Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कुठे कसा राहील पावसाचा अंदाज? कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी इशारा

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून विदर्भातील काही जिल्ह्यांत येलो अलर्ट देण्यात आला आहे.
Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे,
Maharashtra RainSaam tv
Published On

IMD Maharashtra weather alert latest update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी आता हवामानात मोठा बदल झाला आहे. पुढील काही दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आजपासून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुठे कसा राहील पावसाचा अंदाज?

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक, पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त राहू शकतो. तर नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे,
Earthquake: मोठी बातमी! गणपतीच्या आरतीवेळीच नाशिक थरारलं, भूकंपानं जमिनीला पडल्या मोठ्या भेगा, नागरिक दहशतीखाली

विदर्भ मराठवाड्यात पावसाचा सर्वाधिक जोर

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या भागात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ परिसरातही पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून येथेही काही भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे,
पुण्यातील नवले पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात: ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची अनेक वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

शेतकऱ्यांना अन् नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामानाच्या स्थितीमुळे बाष्प वाढले आहे. त्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह अचानक पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुणे-मुंबईत ढगाळ वातावर राहू शकते असाही अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com