Dragan Fruit Farming : माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; येवल्याच्या दुष्काळग्रस्त भागात यशस्वी प्रयोग

Nashik News : पारंपरिक शेती करणे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे आतोनात नुकसान होत असते. तसेच आलेल्या उत्पादनाला देखील अपेक्षित असा भाव मिळत नाही. यामुळे पारंपरिक शेती करणे आता शेतकऱ्यांना परवडणारे नाही
Dragan Fruit Farming
Dragan Fruit FarmingSaam tv
Published On

अजय सोनवणे 
येवला (नाशिक)
: पारंपरिक शेती करणे आता शेतकऱ्यांना परवडत नाही. यामुळे वेगवेगळे प्रयोग करून शेतीतून चांगले उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यानुसार येवल्यातील दुष्काळग्रस्त भाग असलेल्या हडप सावरगाव येथे माळरानावर ड्रॅगन फ्रुटची शेती फुलविल्याचा यशस्वी प्रयोग शेतकऱ्याने केला आहे. दरम्यान या ड्रॅगन फ्रुटच्या विक्रीतून शेतकऱ्याला लाखोंचे उत्पन्न देखील मिळाले आहे. 

पारंपरिक शेती करणे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे आतोनात नुकसान होत असते. तसेच आलेल्या उत्पादनाला देखील अपेक्षित असा भाव मिळत नाही. यामुळे पारंपरिक शेती करणे आता शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्यावर भर दिला जात आहे. यात माळरानावर देखील यशस्वी प्रयोग केले जात आहेत. अशाच प्रकारे येवला येथील सुनील सोनवणे या शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुटचा प्रयोग केला आहे. 

Dragan Fruit Farming
Dhule Crime : वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावत मित्राचा घातपात; कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, नातेवाईक संतप्त

दुष्काळी भाग तरीही योग्य नियोजन 

नाशिकच्या येवला तालुक्यातील हडपसर गाव येथील शेतकरी सुनील कचरू सोनवणे यांनी आपल्या दोन एकर शेतीमध्ये ड्रॅगन फ्रुट ची शेती फुलवली आहे. उन्हाळ्यामध्ये हडप सावरगाव या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. मात्र या शेतकऱ्याने आधुनिक शेती पद्धतीचा वापर करत ड्रिप व मल्चिंगच्या साह्याने कमी पाण्यावर येणारे ड्रॅगन फ्रुट पिकवले आहे. आता या ड्रॅगन फ्रूटची काढणीला देखील सुरवात झाली आहे. 

Dragan Fruit Farming
Wada News : आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना; रायकर पाडा येथील विद्यार्थ्यांचा नदीत तराफ्यातून जीवघेणा प्रवास

लाखो रुपयांचे उत्पादन 

आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या या फळाला बाजारात चांगली मागणी असून स्थानिक बाजारपेठे व्यतिरित अन्य भागातून व्यापारी हे फळ खरेदी साठी येत आहेत. या शेतीमधून त्यांना लाखोचे उत्पन्न मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती या ड्रॅगन फ्रुटच्या बागेमुळे सुधारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com