Ahmednagar Crime News: सावधान! 'डिलिव्हरी बॉय'च्या वेशात घरफोड्या करणाऱ्या चोरांची टोळी; पोलिसांसमोर मोठं आव्हान

‘डिलेव्हरी बॉय’च्या वेशात भरदिवसा इमारतींमध्ये घुसून घरफोड्या करणार्‍या टोळीने नगर शहरासह उपनगरी भागात चांगलाच उच्छाद मांडला आहे.
File photos
File photosSaam tv
Published On: 

सुशील थोरात

Ahmednagar Crime News: ऑनलाईन प्रॉडक्टच्या ‘डिलेव्हरी बॉय’च्या वेशात भरदिवसा इमारतींमध्ये घुसून घरफोड्या करणार्‍या टोळीने नगर शहरासह उपनगरी भागात चांगलाच उच्छाद मांडला आहे. अनेक ठिकाणी या टोळीचे कारनामे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यामुळे या टोळीला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. शहरात व उपनगरी भागात गेल्या काही दिवसांपासून भरदिवसा बंद घरे, अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून घरफोड्या होत आहेत. (Latest Marathi News)

पोलिसांनी जंगजंग पछाडूनही अनेक घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत. त्यामुळे घरफोड्यांचे हे सत्र सुरुच असून शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. कायनेटीक चौकाजवळील राष्ट्रवादी भवन शेजारी असलेल्या साईश्रद्धा अपार्टमेंटमध्ये तसेच त्यानंतर केडगावच्या मोतीनगर भागातील राज अपार्टमेंटमध्ये अशा दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या.

File photos
Sangli Crime News : सांगली हादरली! आरडाओरड, किंचाळ्या.. सिनेस्टाईल पाठलाग करत महाविद्यालयीन तरुणाला भररस्त्यात संपवलं

पोलिसांनी दोन्हीही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज् तपासले असता एक धक्कादायक प्रकार समोर आला. दोन्ही ठिकाणी घरफोड्या करणारा चोरटा एकच असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.. या पहाणीमध्ये चोर्‍या करणारा चोरटा एकच असून तो ऑनलाईन प्रोडक्टची डिलिव्हरी करणार्‍या डिलिव्हरी बॉयच्या वेशात असल्याचे दिसून आले.

महागड्या केटीएम या विना क्रमांकाच्या दुचाकीवर काळ्या रंगाचा टि शर्ट, काळी कॅप, डोळ्याला काळ्या रंगाचा ब्रँण्डेड गॉगल अशा वेशात व पाठीवर मोठी बॅग असलेला अंदाजे 28 ते 30 वयाचा युवक ऐटीत आला. त्याने पार्कींगमध्ये दुचाकी लावली व बेडरपणे लिफ्टने पाचव्या मजल्यावर गेला.

तेथे पाहणी करत तो जिन्याने दुसर्‍या मजल्यावर आला. त्या मजल्यावरील कासार यांच्या फ्लॅटला कुलूप दिसल्याने त्याने कशाच्या तरी साहाय्याने सेफ्टीडोअरचे कुलूप तोडून लाकडी दरवाजा उचकटून आत गेला व थोड्याच वेळात तेथून चोरी करुन बाहेर पडला आणि अवघ्या 10 मिनिटात पार्कींगमधून दुचाकी काढून तेथून निघून गेला.

File photos
Rahul Gandhi Meet Uddhav Thackeray: राहुल गांधी 'मातोश्री'वर येणार? संजय राऊत यांनी व्यक्त केली शक्यता

असाच प्रकार केडगावच्या मोतीनगरमध्येही घडल्याचे सीसीटिव्हीत दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी बारकाईने तपास सुरू केल्यावर डिलिव्हरी बॉयच्या वेशात दिवसा घरफोड्या करणारी एक टोळीच शहरात कार्यरत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या टोळीचा कसून शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.