नागपूमध्ये बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात तीन शिक्षकांना अटक

* बोगस शालार्थ आयडी प्रकरणात अधिकारी, संस्था चालकानंतर आता थेट लाभार्थी शिक्षक टार्गेटवर..

* अटक करण्यात आलेल्या तीन शिक्षकामध्ये दोन महिला शिक्षकांचा समावेश अजून काही ईतर बोगस शिक्षकावर कारवाई होण्याची शक्यता...

* सतीश पवार, प्रज्ञा मुळे आणि भुमिका नखाते अशी अटक करण्यात आलेल्या शिक्षक शिक्षिकेची नावे आहेत..

* या तिनही शिक्षकांनी बोगस शालार्थ आयडी प्रणालीचा वापर करत 22 महिन्यात 25 लाखाहून अधिक वेतन मिळविल्याची माहिती..

Maharashtra Live News Update: मंत्रिमंडळात फेरबदल, कोकाटेंकडे कोणते खाते?

राज्य मंत्रिमंडळातील दत्तात्रय भरणे व माणिकराव कोकाटे यांच्याकडील खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार कृषी खाते दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले असून क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औेकाफ हे खाते माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आले आहे.

प्रमिलाताई मेढे यांच्या पार्थिवाचे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले..

* राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे यांच्या पार्थिवाचे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले..

- काल रात्री अहिल्यामंदिरात जाऊन त्यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले...

* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम दर्शन घेत त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

* सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आणि महिला सशक्तिकरणात त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील, आणि प्रेरणा मिळत राहील अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली..

* यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताअक्का व समितीच्या सदस्यांची भेट घेत, सांत्वन केले.

आमदार रमेश कराड यांच्या जनता दरबारात नागरिकांची गर्दी

लातूर ग्रामीणचे भाजपाचे आमदार रमेश कराड यांनी मतदारसंघातील ममदापूर येथे जनता दरबार घेतला आहे. ग्रामीण भागातील नागरिक आपल्या वेगवेगळे प्रश्न, आणि अडचणी घेऊन, या दरबारात उपस्थित झाले होते. दरम्यान संबंधित विभागाचे अधिकारी दरबारात उपस्थित असल्याने अनेकांचे प्रश्न जागीच मिटले आहेत. तर लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच आमदार रमेश कराड यांनी जनता दरबाराची सुरुवात केली. आणि या जनता दरबाराला नागरिकांनी देखील प्रतिसाद दिला आहे

दोन्ही बंधू एकत्र आल्याने शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश थांबतील या निराधार बातम्या आहेत
संजय राठोड

कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात उंदरांचं साम्राज्य.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात काही दिवसापूर्वी एका रुग्णाचा उंदराने पाय कुरतडल्याचा प्रकार समोर आला होता. या गंभीर प्रकारानंतर आता नांदेडच्या कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिला रुग्णावर चक्क उंदीर खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.ही महिला रुग्ण झोपलेली असताना तिच्या अंगावर उंदीर बिनधास्तपणे फिरताना दिसत आहे.दरम्यान रुग्णालयात सर्वत्र उंदरांचं साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसत आहे.ही घटना गंभीर असून काही दिवसांपूर्वीच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका वयोवृद्ध रुग्णाच्या पायाला उंदीराने कुरतडल्याचा प्रकार समोर आला होता.आता या घटनांमुळे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमधील दयनीय अवस्था आणि रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अकोल्यात सराईत गुन्हेगाराची धिंड... गुन्हेगाराने कान पकडून नागरिकांना मागितली माफी...

अकोल्यात सराईत गुन्हेगाराची धिंड काढण्यात आली आहे.. अकोला पोलिसांकडून जुने शहरातल्या सोनटक्के भागात परिसरात दहशत माजवणाऱ्या या गुन्हेगाराचा 'रोड शो' करण्यात आलाय. या गुंडानं कान पकडून रस्त्यावर बसत परिसरातल्या नागरिकांना माफी मागितली. टोळीने गॅंगवॉर करणाऱ्या 'आसिफ खान' असे गुन्हेगाराचे नाव आहे.. त्याच्यावर प्राणघातक हल्ला करणे, यासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत गुन्हेगारांवर वचक निर्माणकरण्यासाठी अकोला पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढायला सुरुवात केलीय.. मागील काही दिवसांत अकोला पोलिसांनी 3 ठिकाणी टोळीने गुन्हेगारी करणाऱ्यांची धिंड काढली आहे.. त्यामुळे या गुन्हेगारांना अकोला पोलिसांचा चांगलाच धसका बसला आहे..

वाडेगावच्या 'लाल तोंड्या माकडा'ची दहशत संपली...

अकोल्यातल्या वाडेगाव परिसरात लाल तोंड्या माकडाची दहशत संपलीये. कारण, अकोल्याचे वन विभागाने रेस्क्यू करून हैदोस घालणाऱ्या माकडाला पिंजरकैद केलंय.. वाडेगावच्या मुख्य रस्त्यावर व वसतीत या माकडाने मोठा हैदोस घातला होता, अनेकांच्या अंगावर धावुन जाणे, रस्ता अडवणे, नागरिकांना चावणे अशाप्रकारे हैदोस करणाऱ्या माकडाला अखेर वन विभागाने रेस्क्यू करून पिंजराकैद केलंये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com