School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Ahilyanagar News : संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयात पठार भागातून विद्यार्थी घेऊन तीन बस जात असतात. रोज प्रमाणे सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन बस मार्गस्थ झाल्या होत्या
School Bus Accident
School Bus AccidentSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहिल्यानगर) : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. नाशिक- पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात हा अपघात झाला असून या अपघातग्रस्त बसमध्ये ३५ हून अधिक विद्यार्थी होते. या अपघातात बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयात पठार भागातून विद्यार्थी घेऊन तीन बस जात असतात. रोज प्रमाणे सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन बस मार्गस्थ झाल्या होत्या. यात आज सकाळी एक बस ३५ हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन चंदनापुरी गावाकडे निघाली होती. या बसला अपघात झाला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या गटारमध्ये बस पलटी झाली आहे. 

School Bus Accident
Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी 

दरम्यान सध्या पुणे- नाशिक महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. अशातच या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. यातच स्कूल बसला समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने ही स्कूल बस चालकाचा ताबा सुटला. यानंतर बस चंदनापुरी घाटात रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईट गटारात पलटी झाली. यामुळे बसमध्ये असलेल्या विद्यार्थी जखमी झाले आहेत. 

School Bus Accident
Dragan Fruit Farming : माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; येवल्याच्या दुष्काळग्रस्त भागात यशस्वी प्रयोग

जखमी विद्यार्थी रुग्णालयात दाखल 

स्कुल बसचा अपघात झाल्याचे समजताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढले. यानंतर जखमी विद्यार्थ्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पालकांना घटनेची माहिती समजतात त्यांनी रुग्णालयात धाव घेत आपल्या पाल्यांना धीर दिला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी या अपघाताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com