Dhule Crime : वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावत मित्राचा घातपात; कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, नातेवाईक संतप्त

Dhule News : दोन मित्रांनी वाढदिवसासाठी जायचे आहे असे सांगत बोलावले. यानंतर जगदीश ठाकरे मित्रांसोबत निघून गेला. मात्र घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार
Dhule Crime
Dhule CrimeSaam tv
Published On

धुळे : धुळ्याच्या चाळीसगाव रोड पोलिसांना कन्नड घाटात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याचा तपास करत दाखल मिसिंग तक्रारीतील युवक असल्याचे समोर आले आहे. मात्र या तरुणाचा त्याच्या मित्रांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्ताने बोलावून घातपात केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. 

धुळे तालुक्यातील मोर्दड गावातील जगदीश ठाकरे हा २९ जूनला घरी जेवण करत असताना त्याच्या दोन मित्रांनी त्याला आपल्याला वाढदिवसासाठी जायचे आहे असे सांगत बोलावले. यानंतर जगदीश ठाकरे हा जेवण न करताच मित्रांसोबत निघून गेला. मात्र तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. यातच कन्नड घाट परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. 

Dhule Crime
Navapur News : मृत्यूनंतरही आदिवासी बांधवांच्या मरण यातना संपेना; अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीवघेणा प्रवास

पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात 

२ जुलैला चाळीसगाव रोड पोलिसांनी एक अज्ञात मृतदेह कन्नड घाटामध्ये आढळून आला असल्याची माहिती जगदीशच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर या मृतदेहाची शहानिशा करताना त्याच्या अंगावर असलेल्या टॅटूमुळे मृतदेह जगदीश याचाच असल्याचे स्पष्ट झाले. जगदीश ठाकरे याला गोळी मारून त्याचा घातपात करण्यात आल्याचे प्रथमदर्शी आढळून आले आहे. या प्रकरणी तिघा जणांना चाळीसगाव रोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामागील मास्टरमाइंड कोण? याचा तपास सुरु आहे. 

Dhule Crime
Amravati Accident : पेट्रोलने भरलेल्या ट्रॅकरने महिलेला चिरडले; महिलेचा जागीच मृत्यू

मुख्य आरोपीस अटक करण्याची मागणी 

दरम्यान धुळे तालुक्यातील मोर्दड गावातील जगदीशचा घातपात झाल्याचे उघडकीस आल्यानंतर कुटुंबीय तसेच तंट्यामामा भिल आदिवासी बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने हत्येमागील मूळ आरोपीस ताब्यात घेण्यात यावे; अशी मागणी करण्यात आली आहे. मूळ आरोपीस ताब्यात घेण्यात आले नाही; तर संघटनेच्या माध्यमातून जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व नातेवाईकांनी दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com